Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्रिकेट थांबले तेव्‍हा संगीत सुरू झाले, कोका-कोला इंडियाने आयसीसी विमेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड...

क्रिकेट थांबले तेव्‍हा संगीत सुरू झाले, कोका-कोला इंडियाने आयसीसी विमेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कप उपांत्‍य फेरीच्‍या सामन्‍यामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर केली

मुंबई, ऑक्‍टोबर ३१, २०२५: नवी मुंबईमध्‍ये खेळवण्‍यात आलेल्‍या आयसीसी विमेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कप उपांत्‍य फेरीच्‍या सामन्‍यामध्‍ये उत्‍साह आणि तालाची भर करत कोका-कोलाच्‍या हाफटाइम मोहिमेने आनंददायी पुनरागमन केले, जेथे सामन्‍यामधील ब्रेकला सीझनच्‍या उत्‍साहपूर्ण साजरीकरणामध्‍ये बदलले. स्‍टेडियममधील स्‍टॅण्‍डमध्‍ये गाणे व उत्‍साहाचे वातावरण पसरले असताना सामन्‍यामधील ब्रेक ताजेतवाने, उत्‍साहित होण्‍याचा आणि पुन्‍हा जुळून जाण्‍याचा क्षण ठरला. कोक स्‍टुडिओ भारतचे संगीत आणि थंडगार कोका-कोलाच्‍या अद्वितीय फिझसह हाफटाइमने खेळामध्‍ये रोमांचची भर केली.

 

आदित्‍य गढवी यांनी इनिंग ब्रेकदरम्‍यान मंचावर पुढाकार घेतला, कान्‍स लायन्‍स पुरस्‍कार विजेते शोधाचे गीत ‘खलासी’ आणि गुजरातच्‍या लोकगीत वारसाला उत्‍साही मानवंदना देत ‘मीठा खारा’ या गाण्यांसह प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या परफॉर्मन्‍समध्‍ये कोक स्‍टुडिओ भारतच्‍या पैलूला सादर करण्‍यात आले. कोक स्‍टुडिओ भारत हे कोका-कोलाचे भारताील हार्टलँडसाठी पुनर्कल्पित संगीत व्‍यासपीठ आहे, जे अस्‍सल प्रादेशिक कलांना प्रशंसित करते, तसेच स्‍थानिक गायकांना जागतिक प्रेक्षकांशी कनेक्‍ट करते. या प्‍लॅटफॉर्मच्‍या प्रामाणिकतेप्रती कटिबद्धतेने प्‍लॅटफॉर्मला संगीत प्रदर्शनासाठी भारतातील सर्वात प्रबळ माध्‍यम बनवले आहे, ज्‍यामुळे स्‍वदेशी टॅलेंट जागतिक मंचावर परफॉर्म करू शकतात.

 

आदित्‍य गढवी म्‍हणाले, ”संपूर्ण देश पाहत असताना व पाठिंबा देत असताना आयसीसी विमेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कप सारख्‍या मंचावर परफॉर्म करण्‍याची संधी दररोज मिळत नाही. कोक स्‍टुडिओ भारतसह मी क्रिकेट चाहते पाहत आहेत आणि उत्‍साह वाढवत आहेत अशा ठिकाणी मोठा होत गायलेल्‍या गाण्‍यांना सादर करत आहे. आमचे संगीत उत्‍साहात लोकांपर्यंत पोहोचत असल्‍याचे पाहून खूप आनंद होत आहे.”

 

कोका-कोला आयएनएसडब्‍ल्‍यूएचे आयएमएक्‍स (इंटीग्रेटेड मार्केटिंग एक्‍स्‍पीरिअन्‍स’ प्रमुख शंतनू गंगाणे म्‍हणाले, ”ग्राहकांचे लाइव्‍ह स्‍पोर्टसंदर्भात अनुभव बदलत आहेत, जेथे आज चाहते आपसात जुडण्यास इच्छुक आहेत. आयसीसीसोबत आमच्‍या सहयोगामधून ती जाणीव दिसून येते. सहयोगाने आम्‍ही सहभागाला चालना देणाऱ्या खेळासंदर्भात क्षणांना नव्‍या उंचीवर घेऊन जात आहोत. कोकचे हाफटाइम प्रदर्शन त्‍या तत्त्वाला प्रत्‍यक्षात आणते, ब्रेकला उत्‍साहपूर्ण क्षणामध्‍ये बदलते, जेथे क्रीडा, संगीत व रिफ्रेशमेंटचा एकत्र अनुभव मिळतो. कोक स्‍टुडिओ भारत क्रिकेट अनुभवामध्‍ये संस्‍कृती व भावनेची भर करते, असे काहीतरी निर्माण करते, जे भारतीय, पण वैश्विकदृष्‍ट्या संबंधित वाटते.”

 

आयसीसीचे चीफ कमर्शियल ऑफिसर अनुराग दाहिया म्‍हणाले, ”कोका-कोलासोबत आमचा सहयोग चाहते सीमेपलीकडे घेत असलेल्‍या क्रिकेटच्‍या अनुभवाला अधिक दृढ करत आहे. हाफटाइम एकीकरण त्‍या सहयोगाचे स्‍वाभाविक विस्‍तारीकरण आहे, जे चाहत्‍यांसोबत नव्‍या पद्धतीने संलग्‍न होण्‍यासाठी क्रीडा व संस्‍कृतीला एकत्र आणते. यामधून सर्वत्र प्रेक्षकांसाठी खेळाला अधिक सर्वसमावेशक, गतीशील व संबंधित बनवण्‍याप्रती, तसेच आयसीसी विमेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कपचा उत्‍साह साजरा करण्‍याप्रती आयसीसी विमेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कपची कटिबद्धता दिसून येते.”

 

स्‍टेडियममध्‍ये आदित्‍य यांचा परफॉर्मन्‍स सुरू होताच सर्वत्र उत्‍साहाचे वातावरण निर्माण झाले. थेट प्रसारण पाहणारे चाहते त्‍यांच्‍या घरामधून सामील झाले, तर ब्लिंकइटच्‍या कोक अॅट हाफ प्राइस ऑफरने हाफटाइमला मूर्त स्‍वरूपामध्‍ये बदलले, जेथे कोकचा आस्‍वाद घेत क्षणाचा भाग होण्‍याचा आनंद दिला. ही संकल्‍पना सर्वत्र दिसून आली, तेच संगीत, तोच ब्रेक, पण हजारो विविध पद्धतींसह शेअर करण्‍यात आले.

 

हाफटाइमला क्रीडा व संस्‍कृतीच्‍या समान क्षणात बदलत कोका-कोला व आयसीसी विमेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कप खेळाला नवीन आकार देत आहेत, जे फक्‍त धावफलकामधून नाही तर संगीत, ब्रेक आणि सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे प्रेक्षकवर्गामधून दिसून येते.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments