आर्किटेक्ट अनिल नेने यांच्या वॉटरकलर पेंटिंग्ज चे प्रदर्शन १८ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पी. एन. जी. आर्ट गॅलरी, रिलायन्स मार्टजवळ, औंध येथे आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी ११.०० ते सायंकाळी ८.०० या वेळेत सर्वांसाठी खुले असेल.
या प्रदर्शनात निसर्गावर आधारित सुमारे ५० सुंदर चित्रकृती पाहायला मिळतील. आपल्या वॉटरकलर चित्रांमधून अनिल नेने यांनी निसर्गातील सौंदर्य, शांतता आणि संतुलन यांचे अप्रतिम चित्रण केले आहे.
कला रसिक व सर्वसामान्य नागरिकांनी या मनोहर चित्रप्रदर्शनाला भेट देऊन कलानुभवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्थळ: पी. एन. जी. आर्ट गॅलरी, रिलायन्स मार्टजवळ, औंध
दिनांक: १८ ते २३ नोव्हेंबर २०२५
वेळ: सकाळी ११.०० ते सायंकाळी ८.००
प्रवेश: मोफत


