पुणे, दि. 13 नोव्हेंबर (जिमाका, वृत्तसेवा): प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड कार्यालयाच्यावतीने माहे नोव्हेंबर 2025 महिन्यात विविध तालुक्यांमध्ये पक्की अनुज्ञप्ती शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी संबंधित तालुक्यानुसार खालीलप्रमाणे दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. खेड 3 व 4 नोव्हेंबर 2025, मंचर 10,11 व 12 नोव्हेंबर,जुन्नर 17, 18 व 19 नोव्हेंबर, वडगाव मावळ 24 व 25 नोव्हेंबर, लोणावळा 27 व 28 नोव्हेंबर 2025 रोजी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
0000
0


