डीबीएस फाउंडेशन x संपर्क फाउंडेशन: फाउंडेशनल लर्निंग प्रोग्राम स्केलेबल तरतुदींद्वारे शिक्षणाला बळकटी देतो आणि डीबीएसएफच्या दर्जेदार शिक्षणासह आवश्यक गरजा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करतो.
महाराष्ट्र, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशमधील 12,700 हून अधिक सरकारी शाळांमधील शैक्षणिक निकाल सुधारण्यासाठी डीबीएस फाउंडेशनने 4.21 दशलक्ष सिंगापूर डॉलर (अंदाजे ₹27.1 कोटी) देण्याचे आश्वासन दिले आहे.
मुंबई, २८ ऑक्टोबर 2025: साक्षरता आणि अंकज्ञानाचे प्राथमिक शिक्षण सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, डीबीएस फाउंडेशनने (DBSF) संपर्क फाउंडेशनसोबत भागीदारी केली आहे. या माध्यमातून डीबीएस फाउंडेशन x संपर्क फाउंडेशन: फाउंडेशनल लर्निंग प्रोग्राम सुरू करून वंचित मुलांसाठी शिक्षणाचा योग्य परिणाम साधू शकतील.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, डीबीएस फाउंडेशनने तीन वर्षांत (2025-2028) 4.21 दशलक्ष सिंगापूर डॉलर (अंदाजे ₹27.1 कोटी) देण्याचे आश्वासन दिले आहे. या अंतर्गत महाराष्ट्र, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशमधील 12,700 हून अधिक सरकारी शाळांमधील 5,12,000 विद्यार्थ्यांना फायदा करून देणे, हा याचा उद्देश आहे.
वंचित समाजाचे जीवन अधिक चांगले व्हावे तसेच त्यांना उपजीविकेसाठी उत्तम पर्याय देण्यासाठी ही भागीदारी डीबीएसएफच्या प्रयत्नांशी सुसंगत आहे. आवश्यक गरजा पुरवण्यासोबतच सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देणे – या दोन प्रमुख स्तंभांच्या साहाय्याने फाऊंडेशन नावीन्यपूर्ण, धोरणात्मक आणि स्केलेबल कार्यक्रमांना समर्थन देते जे संवेदनाक्षम समुदायांना सक्षम करतात.
डीबीएस फाउंडेशन आणि डीबीएस ग्रुप स्ट्रॅटेजिक मार्केटिंग अँड कम्युनिकेशन्सच्या प्रमुख करेन न्गुई म्हणाल्या, “आयुष्याच्या सुरुवातीलाच एक मजबूत नियोजन ही दीर्घकालीन लवचिकता निर्माण करण्याची गुरुकिल्ली आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे. शिक्षण हे समतेच्या सर्वात शक्तिशाली चालकांपैकी एक आहे आणि संपर्क फाउंडेशनसोबतची आमची भागीदारी ही ग्रामीण समुदायातील मुलांसाठी शिक्षणातील तफावत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवते. शैक्षणिक उपक्रमांवर लक्ष केंद्रित करून, विद्यार्थ्यांच्या भरभराटीसाठी आवश्यक कौशल्ये आणि आत्मविश्वास प्रदान करण्याची तसेच जीवनाच्या सर्व टप्प्यांतून यशस्वीपणे पार पडण्यासाठी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
संपर्क फाउंडेशनची सामाजिक शाखा आणि भागीदारी प्रमुख अरुण भट्ट म्हणाले, “प्रचंड प्रमाणात परिवर्तनासाठी काटकसरीने नवोपक्रम, सखोल सहकार्य तसेच परिणाम घडवण्याची वचनबद्धता आवश्यक आहे. डीबीएस फाउंडेशनसोबतची आमची भागीदारी आम्हाला संपूर्ण भारतातील मुलांसाठी परस्परसंवादी आणि शाश्वत शिक्षण अनुभव सक्षम करण्याच्या आमच्या ध्येयाच्या अगदी जवळ आणते. राज्य सरकारांसोबत काम करून, आम्ही या नवोपक्रमांना सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेत अंतर्भूत करत आहोत.”
डीबीएस फाउंडेशन x संपर्क फाउंडेशन: फाउंडेशनल लर्निंग प्रोग्राम हा राज्याच्या शैक्षणिक प्राधान्यांशी जोडलेला आहे. प्रमाण तसेच शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश सरकारांसोबत गैर-आर्थिक सामंजस्य करार करण्यात आले आहेत. ज्यामुळे सार्वजनिक शिक्षण चौकटीत या उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. स्केलेबिलिटी आणि सरकारी सह-मालकीच्या दृष्टीने हे मॉडेल तयार करण्यात आले आहे. 2028 पर्यंत साक्षरता, संख्याशास्त्र आणि विज्ञान या विषयातील विद्यार्थ्यांचे निकाल अंदाजे 30% सुधारणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. जे वेळोवेळी केलेल्या मूल्यांकनांद्वारे मोजले जाईल.
