Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedजपानची नंबर १ एमबीए असलेल्या ग्लोबिस युनिव्हर्सिटीकडून भारतात भविष्यातील उद्योग लीडर्सच्या सहभागासाठी...

जपानची नंबर १ एमबीए असलेल्या ग्लोबिस युनिव्हर्सिटीकडून भारतात भविष्यातील उद्योग लीडर्सच्या सहभागासाठी परिषदेचे आयोजन* 

 

 

प्रेसिडेंट योशितो होरी यांनी मुंबई येथील कार्यक्रमात टेक्नोव्हेट नेतृत्व आणि आंतर सीमा नावीन्यपूर्णता यांबाबत आपली मते व्यक्त केली.

 

मुंबई, ०२ नोव्हेंबर २०२५: जपानमधील सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी बिझनेस स्कूल असलेल्या ग्लोबिस युनिव्हर्सिटीने मुंबईत “रेव्होल्यूशनायझिंग बिझनेस एज्युकेशन इन द टेक्नॉव्हेट एज्युकेशन” या सार्वजनिक चर्चासत्राचे आयोजन करून भारताशी आपले संबंध मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. ग्लोबिस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष आणि संस्थापक योशितो होरी यांच्या नेतृत्वाखालील या चर्चासत्रात इच्छुक विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक, माजी विद्यार्थी आणि उद्योगातील नेत्यांना एआयचलित जगात नेतृत्वाच्या व्यापक घटकांचा आढावा घेण्यासाठी एकत्र आणले.

 

ग्लोबिसची स्थापना १९९२ मध्ये झाली असून ती जपानमधील सर्वात मोठ्या बिझनेस स्कूलपैकी एक आहे. तिची कार्यालये आणि कॅम्पस सिंगापूर, थायलंड, युनायटेड स्टेट्समध्ये आहेत आणि आता पुढील वर्षी भारतात सुरू करण्याची योजना आहे. टेक्नॉव्हेट (तंत्रज्ञान + नवसंशोधन) आणि कोकोरोझाशी (वैयक्तिक ध्येय) वर लक्ष केंद्रित करण्यासाठी ओळखले जाणारी ग्लोबिस व्यवसाय शिक्षण आणि उद्देश यांना एकत्र जोडते. जागतिक शिक्षण वातावरणाशी स्वतःला जोडण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी टोकियोमध्ये १ वर्षाचा पूर्ण-वेळ एमबीए, तसेच शैक्षणिक काठिण्याशी तडजोड न करता लवचिकता शोधणाऱ्या कार्यरत व्यावसायिकांसाठी डिझाइन केलेले २ वर्षांचे अर्ध-वेळ आणि ऑनलाइन एमबीए अभ्यासक्रम देते.

 

ग्लोबिस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष योशितो होरी म्हणाले, “ग्लोबिस इंडियाचे अनावरण करण्याचा ग्लोबिसला अभिमान वाटतो. त्यामुळे ग्लोबिसचे व्यावहारिक, कोकोरोजाशी

 

(मिशनची भावना) आणि टेक्नोव्हेट (टेक इनोव्हेशन) वर आधारित एमबीए शिक्षण येथील इच्छुक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते. जपानमधील नंबर १ बिझनेस स्कूल बनलेली ग्लोबिस आता टेक्नोव्हेट युगात जगातील नंबर १ बिझनेस स्कूल बनण्याचे उद्दिष्ट ठेवते. भारतात भविष्यातील गुंतवणूकींद्वारे अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

 

ग्लोबिस विद्यापीठाने कोकोरोजाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तत्वज्ञानाच्या नाविन्यपूर्ण, व्यावहारिकता आणि वैयक्तिक ध्येय एकत्रित करून जपानमध्ये व्यवसाय शिक्षणाची पुनर्परिभाषा केली आहे. जपानमधील सर्वात मोठी एमबीए संस्था असलेल्या ग्लोबिसने आपल्या केस-आधारित, सराव अभ्यासक्रम देण्याच्या दृष्टिकोनाने आणि उद्देशावर केंद्रीभूत नेतृत्वावर जोरदार भर देऊन पारंपरिक शैक्षणिक मॉडेलला छेद दिला आहे. संपूर्ण जपानमधील कॅम्पस आणि सिंगापूर, बँकॉक, सॅन फ्रान्सिस्को आणि ब्रुसेल्समधील कार्यालयांसह आता हे विशिष्ट मॉडेल भारतात विस्तारत आहे. त्यामुळे नवीन पिढीतील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर सुसंगत, मूल्याधारित व्यवसाय शिक्षणाची सुविधा मिळते.

 

भारतातील सहभाग वेगाने वाढवणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये व्यवसाय शिक्षणाची उपलब्धता वाढवण्यासाठी ग्लोबिसच्या व्यापक जागतिक धोरणाचे प्रतिबिंबित करतो. २०३० पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा अंदाज आहे आणि सर्वात तरुण व्यावसायिक लोकसंख्येपैकी एक आहे. त्यामुळे ग्लोबिसचे उद्दिष्ट वैयक्तिक वाढ आणि राष्ट्रीय प्रगतीला समर्थन देणाऱ्या नेतृत्व विकासात योगदान देणे आहे.

 

या सेमिनारमध्ये उपस्थितांना ग्लोबिसमधील वातावरणाची ओळख करून देण्यात आली. ती शैक्षणिक क्षेत्राच्या पलीकडे विस्तारते आणि त्यात जपानमधील सर्वात मोठ्या व्हीसी फर्मपैकी एक असलेल्या ग्लोबिस कॅपिटल पार्टनर्स आणि मागणीनुसार उपलब्ध असलेले ग्लोबिस अनलिमिटेड हे बिझनेस मायक्रोलर्निंग प्लॅटफॉर्म समाविष्ट आहे. ग्लोबिसचा अनोखा प्री-एमबीए प्रोग्राम विद्यार्थ्यांना पूर्ण एमबीए करण्यापूर्वी लहान, व्यावहारिक अभ्यासक्रमांद्वारे व्यवसायाच्या मूलभूत गोष्टी शिकणे शक्य करतो. स्थानिक हब कॅम्पसच्या उद्घाटनानंतर हा कार्यक्रम भारतात देखील उपलब्ध करून दिला जाईल, जो भारतीय व्यावसायिकांना आणि करिअरची सुरूवात करत असलेल्यांना प्रमुख व्यवस्थापन संकल्पनांचा शोध घेण्याचा आणि ग्लोबिसच्या पूर्ण-वेळ, अर्ध-वेळ किंवा ऑनलाइन एमबीएसाठी तयारी करण्याचा एक लवचिक मार्ग देईल.

 

उपस्थितांना नेतृत्व, एआय, उद्योजकता आणि व्यवसाय परिवर्तनाबद्दल माहितीची देवाणघेवाण करण्याची आणि त्यांच्या करिअर आणि एमबीएबाबत योजनांवर अध्यक्ष होरी आणि ग्लोबिस टीमशी थेट सल्लामसलत करण्याची संधी मिळाली.

 

ग्लोबिस युनिव्हर्सिटीबाबत अधिक माहितीसाठी आणि प्रवेश सल्लागाराशी सल्लामसलत करण्यासाठी कृपया https://www.globis.ac.jp/ ला भेट द्या किंवा imba-info@globis.ac.jp वर ईमेल करा.

 

प्रसारमाध्यमांच्या चौकशीसाठी संपर्क:

gaurav.kocher@edelman.com

vaishnavi.kalia@edelman.com

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments