Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedबायरकडून भारतात केरेंडिया™ (फायनेरेनोन) च्या वापराचा विस्तार, प्रिझर्व्ह्ड आणि सौम्य प्रमाणात कमी...

बायरकडून भारतात केरेंडिया™ (फायनेरेनोन) च्या वापराचा विस्तार, प्रिझर्व्ह्ड आणि सौम्य प्रमाणात कमी झालेल्या इजेक्शन फ्रॅक्शनसह हृदय विफलतेचा समावेश

 

 

• हृदय विफलतेचा (हृदयविकाराचा झटका नाही) आजार भारतात सुमारे १.३ दशलक्ष ते २.२७ दशलक्ष लोकांना असून आणि यातील सुमारे निम्मे रुग्ण संरक्षित इजेक्शन फ्रॅक्शनसह (एचएफपीईएफ) हृदय विफलतेने ग्रस्त आहेत. परंतु उपचारांचे पर्याय मर्यादित आहेत आणि निदानाला अनेकदा उशीर होतो.

• फायनेरेनोन हे पहिले आणि एकमेव नॉन-स्टेरॉइडल, निवडक एमआरए असून त्याच्या फेज III च्या अभ्यासात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी मृत्यू आणि एकूण हृदय बंद पडण्याच्या घटनांचा धोका १६% कमी करते, तसेच मूत्रपिंडाच्या आरोग्याचे रक्षण करत असल्याचे दिसले आहे.

 

भारत, ६ नोव्हेंबर २०२५: बायरने आज आपल्या नवीन थेरपी केरेंडिया™ (फाइनेरेनोन)ला भारतात हृदय विफलतेने ग्रस्त प्रौढ रुग्णांवर संरक्षित आणि किंचित कमी झालेल्या इजेक्शन फ्रॅक्शन (एचएफपीईएफ/ एचएफएमआरईएफ) वरील उपचारांसाठी मान्यता मिळाली आहे. हे टाइप २ मधुमेह (टी२डी) शी संबंधित क्रॉनिक किडनी डिसीजसाठी (सीकेडी) फाइनेरेनोनच्या विद्यमान मंजुरीवर (२०२२ मध्ये भारतात मिळालेल्या) आधारित आहे. त्यानुसार हे औषध मूत्रपिंडाच्या आजाराची प्रगती कमी करते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा (सीव्ही) धोका कमी करते हे सिद्ध झाले आहे.

 

बायरच्या फार्मास्युटिकल डिव्हिजनच्या भारत आणि देश विभाग प्रमुख श्वेता राय म्हणाल्या, “आम्ही वेगाने वैद्यकीय गरजा पूर्ण न होणाऱ्या भारतीय रुग्णांना वेगाने उपचार उपलब्ध करून देण्यावर भर देत आहोत. फायनेरोनच्या वापरातील विस्तारासह आम्ही हृदय विफलतेच्या विविध प्रकारांवर उपचार करत आहोत. हे आजार सुमारे अर्ध्या हृदय अपयशाच्या प्रकरणांसाठी जबाबदार आहेत परंतु त्यावर सिद्ध उपचार पुरेसे नाहीत. टाइप 2 मधुमेहाशी जोडलेल्या क्रॉनिक किडनी रोगातील कार्यासह फायनेरोन हृदयरोग आणि क्रॉनिक किडनी रोग अशा भारतातील सर्वात महत्त्वाच्या आरोग्य समस्यांवर बायरच्या नवसंशोधनाचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे हृदयरोगावरील उपचार आणि देशातील रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा करण्याप्रति आमची वचनबद्धता बळकट होते.”

 

 

हृदयविकाराचा झटका अचानक येतो परंतु हृदय विफलता हा आजार गंभीर प्रकारचा आजार आहे. त्यात हृदय शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे रक्त पंप करू शकत नाही. त्यामुळे थकवा, श्वासोच्छ्वासात त्रास आणि द्रवपदार्थ साठणे असे त्रास होतात. भारतीय जनतेत हा आजार वाढू लागला आहे. तो सुमारे १.३ दशलक्ष ते २.२७ दशलक्ष लोकांमध्ये आहे आणि दरवर्षी ०.५ ते १.८ दशलक्ष नवीन रुग्णांचे निदान होते. राष्ट्रीय नोंदणी डेटामधून असे दिसते की भारतीय रुग्णांना उच्च उत्पन्न असलेल्या देशांपेक्षा सुमारे दहा वर्ष आधीच हृदयरोग होतात आणि त्यांचे रुग्णालयात दाखल होण्याचे आणि मृत्युदराचे प्रमाण उच्च असते. सुमारे निम्मे रुग्ण संरक्षित किंवा किंचित कमी झालेल्या इजेक्शन फ्रॅक्शन (एचएफपीईएफ/ एचएफएमआरईएफ) सह जगतात. हा एक प्रकारचा एचएफ असून त्यात हृदयाचे पंपिंग कार्य सामान्य दिसते, परंतु स्नायू कडक असतात आणि त्याचे काम बिघडलेले असते. अशा प्रकारच्या एचएफमध्ये मृत्युदर आणि रुग्णालयात दाखल होणे या गोष्टींचा रूग्णांना धोका असतो. डिस्चार्ज झाल्यानंतर ३० दिवसांत ५ पैकी एका रूग्णाला पुन्हा रुग्णालयात दाखल केले जाते. प्रत्येक वेळी रुग्णालयात दाखल होत असताना मृत्यूचा धोका दुपटीने वाढतो.[1]

