Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedफॉग्सीच्या संपूर्णा या सार्वजनिक मंचाद्वारे गर्भधारणापूर्व आरोग्य व सुरक्षित मातृत्वाचा संदेश

फॉग्सीच्या संपूर्णा या सार्वजनिक मंचाद्वारे गर्भधारणापूर्व आरोग्य व सुरक्षित मातृत्वाचा संदेश

पुणे,14 नोव्हेंबर 2025 : द फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक ॲन्ड गायनेकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (फॉग्सी) आणि पुणे ऑब्स्टेट्रिक ॲन्ड गायनेकोलॉजिकल सोसायटी (पीओजीएस) यांच्या सहयोगाने संपूर्णा पब्लिक फोरम उपक्रमा अंतर्गत्ा गर्भधारणापूर्व आरोग्याविषयी जनजागृती करणारा विशेष कार्यक्रम गुरूवारी,आयएमए हॉल, टिळक रोड येथे पार पडला. गर्भधारणेपूर्वीच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि निरोगी गर्भधारणा व सुरक्षित मातृत्वाला प्रोत्साहन देणे हा या समाजाभिमुख उपक्रमाचा उद्देश होता.

 

या कार्यक्रमाचे नेतृत्व फॉग्सीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.सुनिता तांदुळवाडकर यांनी केले. प्रसिध्द अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.याप्रसंगी पीओजीएसचे अध्यक्ष डॉ.मनिष माचवे, फॉग्सीच्या राष्ट्रीय सह सचिव डॉ.अश्विनी काळे,पीओजीएसचे सचिव डॉ.निलेश बलकवडे,डॉ पूजा लोढा (आयोजक सचिव), कार्यक्रमाचे संयोजक डॉ.वैजयंती पटवर्धन, डॉ.रेवती राणे तसेच समन्वयक डॉ.आरती निमकर,डॉ अलका क्षीरसागर, डॉ.अलका कुथे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

ज्ञान,सर्जनशीलता व सामाजिक बांधिलकीचा मिलाफ असलेल्या या कार्यक्रमात तज्ञ डॉक्टर,आरोग्य क्षेत्रातील व्यक्ती आणि समुदाय सदस्य सहभागी झाले होते.

 

डॉ.सुनिता तांदुळवाडकर म्हणाल्या की, गर्भधारणेपूर्व घेतलेली काळजी ही आरोग्यदायी प्रसूतीच्या दिशेने पहिले पाऊल आहे. प्रत्येक गर्भधारणापूर्वी योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे. वजन, हिमोग्लोबिन,रक्तदाब,रक्तातील साखरेचे प्रमाण,थायरॉईड यासारख्या चाचण्या गर्भधारणापूर्व नियोजनावेळी होणे आवश्यक आहे. संपूर्णा उपक्रमाद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून आरोग्य व कल्याणाबाबत जागरूकता निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.भारतभरातील आमच्या 292 सोसायटीच्या माध्यमातून विविध उपक्रम आम्ही राबवत आहोत. आजवर 300 असे कार्यक्रम झाले असून पुढील वर्षी जानेवारी पर्यंत अशा प्रकारचे 25 कार्यक्रम आयोजित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.नुकत्याच झालेल्या केपटाऊनमधील परिषदेसह या कार्यक्रमाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कौतुक होत आहे.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे म्हणाल्या की,हा आजच्या काळासाठी अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे.सध्याच्या काळातील बदललेली सामाजिक-भौगोलिक स्थिती, अनिश्चितता, टिकून राहण्याची स्पर्धा या सर्व गोष्टींमुळे गर्भधारणेपूर्वीच्या नियोजनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या संकल्पनेवर समाजात जागरूकता निर्माण व्हायला हवी व खुल्या मनाने चर्चा व्हायला हवी.

 

14 ते 16 नोव्हेंबर 2025 दरम्यान जे.डब्ल्यू.मॅरिएट येथे फॉग्सी प्रेसिडेंशियल कॉन्फरन्स – स्टार संपूर्णा याचाच हा कार्यक्रम एक पूर्व भाग होता.यामध्ये महिलांच्या आरोग्यसेवेतील धोरण,बदल,प्रगती आणि संशोधन यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

 

पीओजीएसचे अध्यक्ष डॉ.मनिष माचवे म्हणाले की,अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून जागरूकता व सक्षमीकरणाद्वारे माता मृत्यूदर कमी करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

 

फॉग्सीच्या राष्ट्रीय सह सचिव डॉ.अश्विनी काळे म्हणाल्या की,प्रत्येक गर्भधारणा ही नियोजित असावी, निरोगी माता व निरोगी कुटुंबासाठी हे अत्यावश्यक आहे.

 

डॉ.रेवती राणे यांनी नो युवर नंबर या विषयावर मार्गदर्शन केले.गर्भधारणापूर्व नियोजन करताना रक्तदाब,वजन,हिमोग्लोबीन सारख्या महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

 

पीओजीएसचे सचिव डॉ.निलेश बलकवडे यांनी आभार मानले.

 

या कार्यक्रमात गर्भधारणापूर्व आरोग्याचे महत्त्व, शारीरिक,मानसिक तयारी,पोषण अशा अनेक विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन मिळाले. हा विषय लोकांपर्यंत प्रभावीपर्यंत पोहचावा,यादृष्टीने माँ या विषयावर नाट्यस्पर्धा आणि सेफ मदरहूड या विषयावर नाटिका स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात प्रदान करण्यात आली.

 

 

संपूर्णा पब्लिक फोरम हा फॉग्सीचा राष्ट्रीय उपक्रम असून गर्भधारणापूर्व आरोग्याबाबत जनजागृती करणे आणि नवमाता व नवजात मृत्यूदर कमी करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी फॉग्सी तर्फे विविध आरोग्य शिबिरे व जनजागृती मोहिमा हाती घेण्यात येतात.सामाजिक जागृतीच्या दृष्टीने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल असून,त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा.सशक्त माता,निरोगी भावी पिढी घडवण्यासाठी अतिशय स्तुत्य

उपक्रम आहे.

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments