Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedटोयोटा किर्लोस्‍कर मोटरने छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधा सुधारत शिक्षणाचा...

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरने छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधा सुधारत शिक्षणाचा दर्जा उंचावला 

 

नोव्‍हेंबर १४, २०२५: टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (टीकेएम)ने बालदिनानिमित्त शिक्षणाच्‍या माध्‍यमातून भावी पिढ्यांना निपुण करण्‍याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली. कंपनीने शिक्षणाबाबतीत कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटी (सीएसआर)वर लक्ष केंद्रित करत महाराष्‍ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील ११ सरकारी शाळांना आवश्‍यक शालेय पायाभूत सुविधा आणि अध्‍ययनाला साह्य करणारे साहित्‍य सुपूर्द करण्‍याची घोषणा केली आहे.

या उपक्रमाचा सुधारित अध्‍ययन वातावरण निर्माण करण्‍याचा आणि टीकेएमच्‍या ‘चाइल्‍ड-टू-कम्‍युनिटी’ दृष्टिकोनाच्‍या माध्‍यमातून विद्यार्थ्‍यांच्‍या सर्वांगीण विकासाला प्रेरित करण्‍याचा मनसुबा आहे. या सुधारणांमध्‍ये वर्गामध्‍ये उत्तम पायाभूत सुविधा, पोषक मध्‍यान्‍ह आहार सुविधा आणि अभ्‍यासेत्तर क्रियाकलापांमध्‍ये सहभागाला चालना देणाऱ्या संधींचा समावेश आहे. या सुविधा शाळांना अधिक सर्वसमावेशक, उत्‍साहवर्धक आणि अध्‍ययनासाठी अनुकूल करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत.

टोयोटाचे तत्त्व ‘समुदाय विकास’ला सादर करत हा उपक्रम तळागाळापासून शिक्षण दृढ करण्‍यावर लक्ष केंद्रित करतो, जेथे तो विद्यार्थी, शिक्षक आणि सरकारी शाळांना साह्य करतो.

चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (झेडपीपीएस) येथे जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक) श्रीमती जयश्री ए चव्हाण, स्थानिक शालेय अधिकारी आणि टीकेएमच्या सीएसआर व बाह्य व्यवहार विभागाचे सदस्य यांच्या उपस्थितीत या सुविधांचे औपचारिक हस्तांतरण झाले.

टीकेएमच्‍या योगदानाचे कौतुक करत जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक) श्रीमती जयश्री ए चव्हाण म्‍हणाल्‍या, ”टीकेएमने बिडकिनमधील सरकारी शाळांना वेळेवर दिलेल्‍या पाठिंब्‍यामुळे मुलभूत अध्‍ययन सुविधा वाढतील आणि प्रत्‍यक्षात विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या दैनंदिन शिक्षणामध्‍ये फायदा होईल. असे कॉर्पोरेट सहयोग सार्वजनिक शिक्षण परिसंस्‍था मजबूत करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात. आम्‍हाला विश्वास आहे की, या सुविधा मुलांसाठी व समुदायासाठी दीर्घकालीन मूल्‍य निर्माण करतील.”

या उपक्रमाबाबत‍ मत व्‍यक्‍त करत टोयोटा किर्लोस्‍कर मोटरचे मुख्‍य संप्रेषण अधिकारी, वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष व राज्‍य व्‍यवहारांचे प्रमुख श्री. सुदीप दळवी म्‍हणाले, ”टीकेएममध्‍ये आमचा विश्वास आहे की, दर्जेदार शिक्षण सक्षम समाजाचा पाया आहे. वर्गामधील पायाभूत सुविधा सुधारत व वातावरण उत्‍साहित करत आम्‍ही तळागाळापासून शिक्षण प्रबळ करत आहोत. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून आणि आमच्‍या प्रयत्‍नांना स्किल इंडिया (कुशल भारत) व राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) अशा राष्‍ट्रीय प्राधान्‍यक्रमांसोबत संलग्‍न करत आमचा मुलांना त्‍यांचे भविष्‍य घडवण्‍यास आवश्‍यक असलेली कौशल्‍ये व आत्‍मविश्वासासह सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे.”

२००१ पासून टोयोटा किर्लोस्‍कर मोटर शिक्षण, पर्यावरण, रस्‍ता सुरक्षा, कौशल्‍य विकास, आरोग्‍य व स्‍वच्‍छता आणि आपत्ती व्‍यवस्‍थापनामध्‍ये समुदायांची प्रगती करण्‍यासाठी काम करत आहे. टीकेएममध्‍ये सीएसआर अर्थपूर्ण सामाजिक-आर्थिक विकासाला गती देण्‍याप्रती कटिबद्धता आहे. आपले गरज-आधारित उपक्रम आणि सरकारी संस्‍था व नागरी संस्‍थांसोबत सहयोगाच्‍या माध्‍यमातून टीकेएम राष्‍ट्रीय विकास ध्‍येयांमध्‍ये योगदान देत आहे, तसेच आपले जागतिक तत्त्व ‘क्रिएटिंग मोबिलिटी फॉर ऑल’ साध्‍य करण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments