Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यातील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT – टीम इनोफोर्ज) ने डसॉल्ट सिस्टिम्स...

पुण्यातील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT – टीम इनोफोर्ज) ने डसॉल्ट सिस्टिम्स आयोजित जागतिक डिझाईन स्पर्धा ‘आकृती’च्या १५व्या पर्वात विजेतेपद पटकावले! अमेरिकेत होणाऱ्या स्पर्धेत जगभरातील इतर स्पर्धकांसोबत भारताचे प्रतिनिधित्व करणार!

भारतात आयोजित आकृती इनोव्हेशन स्पर्धा २०२५ ही डसॉल्ट सिस्टीमच्या अभियांत्रिकी आणि डिझाइनच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या जागतिक डिझाइन स्पर्धेची १५वी आवृत्ती होती.

संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांनी परिभाषित केलेल्या समस्यांचे निराकरण शोधण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाश्वत उपाययोजना या विषयाला अनुसरुन चार विषयांसह ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.

भारत तसेच जगभरातील ३७ देशांमधील ५०४ महाविद्यालयातील एकूण १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

विजेत्यांचा ८.३० लाख रोख बक्षिसांनी सन्मान करण्यात आला.

 

डसॉल्ट सिस्टिम्स (Euronext Paris: FR0014003TT8, DSY.PA) यांनी आज आकृती इनोव्हेशन स्पर्धा २०२५ मधील विजेत्यांची घोषणा केली. ही आंतरराष्ट्रीय उत्पादन डिझाइन स्पर्धा असून, भारतातील तसेच इतर देशांतील अभियांत्रिकी, डिझाइन आणि तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत जागतिक पातळीवरील गंभीर समस्यांसाठी नावीन्यपूर्ण उपाय विकसित करण्याचे आव्हान या विद्यार्थ्यांनी पेलले. यंदा स्पर्धेच्या विस्तार मोठ्या प्रमाणावर करण्यात आला असून, ३६ नव्या देशांचा सहभाग या उपक्रमात जोडला गेला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यात मर्सिडीज-बेंझ इंडिया प्रायव्हेट लिमिटडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कुलदीप वीज यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

आकृती इनोव्हेशन स्पर्धा २०२५ ही स्पर्धा चार टप्प्यांत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ५०४ महाविद्यालयांतील १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थ्यी डसॉल्ट सिस्टिमच्या ३डी एक्सपिरियन्लच्या प्लॅटफॉर्मवर व्हर्च्युअली एकत्र आले होते. मानवी आरोग्य, शाश्वत शहरे, हरित ऊर्जा आणि शाश्वत गतिशीलता यांसारख्या क्षेत्रातील आवश्यक सकात्मक बदलांसाठी या सहभागी विद्यार्थ्यांनी टिकाऊ उपाय विकसित केले. सहभागी विद्यार्थ्यांना यात वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. ३डी एक्सपिरियन्ससह स़ॉलिडवर्क्स, ३डीएक्सिट आणि ३डी एक्सपिरियन्स वर्क्स एप्लिकेशन्स तसेच डसॉल्ट सिस्टिम्सची अत्याधुनिक तंत्रज्ञान सिस्टीम्स हाताळता आली. स्पर्धेतील विजेत्या संघा आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील इतर १२ संघांचे त्यांना आव्हान असेल. हॉस्टन येथे पार पडणा-या ३डी एक्सपिरियन्स वर्ल्ड या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्याची घोषणा केली जाईल.

 

आकृती २०२५ इंडिया जिओ फायनलचे विजेते:

कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची टीम सेंट्रॉइड

पुणे येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉल़ॉजीचा टीम इनोफोर्ज

आकृती इनोव्हेशन स्पर्धा २०२५ मध्ये खालील चार महत्त्वाचे विषय मांडण्यात आले:

 

मानवी आरोग्यासाठी शाश्वत उत्पादने: या विषयाला अनुसरुन मानवी आयुष्याशी निगडीत क्लिनिकल गरजा पूर्ण करणा-या उत्पादनांची रचना विकसित करण्याचे आव्हान होते. विविध परिस्थितींमध्ये सहज जुळवून घेणारी, किफायतशील दरातील, ऊर्जा-कार्यक्षम आणि वापरण्यास सोप्पी उत्पादने निर्माण करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. स्पर्धकांना कमी साधनसंपत्ती वापरुन अधिक परिणाम दर्शवणा-या उत्पादनांची रचना तयार करायची होती. ही रचना वैद्यकीय क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्याकरिता अनुसरुन असल्याने रुग्ण, वैद्यकीय तज्ज्ञ आणि वापरकर्ते या तिन्ही घटकांसाठी फायदेशीर ठरतील, जेणेकरुन आरोग्य क्षेत्रातील समस्यांवर प्रभावी आण टिकाऊ उपाय साधता येईल, याकडे प्राधान्य दिले गेले.

हरित ऊर्जा निर्मिती, वहन आणि साठवणूक : या विषयांतर्गत पर्यावरणपूरक, आधुनिक स्वरुपातील हरित ऊर्जा किफायतशीर दरात आणि विश्वासार्ह स्वरुपात उपलब्ध करुन देण्याचे आव्हान दिले होते. नैसर्गिक संसाधनांचा कमीत कमी वापर करुन प्रभावीपणे वापरता येईल अशी स्वच्छ ऊर्जा निर्माण करणे तसेच या संबंधित उत्पादननिर्मितीची डिझाईन किफायतशील दरात उपलब्ध करुन देणे, पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत सुलभतेने वापरता येणारी टिकाऊ उर्जा निर्मिती करणे. या उर्जा निर्मितीची अंमलबजावणी अधिक वेगाने आणि व्यपक प्रमाणावर करणे शक्य असेल, याकडे स्पर्धकांनी प्रयत्न केलेत.

शाश्वत वस्ती, शहरी पायाभूत सुविधा : या विषयांतर्गत विद्यार्थ्यांना घर बांधणीशी संबंधित खर्च कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणारी उत्पादने विकसित करणे अपेक्षित होते. नैसर्गिक संसाधनांचा वापर कमी करुन शहरी विस्तारात हातभार लावणारे उत्पादन डिझाइन करायचे होते.

शाश्वत गतीशीलता: या संकल्पनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पर्यावरणाताला अनुकूल, सामाजिक समानता, आर्थिक व्यवहारता देणारी वाहतूक व्यवस्था तयार करायची होती. शिवाय वाहतुकीच्या संसाधनांचा शाश्वत वापर व्हावा तसेच कार्यक्षमता कायम राहावी या दोन घटकांवर भर दिला गेला. विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाहतूक , इलेक्ट्रिक किंवा हायब्रीड वाहने, कार-शेअरिंग सेवा आणि बुद्धिमान वाहतूक प्रणाली यांसारख्या क्षेत्रांसाठी डिझाइन उपाय तयार करण्याची संधी मिळाली.

 

डसॉल्ट सिस्टीम्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक एन.जी. म्हणाले, ‘‘आकृती ही स्पर्धा शाश्वत भविष्यासाठी उपाययोजना तयार करणा-या नव्या पिढीतील नवोदितांना सक्षम करण्याच्या आमच्या दृष्टीकोनाचे मूर्त स्वरुप आहे. ३डी एक्सपिरियन्स प्लॅटफॉर्मचा वापर केल्याने, विद्यार्थ्यांना केवळ व्यावहारिक कौशल्ये मिळत नाहीत, तर वास्तविक जगावर प्रभाव दाखवता येण्याकरिता नवनवीन कल्पना सादर करणे, डिझाइन तसेच नवनिर्मितीची क्षमता वृद्धिंगत करण्याचा आत्म

विश्वास देते.’’

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments