गुरूग्राम, ऑक्टोबर २४, २०२५: ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल)ने आज त्यांची बहुप्रतिक्षित कॉम्पॅक्ट एसयूव्ही नवीन ह्युंदाई वेन्यूच्या बुकिंगच्या शुभारंभाची घोषणा केली. शहरी गतीशीलता क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जाण्यास सज्ज असलेल्या नवीन ह्युंदाई वेन्यूमध्ये स्टाइल, नाविन्यता आणि टेक अप. गो बीयॉण्ड.चा उत्साह आहे. नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही शहरी गतीशीलतेमध्ये रोमांचक नवीन अध्यायाच्या शुभारंभाची प्रतीक आहे, ज्यासह नवीन मापदंड स्थापित करण्याप्रती ह्युंदाईची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. आकर्षक स्टायलिंगपासून तंत्रज्ञान-संपन्न केबिनपर्यंत नवीन ह्युंदाई वेन्यू प्रत्येक ड्राइव्हदरम्यान अधिक स्टाइल, अधिक आरामदायीपणा आणि अधिक नाविन्यतेची मागणी करणाऱ्या ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. ग्राहक भारतभरातील कोणत्याही ह्युंदाई डिलरशिपमध्ये किंवा https://clicktobuy.hyundai.co.in/#/newcar/bookacar?modelId=1Q या वेबसाइटवर क्लिक करत २५,००० रूपयांच्या सुरूवातीच्या बुकिंग रक्कमेसह नवीन ह्युंदाई वेन्यू बुक करू शकतात.
एचएमआयएलने आज लक्षवेधक, आकर्षक व रोमांचक जाहिरातीच्या माध्यमातून नवीन ह्युंदाई वेन्यूचे अनावरण केले. ही जाहिरात प्रेक्षकांमधील साहसी ड्रायव्हिंगला जागृत करण्यासाठी आणि त्यांच्यावर छाप निर्माण करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. ही जाहिरात फाइटर जेटची अचूकता, शक्ती आणि तंत्रज्ञान उत्कृष्टतेमधून प्रेरणा घेते, योग्य रूपक, ज्यामधून नवीन ह्युंदाई वेन्यूच्या अत्याधुनिक क्षमता आणि आत्मविश्वासपूर्ण एसयूव्ही पवित्रा दिसून येतो. या जाहिरातीची खासियत म्हणजे एचएमआयएलची ब्रँड अॅम्बेसेडर व जागतिक आयकॉन दीपिका पदुकोन, ज्यांची लक्षवेधक उपस्थिती आणि आधुनिक करिष्मा नवीन ह्युंदाई वेन्यूची गतीशील वृत्ती आणि आक्रमक उत्साहाशी प्रभावीपणे जुळून जातात. त्या सक्षम भारतीय ग्राहकाच्या प्रतिनिधीत्व करतात, जे आत्मविश्वासू, दूरगामी असण्यासोबत पुढाकार घेण्यास घाबरत नाहीत.
नवीन हृयुंदाई वेन्यू लाँच करत ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे पूर्ण-वेळ संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तरूण गर्ग म्हणाले, ”ह्युंदाई वेन्यू भारतातील सर्वात लोकप्रिय एसयूव्ही राहिली आहे, जेथे डिझाइन, तंत्रज्ञान व कार्यक्षमतेच्या परिपूर्ण संयोजनासाठी ७ लाखांहून अधिक ग्राहकांनी या वेईकलची निवड केली आहे. नवीन ह्युंदाई वेन्यूसह आम्ही या यशोगाथेला अधिक पुढे घेऊन जात आहोत, आकर्षक डिझाइन व आधुनिक प्रीमियमनेसला नव्या उंचीवर घेऊन जात आहोत, तसेच प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश करत आहोत, जे आजच्या आधुनिक ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षांशी संलग्न होते. नवीन ह्युंदाई वेन्यू आमचा दृष्टिकोन ‘टेक अप गो बीयॉण्ड’ची प्रतीक आहे, ड्रायव्हिंग अनुभव देते, जे गतीशील आणि ग्राहकांच्या सर्वसमावेशक जीवनशैलीशी उत्तमपणे संलग्न आहे.”
आकर्षक एक्स्टीरिअर्स: शहरी, उत्साहित आणि निश्चितच आकर्षक
नवीन ह्युंदाई वेन्यू आत्मविश्वासपूर्ण पवित्रा, शक्तिशाली अद्वितीय शैली आणि आकर्षक उपस्थितीसह रस्त्यावर सर्वांचे लक्ष वेधून घेते. डिझाइन घटक जसे ट्विन हॉर्न एलईडी डीआरएल, क्वॉड बीम एलईडी हेडलॅम्प्स, शक्तिशाली व्हिल आर्क डिझाइन, डार्क क्रोम रॅडिएटर ग्रिल, आर१६ (व्यास = ४०५.६ मिमी) डायमंड कट अलॉइ व्हील्स, ब्रिज टाइप रूफ रेल्ससोबत शिल्पाकृती कॅरेक्टर लाइन्स आणि इन-ग्लास वेन्यू एम्ब्लेम या वेईकलची एसयूव्ही विशिष्टता व रस्त्यावरील उपस्थिती वाढवण्यासाठी बारकाईने डिझाइन करण्यात आले आहेत. एसयूव्हीच्या आत्मविश्वासपूर्ण पवित्रामधून या वेईकलची उंच व रूंद आकारमान दिसून येते, ज्यासह शक्तिशाली आणि अद्वितीय एसयूव्ही निष्ठा अधिक दृढ झाली आहे.
प्रमुख एक्स्टीरिअर वैशिष्ट्ये
· उंच व रूंद आकारमान (विद्यमान वेन्यूच्या तुलनेत ४८ मिमी उंच आणि ३० मिमी रूंद)
· आकारमान (मिमी): ३९९५ (लांबी) * १८०० (रूंदी) * १६६५ (उंची) * २५२० (व्हीलबेस)
· क्वॉड बीम एलईडी हेडलॅम्प्स
· ट्विन हॉर्न एलईडी डीआरएल
· होरिझोन एलईडी पोझिशनिंग लॅम्प
· रिअर होरिझोन एलईडी टेल लॅम्प्स
· डार्क क्रोम रॅडिएटर ग्रिल
· ब्रिज टाइप रूफ रेलस
· सिग्नचेर सी-पिलर गार्निश
· इन-ग्लास वेन्यू एम्ब्लेम
नवीन ह्युंदाई वेन्यू स्टायलिश इंटीरिअर्स: तंत्रज्ञान व आरामदायीपणाचे संयोजन
नवीन हृयुंदाई वेन्यूचे इंटीरिअर्स कनेक्टेड जीवनशैली-केंद्रित अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. नवीन हृयुंदाई वेन्यूमध्ये प्रवेश करा आणि तुमचे एच-आर्किटेक्चर केबिनद्वारे स्वागत केले जाईल, जी कॉम्पॅक्ट एसयूव्ही अनुभवाला नव्या उंचीवर नेते. ड्युअल-टोन इंटीरिअर (डार्क नेव्ही व डव्ह ग्रे) आणि कॉफी-टेबल सेंटर कन्सोलसह अॅम्बियण्ट लायटिंग (मून व्हाइट) केबिनमध्ये उत्साही व स्वागतार्ह वातावरण निर्माण करतात. डी-कट स्टीअरिंग व्हील आणि टेराझो-टेक्स्चर क्रॅश पॅड गार्नीश प्रीमियम कारागिरीमध्ये विशिष्टतेची भर करतात, ज्यामुळे एकूण समकालीन अपील वाढते.
या केबिनमधील खासियत म्हणजे ड्युअल ६२.५ सेमी (१२.३ इंच + १२.३ इंच) कर्व्ह पॅनोरूमिक डिस्प्लेसह इन्फोटेन्मेंट व क्लस्टर, जे विनासायास कनेक्टीव्हीटी आणि तंत्रज्ञान-अग्रणी व प्रीमियम वातावरण देतात.
नवीन हृयुंदाई वेन्यू प्रवाशांना अधिक आरामदायीपणा देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. या वेईकलमध्ये २-स्टेप रिक्लायनिंग सीट्स, रिअर विंडो सनशेड्स, रिअर एसी वेण्ट्स आणि ड्युअल टोन लेदर^ सीट्ससह वेन्यू ब्रँडिंग आहे.
नवीन हृयुंदाई वेन्यूमध्ये एैसपैस केबिनसह व्यापक हेडरूम व शोल्डर रूम, तसेच अधिक लेगरूम आहे, ज्याचे श्रेय विस्तारित व्हीलबेसला (विद्यमान वेन्यूपेक्षा २० मिमी अधिक) जाते. स्कूप फ्रण्ट सीटबॅक मागील आसनावरील प्रवाशांना पायासाठी अधिक जागा देते, ज्यामुळे प्रत्येक प्रवास आरामदायी व आनंददायी असण्याची खात्री मिळते. व्यापक डोअर ओपनिंग आणि विचारपूर्वक डिझाइन केलेले एण्ट्री पॉइण्ट्स वेईकलमध्ये प्रवेश करणे व बाहेर पडणे सोपे करते, ज्यामुळे एकूण सोयीसुविधेमध्ये अधिक वाढ करण्यात आली आहे. सुधारित सीट बॉल्स्टरिंगसह नवीन हृयुंदाई वेन्यू विशेषत: रस्त्यावरील कोपऱ्यांवर किंवा लांब अंतरापर्यंतच्या प्रवासादरम्यान उच्च दर्जाचा आरामदायीपणा, सानुकूल पवित्रा आणि पाठिंबा देते.
प्रमुख इंटीरिअर वैशिष्ट्ये:
· लांब व्हीलबेस (२५२० मिमी)
· ड्युअल ६२.५ सेमी (१२.३ इंच + १२.३ इंच) कर्व्ह पॅनोरॅमिक डिस्प्ले
· रिअर विंडा सनशेड
· ड्युअल टोन लेदर^ सीट्ससह वेन्यू ब्रँडिंग
· कॉफी टेबल सेंटर कन्सोलसह सराऊंड अॅम्बियण्ट लायटिंग
· क्रॅश पॅडवर अॅम्यिबण्ट लायटिंग (मून व्हाइट)
· टेराझो-टेक्स्चर क्रॅश पॅड फिनिश
· प्रीमियम लेदर^ आर्मरेस्ट
· डी-कट स्टीअरिंग व्हील
· इलेक्ट्रिक ४-वे ड्रायव्हर सीट्स
· २-स्टेप रिक्लायनिंग रिअर सीट्स
· रिअर एसी वेण्ट्स
नवीन ह्युंदाई वेन्यू इंजिहन आणि ट्रान्समिशन पर्याय:
नवीन हृयुंदाई वेन्यू कप्पा १.२ लीटर एमपीआय पेट्रोल, कप्पा १.० लिटर टर्बो जीडीआय पेट्रोल आणि यू२ १.५ लीटर सीआरडीआय डिझेल या तीन विशिष्ट इंजिन पर्यायांसह वैविध्यतेची खात्री देते. ही वेईकल मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि ड्युअल-क्लच ट्रान्समिशन (डीसीटी) या तीन ट्रान्समिशन पर्यायांसह देखील येते, ज्यामधून प्रत्येक प्रकारच्या ड्रायव्हरला गतीशील अनुभवाची खात्री मिळते.
नवीन ह्युंदाई वेन्यू व्हेरिएण्ट पर्याय:
नेक्स्ट-जनरेशन ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल उचलत नवीन हृयुंदाई वेन्यू ‘ह्युंदाई एक्स्पीरिअन्स’मधून प्रेरित नवीन व्हेरिएण्ट नॉमेनक्लेचर (नामकरण) ‘एचएक्स’सह येते, ज्यामध्ये अल्फा-न्यूमरिक नावाचा अवलंब करण्यात आला आहे, ज्यामधून तंत्रज्ञान आणि प्रीमियम अनुभवाची दृढ भावना दिसून येते. या दूरगामी दृष्टिकोनामधून नाविन्यता, व्यक्तिमत्त्व आणि जीवनशैलीप्रती ब्रँडची कटिबद्धता दिसून येते, जे ट्रेण्डप्रती जागरूक व्यक्तींमध्ये लोकप्रिय आहेत. नवीन ह्युंदाई वेन्यू खालील व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल:
पेट्रोल
डिझेल
एचएक्स २
एचएक्स २
एचएक्स ४
एचएक्स ५
एचएक्स ५
एचएक्स ७
एचएक्स ६
एचएक्स १०
एचएक्स ६टी
एचएक्स ८
एचएक्स १०
नवीन ह्युंदाई वेन्यू रंग पर्याय:
नवीन ह्युंदाई वेन्यू सहा मोनोटोन शेड्स आणि दोन स्टायलिश ड्युअल-टोन कॉम्बीनेशन्सच्या आकर्षक रंगसंगतीमध्ये प्रदान करण्यात येईल. तुम्ही सुरेख साधेपणा किंवा आकर्षक कॉन्ट्रास्टला प्राधान्य देत असाल तर प्रत्येक व्यक्तिमत्त्वाला जुळणारे रंग आहेत.
मोनोटोन
ड्युअल टोन
हेझल ब्ल्यू
(नवीन रंग)
हेझल ब्ल्यूसह अॅबिस ब्लॅक रूफ (नवीन रंग)
मिस्टिक सफायर
(नवीन रंग)
अॅटलास व्हाइटसह अॅबिस ब्लॅक रूफ
अॅटलास व्हाइट
टायटन ग्रे
ड्रॅगन रेड
अॅबिस ब्लॅक
७ लाखांहून अधिक ग्राहकांचे मन जिंकलेल्या ह्युंदाई वेन्यूने भारतातील कॉम्पॅक्ट एसयूव्ही क्षेत्राला आकार देण्यामध्ये निर्णायक भूमिका बजावली आहे. आता, नवीन वेन्यूसह ह्युंदाई पुन्हा एकदा या स्तराला उंचावण्यास सज्ज आहे, ज्यामध्ये प्रगतीशील तंत्रज्ञान व गतीशील डिझाइनचे संयोजन आहे. नवीन ह्युंदाई वेन्यू ४ नोव्हेंबर २०२५ रोजी लाँच करण्यात येणार आहे.
ग्राहक नवीन ह्युंदाई वेन्यूबाबत अधिक माहितीसाठी जवळच्या ह्युंदाई डिलरशिपला भेट देऊ शकतात.
अधिक माहितीसाठी www.hyundai.com येथे लॉग ऑन करा.
मीडिया संपर्क: ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड | corporatecommunication@hmil.net
जारीकर्ता:
ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड
सीआयएन: L29309TN1996PLC035377
प्लॉट क्र. सी११ व सी११ए, सिटी सेंटर
अर्बन इस्टेट २, सेक्टर २९
गुरूग्राम, हरियाणा – १२२ ००१, भारत


