बंगळुरू, 13 नोव्हेंबर, 2025 – वनप्लस एक जागतिक तंत्रज्ञान ब्रँड असून त्याने आज अतिशय अपेक्षित असा वनप्लस 15 लाँच केला आणि त्यायोगे कमालीची कामगिरी दर्शविणाऱ्या सर्वोत्कृष्ट (फ्लॅगशिप) फोनसाठी एक नवीन मानक परिभाषित केले आहे. खरोखरच शक्तिशाली कामगिरी, व्यावसायिक श्रेणीची कॅमेरा प्रणाली, वास्तववादी आणि व्यक्तीनुसार एआय क्षमता व एक अभिजात आयकॉनिक डिझाइन, वनप्लस 15 मध्ये सम्मीलित केलेले दिसून येते. मुख्य सुधारणांचा यात समन्वय साधला गेल्याने एक बदलता व भरवशाचा स्मार्टफोन अनुभव लाभतो आणि त्यामुळे कामे करण्यास, कल्पकता साधण्यास आणि दैनंदिन आयुष्यातील गरजेच्या गोष्टी पूर्ण करण्यास तो सज्ज आहे.
रॉबिन लिऊ, सीईओ, वनप्लस इंडिया म्हणाले, “वनप्लस येथे आमच्या वापरकर्त्यांचे आयुष्य सुधारणारे डिव्हाइस तयार करण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञानाच्या सीमा ओलांडण्याचे तत्त्वज्ञान आम्ही नेहमीच पाळले आहे. या विश्वासाची परिणती म्हणजे हा वनप्लस 15 आहे. वेगवान आणि सुरळीत अनुभवाच्या आमच्या वारशावर आधारित, आम्ही कमालीची कामगिरी दर्शविणारा सर्वित्कृष्ट (फ्लॅगशिप) फोन तयार केला आहे, त्यास तंत्र पुरविले आहे, जेणेकरून आपण फोन चालू करून तो अमर्यादित वापरू शकता.”
मोबाइल पॉवरचे नवीन युग
वनप्लस 15 सादर करून वनप्लसने पुन्हा एकदा स्मार्टफोन कामगिरीचा स्तर उंचालवा आहे आणि एक असे अभिनव ट्रिपल-चिप आर्किटेक्चर सादर केले आहे जे अभूतपूर्व सुरळितपणा प्रदान करता यावा म्हणून एकामोगोमाग एक अशा स्वरूपात कार्य करते. स्नॅपड्रॅगन® 8 एलिट जेन 5 मोबाइल प्लॅटफॉर्म त्याच्या केंद्रस्थानी असल्याने एसओसी असलेले भारतातील पहिले डिव्हाइस अत्याधुनिक सीपीयू आणि जीपीयू कामगिरी प्रदान करत आहे, ज्यामुळे एकसंध रूपाने वेगवेगळी कामे करता येतात आणि सुरळीत, तल्लीन करून सोडणारा गेमिंग अनुभव लाभतो. यात उद्योग-अग्रगण्य 3200हर्ट्झ इन्स्टंट टच सॅम्पलिंग प्रदान करणारी एक समर्पित टच रिस्पॉन्स चिप घातलेली आहे ज्यामुळे अतिशय सुरळीत व्हिज्युअल्स आणि अद्वितीय प्रतिसाद लाभतात. एक स्वतंत्र वाय-फाय चिप हे त्रिकूट पूर्ण करते ज्यास गजबजलेल्या वातावरणातही मजबूत, अधिक स्थिर कनेक्शन प्रदान करणारे तंत्र पुरविण्यात आले आहे. एकत्रितपणे, ते समन्वय साधून काम करतात आणि गेमिंग, मल्टीमीडिया व भरपूर वेगवेगळी कामे करण्याच्या परिस्थितींमध्ये सातत्याने सुरळीत आणि प्रतिसादात्मक अनुभव सुनिश्चित करतात.
360 क्रायो-व्हेलोसिटी कूलिंग सिस्टम या तीन विशेष चिप्सना परिपूरक आहे. एरोजेल इन्सुलेशन आणि पांढऱ्या ग्रॅफाइटसह एरोस्पेस-श्रेणीची सामग्री असल्याने ही प्रगत कूलिंग सिस्टम कार्यक्षमतापूर्वक उष्णता दूर करून स्थिर, शाश्वत कामगिरी राखण्याची क्षमता प्रदान करते जी दीर्घकाळ गेमिंग करताना किंवा गहन कामांमध्ये कमालीचा ओघ दाखविते.
वनप्लसने आपल्या सुरळीत डिस्प्ले देऊ करण्याच्या प्राविण्यावर आधारित उद्योगातील पहिला 1.5के 165हर्ट्झ एलटीपीओ डिस्प्ले सादर केला आहे, ज्यामुळे प्रथमच रेटिना-स्तरीय स्पष्टता आणि अतिशय सुरळितपणा एकत्र प्रदान करत आहे. या डिस्प्लेमध्ये बाहेर असताना उत्कृष्ट पद्धतीने पाहता यावे म्हणून 1800 निट्सचा उच्च ब्राइटनेस मोड (एचबीएम) आणि रात्रीच्या वेळी आरामात पाहता यावे म्हणून 1 निट पर्यंत प्रकाश मंद करण्याची क्षमता असून त्यास टीयूव्ही राईनलँड इंटेलिजेंट आय केअर 5.0 द्वारे प्रमाणित केले आहे आणि हे पाहताना अधिक आराम प्रदान करते.
वनप्लस
15 मध्ये गेमिंग