 

क्लिनिकल तपासणी, इकोकार्डियोग्राफी आणि बायोमार्कर अशा प्रगत रक्त चाचण्यांद्वारे एचएफपीईएफचे निदान केले जाते. निदान करणे अनेकदा कठीण असते कारण रुग्णांच्या नियमित हृदय चाचण्यांमध्ये स्पष्ट बदल दिसून येत नाहीत, श्वास लागणे, थकवा, पाय आणि घोट्यांमध्ये सूज येणे आणि व्यायामातील सहनशीलता कमी होणे अशी लक्षणे इतर आजारांशीही जोडली जाऊ शकतात आणि प्रगत रक्त चाचण्या नेहमीच उपलब्ध असतील असे नाही. विलंबाने निदान आणि मर्यादित उपचारांमुळे एचएफपीईएफ/ एचएफएमआरईएफमधील रुग्ण उपचार लक्षणांवरील नियंत्रण आणि सह-विकृतींच्या व्यवस्थापनापुरती मर्यादित राहिले आहेत. त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी उपचारांची एक महत्त्वपूर्ण गरज अपूर्ण राहिली आहे.

 

फायनेरेनोन हे एक नॉन-स्टेरॉइडल, सिलेक्टेड मिनरलोकॉर्टिकॉइड रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे. ते हृदय आणि मूत्रपिंड दोन्हीमध्ये जळजळ आणि फायब्रोसिसचा एक प्रमुख कारक असलेल्या एमआर ओव्हरएक्टिवेशनला प्रतिबंध करते. या माध्यमातून ते दुहेरी अवयव संरक्षण प्रदान करते आणि टाइप 2 मधुमेहाशी संबंधित दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजारात तसेच संरक्षित किंवा किंचित कमी झालेल्या इजेक्शन फ्रॅक्शनसह हृदय अपयशामध्ये सातत्यपूर्ण फायदे देणारी एकमेव थेरपी आहे.

 

भारतात मान्यता फाइनआर्ट्स- एचएफ फेज III चाचणीमधील डेटावर आधारित आहे. त्यात ३७ देशांमध्ये ६००० हून अधिक रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती. निष्कर्षांमध्ये रुग्णांच्या आरोग्य स्थितीत लक्षणीय सुधारणांसह हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी मृत्यू आणि एकूण हृदय विफलतेच्या घटनांच्या संयुक्त जोखमीत १६% घट दिसून आली. या निष्कर्षांना फाइन-हार्ट पूल केलेल्या विश्लेषणाद्वारे आणखी बळकटी मिळाली. त्यात तीन जागतिक फेज III कार्यक्रमांमधील (फिडेलिओ-डीकेडी, फिगारो-डीकेडी, फाइनआर्ट्स-एचएफ) १३,००० हून अधिक रुग्णांची माहिती समाविष्ट होती. त्यामुळे जास्त धोका असलेल्या लोकसंख्येत सातत्यपूर्ण मूत्रपिंड आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी फायदे देणारी एकमेव थेरपी म्हणून फायनेरेनोनची सिद्धता झाली.

 

अमेरिकेत एचएफपीईएफ/ एचएफएमआरईएफसाठी फायनेरेनोनला आधीच मान्यता देण्यात आली आहे आणि इयू, जपान आणि चीनमध्ये सादरीकरणांवर विचार सुरू आहेत तर जगभरातील अर्जांवरही प्रक्रिया सुरू आहे.

 

टी२डीशी संबंधित सीकेडीसाठी फायनेरेनोनला आधीच मान्यता देण्यात आली असून २०२२ मध्ये भारतात उत्पादन आल्यापासून रुग्णांमध्ये त्याचा वापर वाढला आहे. बायरच्या जागतिक सीकेडी उत्पादन श्रेणींसाठी हा वाढीचा एक प्रमुख घटक आहे.

 

क्रॉनिक किडनी डिसीज (सीकेडी) हा एक दीर्घकालीन आजार आहे. त्यात मूत्रपिंडे हळूहळू रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव फिल्टर करण्याची क्षमता गमावतात. त्यामुळे विषारी पदार्थ जमा होतात. यात मूत्रपिंड निकामी होऊ शकते आणि त्यावर डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण हा एकमेव उपचार पर्याय आहे. फायनेरेनोन सीकेडीची प्रगती थांबवण्यास मदत करते आणि डायलिसिस किंवा प्रत्यारोपणाची आवश्यकता कमी करते. त्यामुळे रुग्ण आणि कुटुंबांवरील आर्थिक, शारीरिक आणि भावनिक भार कमी होतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments