Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedमेडिकव्हर हॉस्पिटल, पुणे येथे वर्ल्ड स्ट्रोक डे निमित्त अत्याधुनिक न्युरो सेंटरचे उद्घाटन

मेडिकव्हर हॉस्पिटल, पुणे येथे वर्ल्ड स्ट्रोक डे निमित्त अत्याधुनिक न्युरो सेंटरचे उद्घाटन

 

 

पुणे, २९ ऑक्टोबर २०२५: वर्ल्ड स्ट्रोक डे निमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल, पुणे येथे अत्याधुनिक अॅडव्हान्स्ड न्युरो सेंटरचे भव्य उद्घाटन करण्यात आले. हे केंद्र विविध न्युरोलॉजिकल आणि न्युरोसर्जिकल आजारांसाठी सर्वसमावेशक आणि अत्याधुनिक उपचार सुविधा प्रदान करणारे असून, रुग्णांच्या सर्वांगीण न्युरो केअर साठी एकाच छताखाली अनेक सेवा उपलब्ध करून देते.

 

या केंद्रात पेडियाट्रिक न्युरोफिजिशियन क्लिनिक (मुलांचे मेंदू आणि नर्व्ह केअर), स्पाईन करेक्शन क्लिनिक (कायफोसिस आणि स्कोलियोसिस), अॅडव्हान्स्ड आणि मिनिमली इनव्हेसिव्ह न्युरोसर्जरी क्लिनिक, व्हर्टिगो क्लिनिक (बॅलन्स, चक्कर येणे व इनर इअर केअर), न्युरो इंटरव्हेन्शन क्लिनिक (स्ट्रोक, अँजिओग्राफी आणि अॅडव्हान्स्ड व्हॅस्क्युलर केअर), न्युरो डायग्नॉस्टिक्स (EEG, NCV, EMG, VEP, BERA) आणि एपिलेप्सी क्लिनिक अशा विविध विशेष सेवा सुरु करण्यात आल्या आहेत.

 

या अॅडव्हान्स्ड न्युरो सेंटरमध्ये २४x७ तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता ठेवण्यात आली असून, स्ट्रोकसारख्या आपत्कालीन अवस्थांमध्ये तातडीने निदान आणि उपचार सुरू करता येतील. या केंद्रात डॉ. भगवान एम. आगें (कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल न्युरोसर्जन), डॉ. निनाद रमेश पाटील (कन्सल्टंट न्युरोसर्जन), डॉ. कुनाल बाबासाहेब जाधव (कन्सल्टंट न्युरोलॉजिस्ट) आणि डॉ. प्रतीक बाबेल (कन्सल्टंट अडल्ट आणि पेडियाट्रिक न्युरोलॉजिस्ट) या तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे.

 

उद्घाटन समारंभाला डॉ अनु गायकवाड डॉ. विकास पाटील (अध्यक्ष, आलंदी चार्होळी डॉक्टर्स असोसिएशन, NIMA, PCMC), डॉ. संतोष भांडवलकर (उपाध्यक्ष, NIMA, PCMC), डॉ. हेमा चंद्रशेखर (अध्यक्ष, NIMA महिला विभाग, PCMC), डॉ. रमेश केदार (सचिव, NIMA, PCMC) आणि डॉ. नितिनकुमार जाधव (खजिनदार, आलंदी चार्होळी डॉक्टर्स असोसिएशन) डॉ. प्रफुल्ल नारखेड़े (अध्यक्ष, भोसरी डॉक्टर्स असोसिएशन, NIMA, PCMC),यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

या प्रसंगी बोलताना डॉ. व्यास मौर्य, सेंटर हेड, मेडिकव्हर हॉस्पिटल, पुणे म्हणाले, “अॅडव्हान्स्ड न्युरो सेंटरच्या माध्यमातून आम्ही पुणे आणि पीसीएमसी परिसरातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या स्ट्रोक आणि न्युरो केअर सुविधा उपलब्ध करून देत आहोत. योग्य वेळी निदान, तज्ज्ञ हस्तक्षेप आणि पुनर्वसन हे स्ट्रोक व्यवस्थापनातील सर्वात महत्त्वाचे टप्पे आहेत. हे केंद्र आमच्या उत्कृष्टता, करुणा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.”

 

डॉ. भगवान एम. आगें, कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल न्युरोसर्जन यांनी सांगितले, “स्ट्रोकच्या उपचारात प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. रुग्ण वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यास मेंदूवरील परिणाम कमी करून जीव वाचवता येतो.”

 

डॉ. निनाद रमेश पाटील, कन्सल्टंट न्युरोसर्जन यांनी नमूद केले, “स्ट्रोकबाबत जनजागृतीसोबतच तत्काळ उपचार देणाऱ्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणे तितकेच आवश्यक आहे. आमचे केंद्र यासाठी पूर्ण सज्ज आहे.”

 

डॉ. कुनाल बाबासाहेब जाधव, कन्सल्टंट न्युरोलॉजिस्ट म्हणाले, “स्ट्रोकची प्राथमिक लक्षणे — चेहऱ्यावर वाकडेपणा, हात-पायात अशक्तपणा, बोलण्यात अडचण — ओळखणे आणि त्वरित उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे.”

 

डॉ. प्रतीक बाबेल, कन्सल्टंट अडल्ट व पेडियाट्रिक न्युरोलॉजिस्ट यांनी सांगितले, “मुलांनाही काही वेळा न्युरोलॉजिकल अडचणी उद्भवू शकतात आणि योग्य वेळी उपचार सुरू केल्यास परिणामकारक फरक पडतो. या केंद्राच्या माध्यमातून आम्ही सर्व वयोगटांसाठी विशेष न्युरोलॉजिकल सेवा देणार आहोत.”

 

या उपक्रमाद्वारे मेडिकव्हर हॉस्पिटल, पुणेने न्युरो आणि इमर्जन्सी मेडिसिन क्षेत्रात आपली उत्कृष्टता आणि समाजसेवेची बांधिलकी अधिक दृढ केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments