Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorized३० व ३१ ऑक्टोबर रोजी युवा तालचक्र तर १ नोव्हेंबर रोजी तालचक्र...

३० व ३१ ऑक्टोबर रोजी युवा तालचक्र तर १ नोव्हेंबर रोजी तालचक्र महोत्सवाची पुणेकरांना पर्वणी

पुणे, दि. २९ ऑक्टोबर, २०२५ : तालवाद्यांचा देशातील एक महत्त्वाचा संगीत महोत्सव म्हणून सर्वपरिचित असलेला तालचक्र महोत्सव यंदा ३०, ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. तालचक्र महोत्सवा अंतर्गत आयोजित करण्यात येणारा तालचक्र युवा महोत्सव हा ३० व ३१ ऑक्टोबर रोजी तर मुख्य तालचक्र महोत्सव हा १ नोव्हेंबर रोजी संपन्न होईल अशी माहिती महोत्सवाचे आयोजक आणि सुप्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे यांनी कळविली आहे. पहिले दोन दिवस विधी महाविद्यालय रस्त्यावरील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर मधील अॅम्फी थिएटर येथे सायं ६ वाजल्यापासून तर तिसऱ्या व शेवटच्या दिवशी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सायं. ५ वाजल्यापासून तालचक्र महोत्सव संपन्न होणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार असून कार्यक्रम स्थळी काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील असेही आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे. महोत्सवास पुनीत बालन समूहाचे सहकार्य लाभले आहे.

 

याविषयी अधिक माहिती देताना पद्मश्री पं विजय घाटे म्हणाले, “तालवाद्य व वादक यांना केंद्रस्थानी ठेऊन आम्ही या महोत्सवाचे आयोजन करीत आहोत. तालचक्र महोत्सवाचे हे १३ वर्षे असून संगीत क्षेत्रातील आश्वासक युवा कलाकारांना या महोत्सवामध्ये हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने गेल्या काही वर्षापासून तालचक्र युवा महोत्सव ही संकल्पनाही आम्ही यशस्वीपणे राबवत आहोत.”

 

गुरुवार दि. ३० ऑक्टोबर रोजी सायं ६ वाजता युवा तबलावादक निशित गंगाणी यांच्या एकल तबलावादनाने महोत्सवाला सुरुवात होईल. यानंतर पं जितेंद्र अभिषेकी यांचे नातू आणि पं. शौनक अभिषेकी यांचे पुत्र व शिष्य असलेल्या अभेद अभिषेकी यांचा ‘स्वर अभिषेक’ हा कार्यक्रम होईल. पहिल्या दिवसाचा समारोप अमन वरखेडकर आणि प्रतिक पंडित यांच्या व्हायोलिन- सतार सहवादनाने होईल. शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी युवा तालचक्रची सुरुवात सायं ६ वाजता कृष्णा साळुंखे यांच्या ‘शिवतांडव’ या कार्यक्रमाने होईल. यानंतरच्या दुसऱ्या सत्रात ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या विजेत्या असलेल्या अंजली व नंदिनी गायकवाड या गायक भगिनी शास्त्रीय गायन सादर करतील.

 

शनिवार दि. १ नोव्हेंबर रोजी सायं ५ वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे अजराडा घराण्याच्या सातव्या पिढीचे प्रतिनिधी, प्रसिद्ध तबलावादक उस्ताद अक्रम खान आणि पं. किशन महाराज यांचे शिष्य व बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक पं. अरविंद कुमार आझाद यांची तबला जुगलबंदी रसिकांना मोहवून टाकेल. यानंतर विवेक राजगोपालन यांच्या ‘ता धोम…’ प्रोजेक्ट या कार्यक्रम सादर होईल. यामध्ये हिप हॉप संगीत व भारतीय संगीताचा एक अनोखा मेळ रसिकांना अनुभवता येईल. पद्मश्री उस्ताद शाहीद परवेझ आणि पद्मश्री पं. विजय घाटे यांचे सतार व तबला सहवादन सादरीकरणाने १३ व्या तालचक्र महोत्सवाचा समारोप हो

ईल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments