देशातील पहिली जीवन विमा कंपनी म्हणून ‘बँकिंग कनेक्ट’ अनुभव क्लोज्ड युजर ग्रुपसाठी उपलब्ध
● आवडत्या बँकिंग अॅपमधून सुरक्षितरीत्या प्रीमियम पेमेंटची सुविधा, इंटरनेट बँकिंग लॉगिन डिटेल्सची गरज नाही
● नव्या प्रक्रियेमुळे मोबाईल-फर्स्ट, इंटरऑपरेबल पेमेंट अनुभव अनेक बँकिंग पार्टनर्समध्ये उपलब्ध
मुंबई, 27 ऑक्टोबर 2025 : आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने आपल्या ग्राहकांसाठी नवा डिजिटल पेमेंट अनुभव सादर केला आहे. या सेवेमुळे ग्राहकांना वेगवेगळे इंटरनेट बँकिंग लॉगिन क्रेडेन्शियल्स न टाकता, थेट आपल्या आवडत्या बँकिंग मोबाईल अॅपमधून सुरक्षितरीत्या प्रीमियम भरता येणार आहे.
ही सुविधा एनपीसीआयच्या बँकिंग कनेक्ट प्लॅटफॉर्मद्वारे सक्रिय करण्यात आली आहे, ज्याचे अनावरण ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) 2025 मध्ये झाले. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ ही सुविधा आपल्या ग्राहकांना देणारी देशातील पहिली जीवन विमा कंपनी ठरली आहे.
बँकिंग कनेक्टमुळे पेमेंट पर्याय विद्यमान मोबाईल बँकिंग प्रवासातच समाविष्ट होतात. त्यामुळे ग्राहकांना केवळ एका सिंगल ऑथेंटिकेशन स्टेपद्वारे प्रीमियम पेमेंट पूर्ण करता येते, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया सुलभ आणि त्रासमुक्त होते. ही सुविधा इंटरऑपरेबल लेयरवर कार्यरत असल्याने अनेक बँका आणि पेमेंट अॅग्रीगेटर्स एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्र येतात. त्यामुळे ग्राहकांना आपल्या आवडत्या बँकिंग अॅपचा वापर करून व्यवहार करण्याची लवचिकता मिळते.
लाँचिंगबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना, श्री. अमीश बँकर, चीफ ऑपरेशन्स ऑफिसर, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स म्हणाले : “मोबाईल-फर्स्ट पेमेंट पर्यायाची ही सुविधा आमच्या कंपनीच्या ग्राहक अनुभव सुधारणा, प्रक्रिया सुलभीकरण आणि उपलब्धता वाढविण्याच्या ध्येयाशी सुसंगत आहे. विशेष म्हणजे, आम्ही नेहमीच विमा सेवा ग्राहकांच्या बदलत्या पसंती लक्षात घेऊन डिझाईन केल्या आहेत. बँकिंग कनेक्ट उपक्रमामुळे आता ग्राहकांना त्यांच्या आवडत्या बँकिंग अॅपमध्येच प्रीमियम पेमेंट करण्याची सुविधा मिळत असून, ही प्रक्रिया सोपी आणि सहजगत्या पार पडेल. मोबाईल फोन हे पेमेंटचे प्रमुख साधन होत असल्याने आणि डिजिटल स्वीकार वाढत असल्याने, आम्ही ग्राहकांसाठी विमा सेवा अधिक सोप्या करण्यास कटिबद्ध आहोत.”
या रोलआउटमुळे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफचा डिजिटल इनोव्हेशन रोडमॅप आणखी बळकट झाला आहे, जो पॉलिसीच्या संपूर्ण जीवनचक्रात ग्राहकांना अखंड अनुभव देण्यावर केंद्रित आहे. या नवीन पेमेंट पर्यायाची इंटरऑपरेबल क्षमता सुनिश्चित करते की ग्राहक एका विशिष्ट इंटरफेस किंवा बँकिंग पार्टनरपुरते मर्यादित राहत नाहीत. त्यामुळे त्यांना विविध संस्थांमध्ये एकसंध, सुलभ आणि त्रासमुक्त अनुभव मिळतो. हा उपक्रम कंपनीच्या व्यापक उद्दिष्टाशीही जोडलेला आहे – म्हणजेच फ्रिक्शनलेस डिजिटल सेवा प्रवास निर्माण करणे, ज्यामुळे ग्राहकांचा वेळ वाचेल आणि पारदर्शकता वाढेल.
डिजिटल स्वीकार वाढत असताना, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ भविष्यात या सुविधेला आणखी बळकट करण्याची योजना आखत आहे. कंपनी लवकरच मोबाईल अॅपमध्ये अतिरिक्त सेवा वैशिष्ट्ये जोडणार असून, यामुळे ग्राहकांना त्यांच्या पॉलिसीशी संबंधित आवश्यक गोष्टी अधिक सोयीस्कर पद्धतीने आणि रिअल-टाईममध्ये व्यवस्थापित करता येतील.


