पुणे, १४ नोव्हेंबर २०२५ : ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) तर्फे देशभरात ‘ह्युंदाई स्मार्ट केअर क्लिनिक’ सुरु करण्यात आले आहे. हा एक ग्राहक-केंद्रित उपक्रम असून याचा उद्देश संपूर्ण भारतातील ह्युंदाई ग्राहकांना व्यापक वाहन तपासणी, मूल्यवर्धित सेवा आणि विशेष फायदे प्रदान करणे आहे. १८ नोव्हेंबर २०२५ ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले, ह्युंदाई स्मार्ट केअर क्लिनिक दर्जेदार सेवा, पारदर्शकता आणि नाविन्यपूर्णतेद्वारे मालकी अनुभव देण्याच्या ह्युंदाईच्या वचनबद्धतेला पुन्हा एकदा अधोरेखित करते.
ह्युंदाई स्मार्ट केअर क्लिनिकमध्ये ग्राहकांना इंजिन, ब्रेक आणि इलेक्ट्रिकल सिस्टम, सस्पेंशन इत्यादींसह मोफत ७०-पॉइंट तपासणी, एक्सटेंडेड वॉरंटीवर २५% पर्यंत फायदा, मेकॅनिकल लेबरवर ३०% पर्यंत फायदा, याबरोबरच इंटिरिअर एनरिचमेण्ट,एक्सटीरियर ब्युटीफिकेशन, सिरेमिक कोटिंग वर १५ पर्यंत फायदा, यांत्रिक आणि देखभाल वर १०% फायदा, रोडसाईड असिस्टन्स पॉलिसीवर १५% फायदा इत्यादीं गोष्टींचा समावेशआहे.


