Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedदुसऱ्या पुना क्लब ओपन गोल्फ स्पर्धेत मोहम्मद अझहर पहिल्या फेरीत आघाडीवर

दुसऱ्या पुना क्लब ओपन गोल्फ स्पर्धेत मोहम्मद अझहर पहिल्या फेरीत आघाडीवर

पुणे, २८ ऑक्टोबर २०२५: पुण्यातील नामवंत गोल्फ क्लब पुना क्लब लिमिटेड आणि प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया(पीजीटीआय) यांच्या वतीने संयुक्तपणे आयोजित दुसऱ्या पुना क्लब ओपन गोल्फ स्पर्धेत हैद्राबादच्या मोहम्मद अझहरने पहिल्या दिवशी सात अंडर ६४ दोशांक नोंदवत एका शॉटने आघाडी घेतली.

 

पूना क्लबच्या गोल्फ कोर्सवर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पीजीटीआय अव्वल खेळाडू युवराज संधूने सहा अंडर ६५ चा दोशांक नोंदवत दुसरे स्थान घेतले आहे. २०२४ चा पीजीटीआय मानांकन विजेता गुरुग्रामचा वीर अहलावत (६६) याने तिसरे स्थान मिळवले आहे.

 

पूना क्लब ओपन २०२५ स्पर्धेला यजमान पुना क्लब गोल्फ कोर्स यांच्यासह व्हॅनकॉब आणि एनईसीसी यांचे मुख्य प्रायोजक लाभले असून व्हेंटिव्ह, एसकेएस फास्टनर्स, एलिका, मार्व्हेल रिअल्टर्स, शुबान इन्व्हेस्टमेंटस, डीएफएमसी, ऑटोमेक अँड कायनेटिक, नोव्होटेल पुणे नगर रोड यांचे सह प्रायोजकत्व लाभले आहे. भारतात व्यावसायिक गोल्फ वाढवण्यासाठी पीजीटीआयच्या सततच्या प्रयत्नांना रोलेक्स, अमूल, इंडसइंड बँक, व्हिक्टोरियस चॉईस, कॅम्पा, अमृतांजन इलेक्ट्रो प्लस यांचा पाठिंबा लाभला आहे.

 

अक्षय दामले,एरोन रॉकी, आदित्य भांडारकर, आदित्य गर्ग आणि हौशी अर्किन पटेल हे पाच खेळाडू पुण्यातील खेळाडूंमध्ये सर्वोच्च स्थानावर होते. त्यांनी ७१ गुणांसह संयुक्त २९ वे स्थान पटकावले.

 

 

सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या अझहरने सुरुवात पहिल्या दोन होलवर बर्डी-बोगीने केली. तथापि, त्याने लवकरच तिसऱ्या होलवर ३५ फूट रूपांतरणासह फ्रंट-नऊमध्ये आणखी तीन बर्डी जोडून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली.

 

पीजीटीआय मानांकन यादीत सध्या २३ व्या क्रमांकावर असलेल्या अझहरने बॅक-नाइनवर आणखी चार बर्डी घेतल्या ज्यामध्ये एक टॅप-इन आणि १८ फूट रूपांतरणाचा समावेश हो

ता.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments