पुणे,28 ऑक्टोबर 2025 : रूबी हॉल क्लिनिकला प्रगत स्ट्रोक केअरसाठी नुकतेच एनएबीएच (नॅशनल ॲक्रिडिएशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स) आणि क्यूएआय (क्वालिटी ॲन्ड ॲक्रिडिएशन इन्स्टिट्यूट) अशी दुहेरी मान्यता मिळाली आहे. प्रगत स्ट्रोक केअरमध्ये दुहेरी मान्यता मिळविणारे रूबी हॉल क्लिनिक हे भारतातील पहिले रूग्णालय असून मेंदूशी निगडीत तातडीच्या परिस्थिती हाताळण्यामध्ये तत्परता,उत्कृष्टता आणि रुग्ण सुरक्षेप्रती रूग्णालयाची कटिबद्धता अधोरेखित होते.
रूबी हॉल क्लिनिकचे चीफ कार्डिओलॉजिस्ट,अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.परवेझ ग्रांट,विश्वस्त डॉ.सिमोन ग्रांट,न्युरो इंटेंसिव्ह केअर युनिटचे प्रमुख डॉ.कपिल झिरपे,न्युरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.सुनिल बंदिस्ती आणि स्ट्रोक केअरमधील संपूर्ण टीमला एनएबीएच आणि क्यूएआय या दुहेरी मान्यता मिळाल्याबद्दल अत्यंत आनंद आहे.स्ट्रोक व्यवस्थापनामध्ये राष्ट्रीय स्तरावर आघाडीचे रूग्णालय म्हणून ओळख असल्याचा रूग्णालयाला अभिमान आहे आणि करूणा,तत्परता आणि अचूकतेसह सेवा प्रदान करण्याचे ध्येय अधिक दृढ झाले आहे.हा महत्त्वाचा टप्पा म्हणजे वैद्यकीय आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसह संपूर्ण टीमचे समर्पण,कौशल्य आणि सांघिक कार्याचा पुरावा आहे.स्ट्रोक आलेल्या प्रत्येक रूग्णाला बरे होण्यासाठी सर्वोत्तम संधी मिळावी यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या संपूर्ण टीमचे रुग्णालय मनापासून आभार मानते.
या कामगिरीच्या केंद्रस्थानी रूग्ण दाखल झाल्यापासून प्रत्येक मिनिट महत्त्वाचा ठरविणारे रूबी हॉल क्लिनिकचे ॲडव्हान्स्ड स्ट्रोक केअर सेंटर आहे.आपल्या निदान क्षमतांना आणखी बळकटी देत रूबी हॉल क्लिनिकने भारतातील पहिले फिलिप्स इंजेनिया एव्होल्युशन 3टी एमआरआय विथ स्मार्ट स्पीड एआय तंत्रज्ञान प्रस्थापित केले असून पारंपरिक एमआरआय प्रणालीच्या तुलनेत तिप्पट वेगाने ही प्रणाली उच्च रिझ्योल्यूशन इमेजिंग प्रदान करते.या एआय चलित प्लॅटफॉर्मसह सहा मिनिटांत ब्रेन अँजिओग्राम शक्य होते आणि यामुळे गोल्डन अवरमध्ये वैद्यकीय तज्ञांतर्फे करण्यात येणाऱ्या स्ट्रोकचे निदान आणि उपचारामध्ये परिवर्तन झाले आहे.याला पूरक म्हणून रूग्णालयाने सिमेन्स फोर्स व्हीबी 30 (1152-स्लाईस) हा अपग्रेडेड सीटी स्कॅनर कार्यान्वित केला असून स्ट्रोकच्या जलद मूल्यांकन व उपचार योजनेसाठी सीटी परफ्यूजन इमेजिंग प्रदान करते.
रूबी हॉल क्लिनिकचे चीफ कार्डिओलॉजिस्ट,अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.परवेझ ग्रांट म्हणाले की,ही दुहेरी मान्यता प्रगत स्ट्रोक केअरमधील रूबी हॉल क्लिनिकचे नेतृत्व अधोरेखित करते.वेळेवर,परवडणाऱ्या दरात आणि जीव वाचविणारे व जलद बरे करणारे जागतिक दर्जाचे उपचार प्रदान करण्यास आम्ही वचनबध्द आहोत.
रूबी हॉल क्लिनिकचे विश्वस्त डॉ.सिमोन ग्रांट म्हणाले की,कोणत्याही स्ट्रोक रूग्णाच्या निदान आणि उपचारामध्ये विलंब झाल्यामुळे मौल्यवान वेळ वाया जाऊ नये हे रूबी हॉल क्लिनिकमध्ये आमचे ध्येय आहे. हे दुहेरी प्रमाणपत्र म्हणजे वैद्यकीय उत्कृष्टतता आणि करूणामय उपचार सेवेसाठी आमच्या वचनबध्दतेचे प्रतिबिंब आहे.तातडीच्या वैद्यकीय परिस्थितीचे रूपांतर पुर्नप्राप्तीच्या यशोगाथांमध्ये करण्यात आमच्या स्ट्रोक टीममधील प्रत्येक सदस्य महत्त्वाची भूमिका बजावतो.
रूबी हॉल क्लिनिकच्या न्युरो इंटेंसिव्ह केअर युनिटचे प्रमुख डॉ.कपिल झिरपे म्हणाले की, स्ट्रोक उपचारामध्ये वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.आमचे संरचित प्रोट्रोकॉल्स समर्पित टीम आणि रॅपिड रिस्पॉन्स प्रणाली यामुळे काही मिनिटांतच निदान व उपचार करण्यास शक्य होते आणि यामुळे रूग्ण जगण्याची तसेच बरे होण्याच्या बाबतीत चांगले परिणाम मिळण्याची शक्यता लक्षणीयरित्या
वाढते.


