ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज्ड,मुंबई,इंडिया या संस्थेच्या वतीने देशभरातील 16 राज्यांची निमंत्रित दिव्यांगार्थ LIC ट्रॉफी 2025* ही क्रिकेट स्पर्धा मुंबईमध्ये पार पडत आहे.
सदर स्पर्धेसाठी ऑल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज्ड या संस्थेच्या मार्फत महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट संघ मुंबईला रवाना झालेला आहे. महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट संघातील खेळाडूंना एस.पी.जी उद्योगसमूहातर्फे सन्मानित करून आलेल्या सर्व खेळाडूंना विविध वस्तूंचे वाटप केलेत यात प्रामुख्याने जेनेसिस लेझर कंपनीचे कृष्णा गावरस्कर सर आणि चेतन सर यांच्या वतीने ट्रॅव्हलिंग बॅग ,श्री अशोक वाडकर यांच्या वतीने पुणे ते मुंबई प्रवास,श्री जयंत भोसले यांच्या सनी स्पोर्ट्सच्या वतीने कॅप पद्मश्री अजित वाडेकर क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून खेळाडूंना सराव ड्रेस,जुल्फिकार इंजिनिअरिंगचे श्री मनेर साहेब व श्री नवनाथ पारगे,श्री गणेश घुले यांच्या वतीने दिव्यांग खेळाडूंना मानधन,एस पी मॉल चे मालक श्री अभिजीत सट्टे यांस कडून गिफ्ट हॅम्पर व AMCAPC संस्थेच्या वतीने आय कार्ड या वस्तू पुरविण्यात आल्या.सदर महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट संघाला सर्व मान्यवरांनी या वस्तू दिल्याबद्दल संस्थेचे सचिव श्री राजू मुजावर सर माजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू यांनी आभार मानले.तसेच पद्मश्री अजित वाडेकर क्रिकेट अकॅडमी चे पदाधिकारी सौ सायली ताई पोंक्षे,श्री राहुल वाव्हळ श्री राहुल पांगारे,श्री शरद सावंत,श्री दत्तात्रेय दराडे साहेब,श्री अशोक वाडकर,श्री संजय कुंजीर,सौ पूजाताई पारगे या सर्व मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट खेळाडूंचा संघ मुंबई येथील *LIC ट्रॉफी 2025* ही स्पर्धा जिंकून येईल असा विश्वास महाराष्ट्र दिव्यांग संघाचा कर्णधार सोमनाथ नलावडे आणि माजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू श्री राजू मुजावर सर यांनी व्यक्त केला व सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा आभार मान
ले.


