Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedऑर्कला इंडिया लिमिटेडचा आयपीओ बुधवार, २९ ऑक्टोबर, २०२५ पासून होणार सुरू

ऑर्कला इंडिया लिमिटेडचा आयपीओ बुधवार, २९ ऑक्टोबर, २०२५ पासून होणार सुरू

 

 

 

 

· या आयपीओचा किंमतपट्टा प्रति इक्विटी शेअर ६९५ ते ७३० रुपये. प्रत्येक इक्विटी शेअरचे दर्शनी मूल्य एक रुपया इतके आहे.

 

· फ्लोअर प्राइस म्हणजे तळ किंमत ही इक्विटी शेअरच्या अंकित मूल्याच्या ६९५ पट, तर कॅप प्राइस म्हणजे उच्च किंमत ही ७३० पट.

 

· बोली / ऑफर खुली होणार बुधवारी, २९ ऑक्टोबर २०२५ रोजी आणि बंद होणार शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोलीची तारीख मंगळवार, २८ ऑक्टोबर २०२५.

 

· गुंतवणूकदारांना किमान २० इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर २० शेअर्सच्या पटीत बोली लावता येईल.

 

· पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव कोट्यात बोली लावणाऱ्यांना प्रति इक्विटी शेअर ६९ रुपये इतकी सूट.

 

· रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसची (आरएचपी) दि. २३ ऑक्टोबर २०२५ रोजीची लिंक : https://www.orklaindia.com/wp-content/uploads/sites/3/2025/10/Orkla-India-RHP-Document.pdf

 

· किंमतपट्ट्याच्या जाहिरातीची लिंक : https://epaper.financialexpress.com/4071439/Delhi/OCTOBER-24-2025#page/12/1

 

 

 

मुंबई, २४ ऑक्टोबर २०२५ : ऑर्कला इंडिया लिमिटेड (पूर्वाश्रमीची एमटीआर फूड्स प्रायव्हेट लिमिटेड) या कंपनीने प्राथमिक समभाग विक्रीचा (आयपीओ) प्रस्ताव दिला आहे. या आयपीओतील बोलीची प्रक्रिया बुधवार, दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू होणार आहे. ही ऑफर शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोलीची तारीख मंगळवार, दि. २८ ऑक्टोबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

 

गुंतवणूकदारांना किमान २० इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर २० शेअर्सच्या पटीत बोली लावता येईल. या आयपीओचा किंमतपट्टा प्रति इक्विटी शेअर ६९५ ते ७३० असा निश्चित करण्यात आला आहे. या ऑफरमध्ये एकूण २२,८४३,००४ इक्विटी शेअर्सच्या विक्रीसाठीची ऑफर (ऑफर फॉर सेल) समाविष्ट आहे.

 

 

 

या ऑफर फॉर सेलमध्ये ऑर्कला आशिया पॅसिफिक प्रा. लि. यांच्याकडील २०,५६०,७६८ इक्विटी शेअर्स, नावास मीरन यांच्याकडील ११,४१,११८ इक्विटी शेअर्स आणि फिरोज मीरन यांच्याकडील ११,४१,११८ इक्विटी शेअर्स यांच्या विक्रीचा समावेश आहे.

 

 

 

पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव कोट्यात बोली लावणाऱ्यांना या आयपीमध्ये प्रति इक्विटी शेअर ६९ रुपयांची सूट दिली जाणार आहे.

 

 

 

कंपनीने २३ ऑक्टोबर २०२५ रोजी बंगरुळूमधील रजिस्ट्रार ऑफ कंपनीज यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार, हे इक्विटी शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) आणि बीएसई लिमिटेड (बीएसई) या दोन्ही स्टॉक एक्सचेंजेसवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. या ऑफरच्या उद्देशांसाठी बीएसई या नामांकित स्टॉक एक्सचेंजची निवड करण्यात आली आहे.

 

 

 

ही ऑफर एससीआरआरचे नियम १९(२)(ब) आणि सेबी आयसीडीआर नियमावलीतील नियम ३१ यांच्या अनुषंगाने करण्यात येत आहे. तसेच सेबी आयसीडीआर नियमावलीतील नियम ६(१) नुसार या ऑफरमधील बुक बिल्डिंग प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेनुसार, एकूण नेट ऑफरपैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिक भाग प्रमाणानुसार वाटपाच्या तत्त्वावर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना (क्यूआयबी) देण्यात येईल. हा भाग ‘क्यूआयबी पोर्शन’ म्हणून ओळखला जाईल. तथापि, कंपनीला बुक रनिंग लीड मॅनेजर्स यांच्या सल्लामसलतीने, क्यूआयबी पोर्शनपैकी जास्तीत जास्त ६० टक्के हिस्सा “अँकर गुंतवणूकदारांना” विवेकाधीन पद्धतीने वाटप करण्याचा अधिकार असेल. हा भाग “अँकर इन्व्हेस्टर पोर्शन म्हणून ओळखला जाईल. या अँकर गुंतवणूकदारांच्या भागातील एक-तृतीयांश हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखीव ठेवण्यात येईल, मात्र त्याकरीता अशा म्युच्युअल फंड्सकडून अँकर गुंतवणूकदारांना ठरवलेल्या किंमतीवर किंवा त्याहून अधिक किंमतीवर वैध बोली प्राप्त झालेल्या असाव्यात. ही वाटप प्रक्रिया सेबी आयसीडीआर नियमावलीत दिलेल्या तरतुदींनुसार केली जाईल.

 

अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये जर अपेक्षेप्रमाणे अर्ज प्राप्त झाले नाहीत किंवा त्या भागातील इक्विटी शेअर्सचे पूर्ण वाटप झाले नाही, तर उर्वरित इक्विटी शेअर्स क्यूआयबी भागात (अँकर इन्व्हेस्टर पोर्शन वगळता) म्हणजेच “नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये जोडले जातील. यानंतर, नेट क्यूआयबी पोर्शनपैकी ५ टक्के हिस्सा केवळ म्युच्युअल फंड्सना प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध राहील. उर्वरित नेट क्यूआयबी पोर्शन हे सर्व पात्र संस्थात्मक खरेदीदारांना, ज्यामध्ये म्युच्युअल फंड्सचाही समावेश आहे, प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध राहील. यासाठी त्यांनी ऑफर प्राइसइतक्या किंवा त्याहून अधिक किंमतीवर वैध बोली सादर केल्या असाव्यात. तथापि, जर म्युच्युअल फंड्सकडून आलेली एकूण मागणी नेट क्यूआयबी पोर्शनच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर त्या म्युच्युअल फंड्ससाठी राखीव राहिलेले, पण वाटप न झालेले इक्विटी शेअर्स उर्वरित नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये समाविष्ट केले जतील आणि त्यांचे इतर क्यूआयबी गुंतवणूकदारांमध्ये प्रमाणानुसार वाटप केले जातील. तसेच, एकूण नेट ऑफरपैकी किमान १५ टक्के हिस्सा बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ‘नॉन-इन्स्टिट्युशनल पोर्शन’ म्हणून राखीव ठेवण्यात येईल.

 

 

 

या नॉन-इन्स्टिट्युशनल पोर्शनमधील (अ) एक-तृतीयांश भाग अशा गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल, ज्यांच्या बोलीचे मूल्य २,००,००० पेक्षा जास्त आणि १०,००,००० पर्यंत आहे, आणि (ब) दोन-तृतीयांश भाग अशा गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल, ज्यांच्या बोलींचे मूल्य १०,००,००० पेक्षा जास्त आहे. जर या दोन्ही उपश्रेणींपैकी कोणत्याही एका गटात अपुरी मागणी राहिली, तर त्या गटातील उर्वरित शेअर्स दुसऱ्या उपश्रेणीतील पात्र गुंतवणूकदारांना वाटप केले जाऊ शकतात. याव्यतिरिक्त, सेबी आयसीडीआरच्या नियमावलीनुसार एकूण नेट ऑफरपैकी किमान ३५ टक्के हिस्सा रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येईल. त्याकरीता त्यांना ऑफर प्राइस इतक्या किंवा त्याहून अधिक किंमतीवर वैध बोली सादर करावी लागेल.

 

 

 

अँकर गुंतवणूकदार वगळता सर्व संभाव्य गुंतवणूकदारांना या ऑफरमध्ये सहभागी होण्यासाठी एएसबीए (अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट) प्रक्रियेचा वापर करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेनुसार, गुंतवणूकदारांनी आपल्या एएसबीए खात्याची माहिती आणि, जर त्यांनी यूपीआय प्रणालीचा वापर केला असेल, तर यूपीआय आयडी अर्जात नमूद करावा. त्यानंतर त्यांच्या बोली रकमेइतकी रक्कम संबंधित सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक किंवा यूपीआय प्रणालीतील स्पॉन्सर बँक त्यांच्या खात्यातून ब्लॉक करून ठेवेल. अँकर गुंतवणूकदारांना मात्र एएसबीए प्रक्रियेतून ऑफरमध्ये सहभागी होता येणार नाही.

 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया आरएचपीमधील “ऑफर प्रोसिजर” विभाग (पृष्ठ क्रमांक ४४०) पाहा.

 

 

 

या ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स म्हणून आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जे. पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड या संस्था काम पाहत आहेत.

 

 

 

येथे वापरलेले सर्व तांत्रिक व विशेष शब्द, ज्यांचे अर्थ येथे दिलेले नाहीत, त्यांना आरएचपीमध्ये दिलेला अर्थच लागू राहील.

 

 

 

Disclaimer:

 

ORKLA INDIA LIMITED (Formerly known as MTR Foods Private Limited) is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and has filed the Red Herring Prospectus dated October 23, 2025 (“RHP”), with RoC.

 

The RHP shall be available on the website of SEBI at www.sebi.gov.in, as well as on the websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, on the website of the Company at www.orklaindia.com and on the websites of the BRLMs, i.e. ICICI Securities Limited, Citigroup Global Markets India Private Limited, J.P. Morgan India Private Limited and Kotak Mahindra Capital Company Limited at www.icicisecurities.com, https://www.citigroup.com/global/about-us/global-presence/india/disclaimer, www.jpmipl.com and https://investmentbank.kotak.com, respectively. Any potential investors should note that investment in Equity Shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see the section titled “Risk Factors” on page 36 of the RHP. Potential Bidders should not rely on the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges for making any investment decision and should instead rely on the RHP, for making investment decision.

 

The Equity Shares have not been and will not be registered under the United States Securities Act of 1933, as amended (the “U.S. Securities Act”) or any other applicable law of the United States and, unless so registered, may not be offered or sold within the United States except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold (a) in the United States to persons reasonably believed to be “qualified institutional buyers” (as defined in Rule 144A under the U.S. Securities Act and referred to in the Red Herring Prospectus as “U.S.QIBs”), in transactions exempt from, or not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act, and (b) outside of the United States in offshore transactions as defined in and in compliance with Regulation S and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur. There will be no public offering in the United States.

 

 

 

 

 

Regards

 

Unni

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments