Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedओरिजिनल संगीत, नवे कलाकार आणि मोठ्या स्वप्नांना मिळणार प्लॅटफॉर्म; किंग आस्था...

ओरिजिनल संगीत, नवे कलाकार आणि मोठ्या स्वप्नांना मिळणार प्लॅटफॉर्म; किंग आस्था गिल, आदित्य रिखारी आणि पर्मिश वर्मा शोधत आहेत, भारतातलं नवं सिंगिंग सेन्सेशन, अॅमेझॉन एमएक्स प्लेयवरच्या नव्या –

~या अनोख्या कोलॅबरेशनसाठी वॉर्नर म्युझिक आणि स्पॉटिफाय हे म्युझिक पार्टनर~

~ रस्क मीडिया निर्मित ‘आय-पॉपस्टार’ हा शो 18 ऑक्टोबरपासून अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर मोफत स्ट्रीम होणार असून, दर शुक्रवारी नवे एपिसोड प्रदर्शित केले जातील ~

      अॅमेझॉन एमएक्स प्लेयरने आज त्यांच्या आय-पॉपस्टार या साप्ताहिक म्युझिक रिअलिटी सीरीजचं ट्रेलर प्रदर्शित केलं. या अशाप्रकारच्या पहिल्या म्युझिक टॅलेंट हंटमधे अस्सलपणा आणि सर्जनशीलता यांचा मेळ घालण्यात आला आहे. या शो मधे देशभरातील उदयोन्मुख 12 संगीतकार सहभागी होऊन पॉप, रॅप, ईडीएम, रॉक आणि आर अँड बी सादर करणार असून त्याला हिंदी, पंजाबी, हरियाणवी आणि गुजरातीसारख्या प्रादेशिक लहेजाची जोड असेल. सहा आठवड्यांत 25 स्पर्धक ऑडिशन्स देतील आणि त्यातील 12 जण गाला राउंडसाठी निवडले जातील. त्यानंतर होणार असलेल्या भव्य अंतिम फेरीत भारताच्या पहिल्या आय- पॉपस्टारचं टायटल जिंकण्यासाठी लढत होईल आणि दरम्यान भारताचं श्रीमंत व वैविध्यपूर्ण संगीत साजरं केलं जाईल.

या शोच्या मेंटॉर पॅनेलमधे भारतात स्वतंत्रपणे तयार केल्या जाणाऱ्या संगीताचं वैविध्य दिसून येईल. किंग, आस्था गिल, आदित्य रिखारी आणि पर्मिश वर्मा हे मेंटर स्पर्धकांना मार्गदर्शन करतील, त्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन करतील व त्यांना नवी सर्जनशीलता गाठण्यास मदत करतील. कोलॅबरेशन नव्या उंचीवर नेण्यासाठी अॅमेझॉन एमएक्स प्लेयरने वॉर्नर म्युझिक आणि स्पॉटिफाय यांच्याशी म्युझिक पार्टनर म्हणून भागिदारी करत आतापर्यंत कधी अनुभवलेल्या सांगीतिक अनुभवाची नांदी केली आहे.

या शो विषयी अॅमेझॉन एमएक्स प्लेयरचे संचालक आणि कंटेंट प्रमुख अमोघ दुसाद म्हणाले, ‘अॅमेझॉन एमएक्सप्लेयरने कायमच प्रेक्षकाना धाडसी आणि वेगळे तरीही आपलेसे वाटणारे फॉरमॅट देण्यावर भर दिला आहे. आय- पॉपस्टार हे स्वतंत्रपणे तयार केल्या जाणाऱ्या संगीताचं सेलिब्रेशन असून त्यात देशभरातील सर्जनशीलता, अस्सलता आणि गुणवत्ता यांचा मेळ पाहायला मिळणार आहे. हा शो उत्साह, भावना आणि उत्सुकता यांचं अनोखं मिश्रण असेल. एकापेक्षा एक मेंटॉर्स लाभल्यामुळे प्रेक्षकांसाठी हा अनुभव अस्स्ल भारतीय, तरीही जगभरात सर्वांना आवडेल असा मनोरंजक ठरेल.’

रस्क मीडियाचे सीईओ आणि सह- संस्थापक मयांक यादव म्हणाले, ‘रस्क मीडियाने नेहमीच तरुण प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं आणि अस्सल देण्याचा प्रयत्न केला आहे. आय- पॉपस्टारच्या माध्यमातून आम्ही भारताची वैविध्यपूर्ण संगीत संस्कृती एका प्लॅटफॉर्मवर आणत नवे आवाज आणि ध्वनी यांना वाव देण्याचं ध्येय ठेवलं आहे. हा शो फक्त स्पर्धेवर आधारित नाहीये, तर त्यातून भारतातील स्वतंत्र संगीत निर्मितीच्या भविष्याला आकार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.’

मेंटॉर्सनी भारतीय संगीत क्षेत्रातील नवीन पिढीला मार्गदर्शन करण्याबद्दलची उत्सुकता व्यक्त केली. किंग म्हणाले, ‘आय- पॉपस्टार या शोमध्ये उभरत्या गुणवत्तेला संधी मिळेल. प्रत्येक स्पर्धक खास आहे आणि त्यांना मार्गदर्शन करताना कक्षा रूंदावण्यास मदत करण्याचा, त्यांची सर्जनशीलता, अस्सलपणा फुलवण्याचा प्रयत्न असेल. प्रेक्षकांचा दमदार पाठिंबा त्यासाठी महत्त्वाचा आहे.’

आस्था गिल म्हणाल्या, ‘आय- पॉपस्टारची मला आवडलेली गोष्ट म्हणजे त्यातील संगीताचा अस्सलपणा. प्रत्येक परफॉर्मन्स नवा, ताजा आणि उत्साहाने सळसळणारा तसेच नवनव्या संकल्पनांनी सजलेला वाटतो. या स्पर्धकांना विकसित होताना आणि प्रेक्षकांनी कनेक्ट होताना पाहाणं प्रेरणादायी आहे.’

आदित्य रिखारी म्हणाले, ‘आय- पॉपस्टार हा केवळ एक शो नाही, तर तो शिकणं, प्रयोग करणं आणि कलाकार म्हणून विकसित होण्याचा प्रवास आहे. सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या आणि भारतातील स्वतंत्र आवाजाच्या नव्या पिढीला पुढे आणणाऱ्या या शोचाभाग होणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. या शो मुळे मला कलाकार म्हणून झालेल्या माझ्या प्रवासाची आणि त्यातून मिळत राहिलेल्या शिकवणीच्या आठवणींना उजाळा मिळाला.’

पर्मिश वर्मा म्हणाले, ‘आय- पॉपस्टार हा शो अभिव्यक्तीला वाव देणारा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कक्षा रूंदावणारा आहे. स्पर्धक धाडसी आहेत आणि प्रत्येक आठवड्याला त्यांच्यात होणारे नवे बदल पाहाणं थरारक आहे. या शो मुळे त्यांन स्वतःचा आणि आपल्या खऱ्या आवाजाचा शोध घेणं शक्य होत आहे.’

आय- पॉपस्टार हा शो 18 ऑक्टोबरपासून अॅमेझॉन एमएक्सप्लेयरवर मोफत स्ट्रीम होणार असून तो मोबाइल, कनेक्टेड टीव्ही, अॅमेझॉन शॉपिंग अ‍ॅप, प्राइम व्हिडिओ आणि फायर टीव्ही, एयरटेल एक्स्ट्रीमवर पाहाता येईल.

Tra

iler Link: https://youtu.be/XnaQQdxpHRo

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments