केश किंग, भारताचा अग्रगण्य आयुर्वेदिक हेअरकेअर ब्रँड आहे. ह्या ब्रँडने स्वतःचा एक रूपांतरात्मक रिब्रँडिंगचा पुढाकार घेऊन सादर केले आहे केश किंग गोल्ड. यामुळे ब्रँडची ओळख, प्रस्ताव आणि पॅकेजिंगला एक नवा आणि आकर्षक दर्जा मिळाला आहे. ह्या रिब्रँडिंगच्या पुढाकाराने ईमामीने आपल्या ब्रँड केश किंग ब्रँडसाठी एक वेगळी धोरण आत्मसात केली आहे. आता हे आपल्या पारंपारिक आयुर्वेदिक मूळांपर्यंत मर्यादित नाही, तर, हा एक दमदार नवा विचार आत्मसात केला आहे: आयुर्वेद + विज्ञान.
उत्पादनाच्या ह्या नव्या स्वरूपामुळे ग्राहकांना उत्तम गुणवत्ता, प्रभावकारकता आणि उपयोगाचा फायदा मिळेल आणि तेसुद्धा एका नव्या रूपात. ब्रॅण्डची आयुर्वेदिक परंपरा न बिघडवता, हे नवे उत्पादन ग्राहकांची मागणी लक्षात ठेवून तयार करण्यात आले आहे. आजकालच्या काळात ग्राहक खरेपणा, कामगिरी आणि वैज्ञानिकरीत्या प्रमाणित उत्पादने पसंत करतात. केश किंग गोल्ड ग्राहकांच्या सर्व मागण्या पूर्ण करते कारण ह्यात आहे ग्रो बायोटिन आणि प्लांट ओमेगा 3-6-9 सारखे प्रमुख वैज्ञानिक घटक व सोबत 21 विश्वस्नीय आयुर्वेदिक वनौषधिंचे शक्तिशाली सक्रिय संघटक. केस उगवणे आणि केस गळणे कमी करण्यात ह्या उत्पादनांची उपयुक्तता क्लिनिकली प्रमाणित आहे.
ह्या धोरणात्मक बदलाचा भाग म्हणून केश किंग केसांशी संबंधित असलेल्या वाढत्या समस्यांसाठी काही नवीन कॅटेगरीज मध्ये आपला प्रवेश करीत आहे. ह्या प्रवेशाद्वारे समस्यांसाठी उपयोगी समाधाने मिळतील. केस वाढ ही अजुनही एक महत्त्वाची अपूर्ण गरज आहे, हे ओळखून, ह्या ब्रँडने केश किंग गोल्ड रेंजच्या अंतर्गत आणले आहे एक नवे आधुनिक उत्पादन, अॅडव्हांस्ड हेअर ग्रोथ सिरम. ह्या सिरम पॅकमध्ये सर्वात जास्तं प्रमाणात आहे ग्रोथ अॅक्टिव्ह्स – आयुर्वेदिक वनौषधि आणि रेडेंसिल, अॅनागेन, कोपोक्सिल अॅक्वा आणि प्रोकॅपिल सारख्या शक्तिशाली मॉलिक्युल्सचे अद्वितीय मिश्रण- जे प्रत्यक्ष दाखवते केसांची वाढ.
ह्या वेळेस आपला शब्द ठेवून सौ. प्रीति ए. सुरेका, एक्झेक्युटिव्ह डायरेक्टर, ईमामी लिमिटेड, म्हणाल्या, “केश किंगचे हे रिब्रँडिंग फक्त देखाव्यासाठी केलेला बदल नही, – तर ह्यात धोरणात्मकरीत्या उल्लेखनीय बदल करण्यात आले आहेत. हा ब्रँड केसांच्या संपूर्ण देखरेखीत केश किंगला गोल्ड स्टँडर्ड म्हणून स्थापित करु इच्छितो, जे त्यांच्या भविष्यातील योजनांचा एक भाग आहे. केश किंग गोल्डमध्ये आयुर्वेदाचे ज्ञान आणि आधुनिक संशोधनाच्या परिणामांना एकत्र करण्यात आले आहे. ही नवी ओळख विशेषरीत्या त्या पीढीसाठी तयार करण्यात आली आहे, जी विश्वस्नीय घटक, दृष्यमान कार्यप्रभाव आणि महत्त्वाकांशी प्रगत मूल्यांची उमेद ठेवतात आणि प्रत्यक्षात परिणाम बघू इच्छितात.”
पूर्वीप्रमाणे, ब्रँड अॅम्बॅसेडर शिल्पा शेट्टीच केश किंग एंडॉर्स करेल आणि वेलनेस आयकॉन म्हणून तिच्या ओळखीने ब्रँडच्या तत्त्वज्ञानांना विश्वसनीयता आणि विश्वास मिळू शकेल. प्रचाराच्या नव्या धोरणात्मकतेत ग्राहकांच्या खऱ्या अनुभवांवर जास्तं भर दिला जाईल. प्रभावीपणाच्या वास्तविक दावांसह ब्रँडची नवीन ओळख सर्वांच्या पुढे सादर करण्यात येइल. सादरीकरण जास्तं यशस्वी बनविण्यासाठी, केश किंगद्वारे टेलिव्हिजन, डिजिटल प्लॅटफॉर्म, प्रिंट मिडिया आणि इन-स्टोर चॅनेल्समधून एक दमदार 360-डिग्री इंटिग्रेटेड कॅम्पेन सुरू करण्यात येईल.
ह्याचा पुनर्प्रारंभ करुन उत्पादन जास्तं चांगले असल्याची माहिती ग्राहकांपर्यंत पोचवणे आणि प्रमुख बाजारांमध्ये सर्वोच्च स्थानाला मजबूत बनवणे, ह्यावर जास्तं जोर दिला जाईल. त्यामुळे विश्वस्नीय, उपयुक्त हेअरकेअर सोल्युशन हवे असणारे जुने भरोशाचे ग्राहक आणि नवे ग्राहक, दोघांनाही शोध घेता येईल.
*
*****