परस्परसंवादी शिक्षण साधनांनी वर्गखोल्या सुसज्ज करून तसेच शिक्षकांना संरचित प्रशिक्षण देऊन, हा कार्यक्रम शिक्षण व्यवस्थेतील नेहमीच होणाऱ्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करतो. नोंदणीत वाढ होऊनही, भारतातील अनेक विद्यार्थ्यांना मजबूत पायाभूत साक्षरता आणि संख्या कौशल्यांची आवश्यकता आहे. यावर ठोस उपाययोजनांद्वारे काम केले जाईल:
· इयत्ता 1 ते 5: फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी (FLN) बॉक्सची ओळख – इंटरनेटची गरज नसलेला प्लग-अँड-प्ले डिव्हाइस ज्यामध्ये राज्य अभ्यासक्रमाशी संबंधित सामग्री आणि LED टीव्ही प्रीलोड केलेले आहेत. तसेच गणित, हिंदी आणि इंग्रजी प्रावीण्याला पाठबळ देण्यासाठी मॅनिपुलेटिव्ह्ज आणि बोर्ड गेम्ससारखी साधने.
· इयत्ता 6 ते 8: एलईडी टीव्ही आणि संपर्क सायन्स बॉक्सची रचना – विज्ञानाचे शिक्षण तसेच STEM शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी इयत्ता 6 ते 8साठी शालेय अभ्यासक्रमाशी जोडलेल्या सामग्रीसह प्रीलोड केलेले ऑफलाइन, प्लग-अँड-प्ले डिव्हाइस.
शिक्षणाची आवड टिकवून ठेवण्यात तसेच उत्तम निकाल आणण्यातील शिक्षकांची महत्त्वाची भूमिका ओळखून, हा कार्यक्रम त्यांना शैक्षणिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी ठेवतो. समावेशक आणि नावीन्यपूर्ण अध्यापनशास्त्रातील प्रत्यक्ष प्रशिक्षणाद्वारे, शिक्षकांना आकर्षक आणि प्रभावी अनुभव देण्यासाठी सुसज्ज केले जाईल.
2005 पासून, संपर्क फाउंडेशनने 1.84 कोटी मुलांना प्रशिक्षित केले आहे तर 8 लाख 50 हजार शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. 41 हजार संपर्क टीव्हीचे वितरण केले आहे आणि भारतातील आठ राज्यांमध्ये 2 लाख 78 हजार टीच-इझी किट्सचे वाटप केले आहे. हा कार्यक्रम डीबीएस फाउंडेशनच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. यात मोठ्या प्रमाणात सामाजिक प्रभाव निर्माण करण्यासाठी इकोसिस्टममध्ये समान विचारसरणीच्या भागीदारांना पाठिंबा दिला जातो आणि त्यांच्यासोबत काम केले जाते.
पुढील दहा वर्षांत, ते 1 अब्ज सिंगापूर डॉलर उभे करण्यासाठी वचनबद्ध असेल, तसेच जीवन आणि उपजीविका सुधारण्यासाठी त्यांच्या क्षेत्रात 1.5 दशलक्ष कर्मचारी कार्यरत असतील अशी घोषणा डीबीएसने 2023 मध्ये केली. संपर्क फाउंडेशनसोबतचा कार्यक्रम या प्रयत्नांचा एक भाग आहे. “लिव्ह मोअर, लेस बँकिंग” या डीबीएसच्या ब्रँड वचनाला मूर्त रूप देत, डीबीएस फाउंडेशन प्रत्येक वयात आणि प्रत्येक परिस्थितीत चांगले जगण्याचे सामर्थ्य देते. भारतात हे प्रामुख्याने लहान मुलांना आवश्यक शिक्षणाची उपलब्धता सुनिश्चित करण्यापासून सुरू होते, जे उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.
हा समग्र दृष्टिकोन डीबीएस बँक इंडियाच्या तत्त्वज्ञानाशी थेट जोडला जातो: ज्याप्रमाणे फाउंडेशन जीवनाच्या विविध टप्प्यांत व्यक्तीला आधार देते, त्याचप्रमाणे डीबीएस बँक इंडिया देखील त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून व्यवसायांशी जोडलेली असते. सुरुवातीला एसएमई आणि नंतर मोठ्या कॉर्पोरेट्समध्ये त्यांची प्रगती होईल, यासाठी प्रयत्न करते. ही वचनबद्धता किरकोळ ग्राहकांना देखील लागू होते. त्यांचे पहिले वेतन खाते उघडण्यापासून ते त्यांच्या संपत्ती निर्मितीच्या प्रवासात भागीदार होण्यापर्यंतच्या जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये डीबीएस बँक इंडिया त्यांच्या बँकिंग गरजांना पाठिंबा देते.


