*पुणे* :पश्चिम महाराष्ट्रातील ऑन्कोलॉजीमधील सर्वात विश्वासार्ह नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑन्को-लाइफ हॉस्पिटल्सने ८ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात “क्युअरिंग कॅन्सर अॅक्युरे-टेली २.०” परिषदेचे आयोजन केले होते. आयएमए-पीसीबी आणि पूना सर्जिकल सोसायटी (पीएसएस) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात २००हून अधिक प्रसिध्द राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऑन्कोलॉजी तज्ञ, सर्जन आणि डॅाक्टर सहभागी झाले होते.
अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानात रेडिएशनच्या परिणामांमध्ये होत असलेले बदल या संकल्पनेवर आधारित परिषदेत परिसंवाद, चर्चासत्र आणि केस-स्टडीवर आधारित पॅनेल चर्चा झाली. हार्मोन रिसेप्टर पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर: उपचारांच्या निवडी सुलभ करणे, २०२५ मध्ये ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी – मास्टेक्टॉमी अजूनही सामान्य आहे का? फुफ्फुसाचा कर्करोग आणि त्याचे उपचार कोणते, डॉक्टरांनी निदान करताना काय काळजी घ्यावी, फुफ्फुस आणि स्तनाच्या कर्करोगात वेळीच निदान आणि उपचारांचे महत्त्व, पित्ताशयाच्या कर्करोगात रेडिएशन थेरपीचा वापर, CAR-T सेल थेरपी आणि सेल्युलर इम्युनोथेरपी, भारतीय दृष्टीकोन, स्त्रीरोग ऑन्कोलॉजीमध्ये झालेली प्रगती, इम्युनोथेरपी, एडीसी आणि पीएआरपी इनहिबिटर, डोकं आणि मानेच्या कर्करोगाच्या काळजी अशा विविध विषयांवर याठिकाणी सविस्तर चर्चा करण्यात आली.
सातारा, चिपळूण, तळेगाव (पुणे) आणि वाघोली (पुणे) येथे असलेल्या चार केंद्रांसह ऑन्को-लाइफ हॉस्पिटल्स हे विश्वासार्ह नावांपैकी एक म्हणून ओळखले जाते. कुशल कर्करोग तज्ञांची टीम आणि प्रगत तंत्रज्ञानाद्वारे वैयक्तिकृत, परवडणारे आणि अत्याधुनिक बहुविद्याशाखीय ऑन्कोलॉजी उपचार प्रदान करणे हे रुग्णालयाचे मुख्य ध्येय्य आहे.
*पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ. सुरेश अडवाणी सांगतात की,* ऑन्को-लाइफ हॉस्पिटल्स ही सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली एक सर्वोत्तम संस्था आहे आणि कर्करोगावर दर्जेदार उपचार पुरविते. मला या परिषदेत सहभागी होता आले आणि ऑन्को-लाइफ हॉस्पिटल्ससोबत काम करण्याची उत्तम संधी मला मिळाल्याचा मला आनंद होत आहे.
*डॉ.अरुकियास्वामी वेलुमानी (थायरोकेअर टेक्नॉलॉजीजचे संस्थापक) सांगतात की,* आरोग्यसेवा ही अधिक परवडणारी आणि सुलभ कशी करता येईल यासाठी मी प्रयत्न करत आहे. या परिषदेच्या निमित्ताने मला प्रसिध्द डॉक्टरांशी संवाद साधता आला असून मी ऑन्को-लाइफ हॉस्पिटलला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
*ऑन्को-लाइफ हॉस्पिटल्सचे अध्यक्ष आणि संस्थापक श्री. उदय देशमुख सांगतात की,* क्युअरिंग कॅन्सर अॅक्युरिटी २.० या परिषदेतंर्गत कर्करोगाच्या उपचारांमध्ये नावीन्यता आणि सुलभता निर्माण करण्यासाठी याठिकाणी तज्ज्ञांचा उपस्थितीत चर्चा करण्यात आली. दैनंदिन व्यवहारात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यावर आपआपली मतं याठिकाणी मांडण्यात आली.
“क्युअरिंग कॅन्सर अॅक्युरे-टेली २.०” – २०२५ परिषदेची मोठ्या उत्साहात सांगता झाली असून कर्करोग उपचारांमध्ये नवीन उपक्रम, प्रशिक्षण आणि सहकार्यासाठी ऑन्को-लाइफ हॉस्पिटल्सकडून पुढाकार घेण्यात आला आहे. या परिषदेत वैद्यकिय तज्ज्ञ, संशोधक आणि विचारवंतांनी एकाच व्यासपीठावर भारतातील कर्करोगाविरुद्धचा लढा यशस्वी करण्यासाठी सकारात्मक चर्चा
केली.


