पुणे, दि. ६ नोव्हेंबर, २०२५ : द पुणे फाऊन्टन पेन २०२५ प्रदर्शनाचे आयोजक असलेल्या ‘द इंक ॲन्ड पेन’ तर्फे आयोजित हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यावर्षी ७ नोव्हेंबर या दिवशी जागतिक फाऊन्टन पेन डे साजरा करण्यात येत असून याचेच औचित्य साधत सदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती द इंक ॲन्ड पेनच्या संचालिका रश्मी नगरकर पिल्ले यांनी कळविली आहे.
या स्पर्धेअंतर्गत देवनागरी गट – अ, ब, क, ड व ई आणि इंग्रजी ग्रुप ए, बी, सी, डी आणि ई असे गट करण्यात आले होते, ज्यामध्ये ५०० पेक्षा जास्त जणांनी आपला सहभाग नोंदविला. स्पर्धेमध्ये राज्यातील विविध भागांमधून वय वर्षे १० पासून ते अगदी ज्येष्ठ नागरीकांपर्यंत सर्वांनी सहभाग नोंदविला. सहभाग घेणाऱ्या मंडळींनी घरून शाईच्या पेनाने भारताचे राष्ट्रगीत (जन गण मन) लिहून आणायचे आणून ते जमा करायचे होते. विजेत्यांना प्रशस्तीपत्रके व भेटवस्तू देण्यात आल्या.
सदर स्पर्धेमध्ये देवनागरी अ गटात आर्या बोरकर, सायगाव, पुणे (प्रथम), गाथा कुलकर्णी, सोलापूर (द्वितीय) तर तनुष्का शेलार, खेड, पुणे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. याबरोबरच इंग्रजी ग्रुप ए मध्ये ब्रयंग पवार, चिखली, पुणे (प्रथम), प्रतिक्षा सन्नके, पुणे (द्वितीय) तर सम्यंक संकपाळ,पुणे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
देवनागरी गट ब मध्ये वरद पवार, पुणे (प्रथम), अजितेश जायदे, पुणे (द्वितीय) तर ज्योती बेनकर, धायगुडेवाडी तृतीय यांनी , तर इंग्रजी ग्रुप बी गटात इशिता बापट, पुणे (प्रथम), विनय बोबडे, बालेवाडी, पुणे (द्वितीय) तर अनुष्का मोहिते, उरळीकांचन (तृतीय) क्रमांक पटकाविला. देवनागरी गट क मध्ये अमोल खोत, इस्लामपूर (प्रथम), संतोष जगताप, अहिल्यानगर (द्वितीय) तर नर्मदा कनकी, सोलापूर यांनी तृतीय पारितोषिक पटकाविले.
यानंतर इंग्रजी ग्रुप सी गटात उपेंद्र संकपाळ, पुणे (प्रथम), यामा नेरूरकर, पुणे (द्वितीय), राहुल सारडा, अकोला यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
याबरोबरच देवनागरी गट ड मध्ये सुबोध गोखले, पुणे (प्रथम), एकनाथ जोशी, पुणे (द्वितीय) तर फैजअहमद इंडीकर, पुणे यांनी (तृतीय) क्रमांकावर नाव कोरले. इंग्रजी ग्रुप डी मध्ये अजितकुमार जमदाडे, निगडी, पुणे यांनी प्रथम, शामसुंदर लाटकर, पुणे (द्वितीय) तर सुजित कोलके, पुणे यांनी
तृतीय क्रमांक पटकाविला.
देवनागरी गट ई मध्ये प्रफुल्ल पाटील, डोंबिवली (प्रथम), जीवन पोवळे, चिंचवड, पुणे यांनी द्वितीय तर चंद्रकांत पवार, सातारा यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. इंग्रजी ग्रुप ई मध्ये इनामदार म शफी, पुणे यांनी प्रथम, अरविंदकुमार गुप्ता, पुणे यांनी द्वितीय तर मोरेश्वर नारायण पेंढारकर, पुणे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.


