Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedसी.एन.एच (CNH)’ ने आपल्या पीकविषयक उत्पादनांसाठी पुण्यात उभारले नवीन समर्पित पार्ट्स वितरण...

सी.एन.एच (CNH)’ ने आपल्या पीकविषयक उत्पादनांसाठी पुण्यात उभारले नवीन समर्पित पार्ट्स वितरण केंद्र; विक्रीपश्चात वितरण नेटवर्कचा केला विस्तार दक्षिण व पश्चिम भारतातील सेवा आणि वितरणाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी खास तयार केली अत्याधुनिक सुविधा

पुणे, १२ नोव्हेंबर २०२५

 

 

 

कृषी आणि बांधकाम उपकरण क्षेत्रातील सीएनएच या जागतिक पातळीवरील अग्रणी कंपनीने पुण्यातील आपल्या कारखान्याजवळ नवीन, समर्पित असे स्पेअर पार्ट्सचे वितरण केंद्र सुरू केले आहे. कंपनीच्या विक्रीपश्चात सेवांना बळकटी देण्यासाठी तसेच भारताच्या दक्षिण आणि पश्चिम भागातील विस्तृत आणि वेगाने वाढणाऱ्या ग्राहकवर्गाला अधिक जलद, कार्यक्षम सेवा देण्यासाठी हे केंद्र उभारण्यात आले आहे.

 

 

 

हे नवीन अत्याधुनिक वितरण केंद्र ‘सीएनएच’च्या पीक सोल्यूशन उत्पादनांसाठी एक विशेष केंद्र म्हणून कार्य करेल. या उत्पादनांमध्ये केस आयएच ऊसतोडणी यंत्रे आणि न्यू हॉलंड कंबाइन हार्वेस्टर आणि बेलर यांचा समावेश आहे. या सुविधेमुळे कंपनीच्या वितरकांना व ग्राहकांना सुटे भाग जलदगतीने उपलब्ध होतील व वितरकांच्या सेवा अधिक दर्जेदार आणि अखंड राहतील.

 

 

 

नवीन पायाभूत सुविधांनी सज्ज असलेल्या या केंद्रात ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन’ (आरएफआयडी) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे अचूकता, मागोवा घेण्याची क्षमता आणि प्रक्रियेची कार्यक्षमता यांत वाढ होईल. नव्या केंद्राच्या स्थापनेमुळे भारतातील सीएनएचची उपस्थिती आणखी विस्तारली आहे. हे केंद्र नोएडा, इंदूर आणि सिकंदराबाद (उत्तर प्रदेश) येथील विद्यमान वितरण केंद्रांनंतरचे चौथे पार्ट्स वितरण केंद्र ठरले आहे.

 

 

 

नवीन गोदामाबद्दल अधिक माहिती देताना ‘सीएनएच इंडिया’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नरिंदर मित्तल म्हणाले, “सीएनएच’मध्ये आम्ही केलेली प्रत्येक गुंतवणूक ही ग्राहकसेवा अधिक उत्तम करण्याच्या आमच्या वचनबद्धतेवर आधारित असते. भारतातील दक्षिण आणि पश्चिम भाग हे महत्त्वाचे ऊसउत्पादन क्षेत्र आहे. तिथे सुटे भाग वेळेवर उपलब्ध होणे अखंड कार्यक्षमतेसाठी अत्यावश्यक आहे. पुण्यातील हे पार्ट्सचे वितरण केंद्र आम्हाला ग्राहक आणि कारखाना, दोघांजवळ आणते, त्यामुळे आम्ही त्यांना अधिक जलद आणि कार्यक्षम सेवा देऊ शकतो. आमचे विक्रीपश्चात सेवांचे नेटवर्क या सुविधेमुळे अधिक व्यापक बनणार आहे. आमच्या ग्राहकांना विश्वासार्ह, तंत्रज्ञानाधारित पार्ट्स आणि सेवा समाधान देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, हे या निमित्ताने दिसून येते.”

 

 

 

या वितरण केंद्रात पर्यावरणपूरक पॅकेजिंग पद्धती आणि ऊर्जा-कार्यक्षम प्रणाली अवलंबण्यात येत आहेत. त्यातून शाश्वत कार्यप्रणालीबाबत सीएनएचची जागतिक बांधिलकी अधोरेखित होत असून पर्यावरणीय प्रभाव कमी करण्याचा कंपनीचा दृष्टीकोन स्पष्ट होतो. वितरक आणि ग्राहकांपर्यंत सुटे भाग वेळेवर आणि विश्वासार्हरीत्या पोहोचावेत म्हणून ‘सीएनएच’ने ‘डीएचएल सप्लाय चेन’ या एकात्मिक लॉजिस्टिक्स सोल्यूशन्समधील अग्रगण्य कंपनीशी भागीदारी केली आहे.

 

 

 

आपल्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत सीएनएच इंडिया गेल्या २५ वर्षांहून अधिक काळापासून जागतिक दर्जाची उत्पादने भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे. या कंपनीचे केस आयएच, न्यू हॉलंड आणि केस कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट हे ब्रँड्स भारतात लोकप्रिय आहेत. या उत्पादनांना सीएनएच कॅपिटल आणि कंपनीचे ग्लोबल टेक्नॉलॉजी सेंटर यांचे मजबूत पाठबळ मिळालेले आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments