Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorized20व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेटअजिंक्यपद स्पर्धेत 16 संघ...

20व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेटअजिंक्यपद स्पर्धेत 16 संघ सहभागी · स्पर्धेस 1 नोव्हेंबर 2025 पासून प्रारंभ

पुणे, 30 ऑक्टोबर, 2025: आयडीयाज-अ-सास कंपनी यांच्या वतीने आयोजित 20व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेटअजिंक्यपद स्पर्धेत शहरांतील नामांकित आयटी क्षेत्रातील 16 संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा 1 नोव्हेंबर 2025 पासून पीसीएमसी येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी मैदानावर सुरु होणार आहे.

 

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना आयडीयाज-अ-सास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक के.एस. प्रशांत, वित्तीय विभागाच्या प्रमुख मल्लिका जेम्स यांनी सांगितले की, 2005 मध्ये अंकुर जोगळेकरचे अपघातात निधन झाले. अंकुर हा आयडीयाज अ सास कंपनी काम करत होता. त्याचबरोबर तो एक गुणवान अष्टपैलू क्रिकेटपटू देखील होता. त्याने 19वर्षाखालील संघात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व देखील केले होते व विदर्भच्या राष्ट्रीय संघात देखील त्याचा समावेश होता.

 

आयडीयाज अ सास कंपनीच्या वतीने गेली 20 वर्षे अंकुर जोगळेकरच्या स्मृतिप्रीत्यर्थ अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेटअजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सुरक्षित वाहन चालविणे, रोड सेफ्टी आणि ट्रॅफिकचे नियम पाळणे याबाबत जागरूकता करणे हा यामागील उद्देश आहे. ह्या जागृकतेत कोलते पाटील डेव्हलपर्स लिमिटेड यांनी पण इडिअस या सास कंपनी बरोबर येण्याचं निर्णय ह्या स्पेर्देत घेतला आहे.

 

स्पर्धेत आयटी क्षेत्रातील इन्फोसिस(गतविजेता), टीसीएस(गतउपविजेता), कॉग्निझंट, यार्डी, एसएसअँडसी टेक्नॉलॉजीज, डॉइश बँक, केपीआयटी, अॅमडॉक्स, सायबेज सॉफ्टवेअर, आरुस टेक, बॉश ग्लोबल सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज, आयडीयाज अ सास कंपनी, सिटी, एफआयएस ग्लोबल, ब्रिटिश पेट्रोलियम आणि अलायन्स बर्नस्टीन हे संघ आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

 

स्पर्धेचे सामने साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. प्रत्येक गटात चार संघ अशी चार गटात विभागणी करण्यात आली असून यातील अव्वल दोन उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना रविवार, 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. स्पर्धेत एकूण 85,000/- रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असून यामध्ये स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 50,000/- रुपये, तर उपविजेत्या संघाला करंडक व 30,000/- रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय मालिकावीराला 5,000/- रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

 

स्पर्धेचे उदघाटन आयडीयाज-अ-सास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक के.एस. प्रशांत, वित्तीय विभागाच्या प्रमुख मल्लिका जेम्स, आयडीयाज इंडिया ऑपरेशन्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष राजीव नाशिककर, अंकुर जोगळेकर मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष विंग कमांडर उदय जोगळेकर, उपाध्यक्ष विजय जोगळेकर यांच्या हस्ते करण्यात येणार

आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments