भारत- १३ नोव्हेंबर २०२५: भारतातील सर्वात आवडत्या स्नॅकिंग ब्रँड्सचे निर्माते आणि बेकर्स असलेल्या मॉन्डेलेझ इंटरनॅशनलने आज लोटस बेकरीजच्या भागीदारीत देशात बिस्कॉफ® आणण्याची घोषणा केली. या अनावरणासह मॉन्डेलेझ इंडियाने देशात आपल्या प्रीमियम कुकी पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. बिस्कॉफ® कुकीच्या स्थानिक अनावरणामुळे भारतीय ग्राहकांना त्यांच्या अद्वितीय कॅरेमलाइज्ड चव आणि कुरकुरीतपणाची नव्याने ओळख होईल आणि जगभरातील स्नॅकिंगची व्याख्या बदलेल. जागतिक स्तरावर लोटस बेकरीजसाठी पहिल्यांदाच मॉन्डेलेझ इंडियासारखा भागीदार स्थानिक पातळीवर बिस्कॉफ® चे उत्पादन करेल.
या भागीदारीअंतर्गत मॉन्डेलेझ इंडिया आपल्या सखोल मार्केटिंग कौशल्याचा आणि व्यापक वितरण नेटवर्कचा वापर करून देशात ब्रँडच्या उत्पादन, मार्केटिंग आणि वितरणाचे नेतृत्व करेल. हा धोरणात्मक टप्पा मॉन्डेलेझ इंडियाच्या मेक इन इंडिया वचनबद्धतेची खात्री देतो. तसेच ग्राहकांना बिस्कॉफ® जगभरात ज्या सिग्नेचर कॅरेमलाइज्ड चव, कुरकुरीतपणा आणि गुणवत्तेसाठी ओळखले जाते ती ओळख मिळेल याची काळजी घेईल.
मॉन्डेलेझ इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डर्क व्हॅन डी पुट म्हणाले, “मागील वर्षी आम्ही लोटस बेकरीजसोबत आमची भागीदारी जाहीर केली तेव्हा आमचे ध्येय स्पष्ट होते – दोन प्रतिष्ठित स्नॅकिंग ब्रँड एकत्र आणणे आणि भारतीय ग्राहकांसाठी खरोखर काहीतरी खास तयार करणे. हे सहकार्य प्रीमियम कुकी विभागातील आमच्या कामगिरीला बळकटी देण्यासाठी एक रोमांचक पाऊल आहे आणि लाखो भारतीयांना बिस्कॉफ® अनुभवाची ओळख करून देण्याची आमची कटिबद्धता दिसते – हा अनुभव अविस्मरणीय आणि अद्वितीय आहे.”
या भावनेला दुजोरा देताना लोटस बेकरीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅन बून म्हणाले, “आमचा प्रवास १९३२ मध्ये माझ्या आजोबांनी स्थापन केलेल्या बेल्जियन कौटुंबिक व्यवसायाच्या रूपात सुरू झाला. आज लोटस बेकरीज ही जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त सूचीबद्ध कंपनी आहे जी अजूनही माझ्या कुटुंबाच्या मालकीची आहे. बिस्कॉफ® आता ८० देशांमध्ये पोहोचले असून अनेक खंडांमध्ये तिचे उत्पादन होते. आमची महत्त्वाकांक्षा स्पष्ट आहे: बिस्कॉफ® ला जगातील तिसऱ्या क्रमांकाचा कुकी आणि खरा जागतिक ब्रँड बनवणे. या दृष्टिकोनासाठी भारतात उत्पादन सुरू होणे आवश्यक आहे आणि आम्हाला मॉन्डेलेझ इंटरनॅशनलसोबत भागीदारी करण्यास आनंद होत आहे. त्यांचे सखोल ज्ञान, उत्कृष्टतेची आवड आणि भारतीय बाजारपेठेतील यश आम्हाला मोठा आत्मविश्वास देते. ९० वर्षांहून अधिक काळ आमच्या बिस्कॉफ® ब्रँडला परिभाषित करणाऱ्या
वारसा आणि मूल्यांशी प्रामाणिक राहून लाखो भारतीय ग्राहकांपर्यंत बिस्कॉफ® ची अनोखी चव आणि वारसा पोहोचवण्यास मी उत्सुक आहे!”
या अनावरणाबाबत बोलताना मॉन्डेलेझ इंटरनॅशनलचे भारत अध्यक्ष समीर जैन म्हणाले, “भारतात बनवल्या जाणाऱ्या जागतिक स्तरावरील आवडत्या बिस्कॉफ® कुकीज आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोटस बेकरीजसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. आमचे मजबूत वितरण नेटवर्क, मार्केटिंगमधील उत्कृष्टता आणि ग्राहकांबाबतच्या सखोल अभ्यासामुळे आम्ही या आंतरराष्ट्रीय आवडत्या कुकीजना भारतीय ग्राहकांसाठी पसंतीचा कुकी ब्रँड बनवण्यास उत्सुक आहोत. बिस्कॉफ® ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या गरम पेयासोबत पूरक असा एक अविश्वसनीय कॅरमेलाइज्ड, कुरकुरीत पदार्थ देते. गेल्या वर्षभरात हे बाजारात आणण्यासाठी लोटस बेकरीज टीमसोबत भागीदारी एक चांगला अनुभव ठरली आहे.”
भारताच्या स्नॅकिंग संस्कृतीला अग्रेसर करण्याच्या सात दशकांच्या मजबूत वारशावर आधारित मॉन्डेलेझ इंडिया नावीन्यपूर्णता आणि पोर्टफोलिओ विस्ताराद्वारे आघाडीवर आहे. बेल्जियममधील कंपनी असलेल्या लोटस बेकरीजसोबत भागीदारी केल्याने अनेक खंडांमध्ये विकल्या आणि उत्पादित केलेल्या मजबूत ब्रँड आणि
उत्पादनांसह, भारतात जागतिक दर्जाचे स्नॅकिंग अनुभव आणण्याची कंपनीची महत्त्वाकांक्षा आणखी अधोरेखित होते.
बिस्कॉफ® चा समावेश केल्याने कंपनीच्या वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम कुकीज सेगमेंटमधील पोर्टफोलिओ मजबूत झाला आहे. ओरिओसारख्या विद्यमान ब्रँडना तो पूरक ठरला असून भारतातील स्नॅकिंगचे नेतृत्व करण्याच्या महत्त्वाकांक्षेला बळकटी मिळते.
फक्त १० रूपयांपासून पासून सुरू होणाऱ्या पाच पॅक आकारांमध्ये उपलब्ध असलेले बिस्कॉफ® देशभरातील आघाडीच्या रिटेल आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. या अनावरणात आघाडीच्या हॉटेल चेन, एअरलाइन्स आणि कॉफी हाऊसेससोबत भागीदारी देखील समाविष्ट असेल जेणेकरून ग्राहकांच्या आवडत्या हॉट ड्रिंक्ससोबत क्लासिक बिस्कॉफ® अनुभव घराबाहेरही घेता येईल. कंपनी लोकप्रिय क्विक-सर्व्हिस रेस्टॉरंट्ससोबतही (क्यूएसआर) देखील सहयोग करत आहे जेणेकरून आनंददायी बिस्कॉफ® चव त्यांच्या आवडत्या मिठायांमध्ये आणता येईल. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडत्या कॅरमेलाइज्ड कुकीजचा आनंद वेगवेगळ्या प्रकारे घेता येईल.


