Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedइमोस्केपच्या माध्यमातून आरोग्यसेवेत भावनिक मूल्यमापनाचा समावेश करणारी जहांगीर वेलनेस सेंटर ठरली जगातील...

इमोस्केपच्या माध्यमातून आरोग्यसेवेत भावनिक मूल्यमापनाचा समावेश करणारी जहांगीर वेलनेस सेंटर ठरली जगातील पहिली आरोग्यसंस्था

 

~ भावनिक कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेत एकत्रीकरण करणारा हा नवा उपक्रम व्यक्तींना त्यांच्या भावनांचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम समजून घेण्यास मदत करतो. ~

 

 

पुणे, भारत, 18 नोव्हेंबर 2025 : पुणे येथील जहांगीर वेलनेस सेंटर (जेडब्ल्यूसी) ही प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेत एआय आधारित भावनिक मूल्यांकनाची औपचारिकरीत्या सांगड घालणारी जगातील पहिली आरोग्यसंस्था ठरली आहे. निहिलेंट यांनी तयार केलेला इमोस्केप या वैद्यकीय श्रेणीतील इमोशन एआय प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी करून त्यांनी हे साध्य केले आहे. ही भागीदारी भावनिक आणि शारीरिक आरोग्याच्या एकत्रित हिताच्या दिशेने उचलण्यात आलेले पुढचे पाऊल आहे. या भागीदारीमुळे आरोग्यसेवा क्षेत्रात मानवकेंद्री इनोव्हेशनसंदर्भात भारताला आघाडीचे स्थान प्राप्त झाले आहे.

इमोस्केपच्या समावेशामुळे जहांगीर वेलनेस सेंटरला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस आता नॉन-इन्वेसिव्ह भावनिक स्कॅनची सुविधा उपलब्ध झाली आहे. हा स्कॅन नऊ मूलभूत भावनांचे म्हणजे रौद्र, भयानक, हास्य, शृंगार, अद्भुत, बीभत्स, शांत, वीर आणि करुण या नवरसांचे मूल्यांकन करतो. अवघ्या 60 सेकंदांत हा प्लॅटफॉर्म सुरक्षित आणि स्पर्शविरहित तंत्रज्ञानाद्वारे भावनिक तीव्रता आणि त्यातील प्रवृत्ती मॅप करतो. त्यानंतर हे निष्कर्ष शारीरिक आरोग्य निर्देशकांच्या संदर्भात समजावून घेतले जातात, ज्यामुळे भावनिक पॅटर्न्स शरीरातील लक्षणांवर कसा प्रभाव टाकत आहेत किंवा रिकव्हरी (बरे होण्याच्या) प्रक्रियेवर कसा परिणाम करत आहेत याबाबत नवे आकलन प्राप्त होते.

नियमित वेलनेस तपासणीचा एक भाग म्हणून या स्कॅनचा समावेश करत जहांगीर वेलनेस सेंटरतर्फे वेळेत निदान व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेच्या क्षेत्रात एक नवा दृष्टीकोन पुढे आणत आहे. या दृष्टीकोनामध्ये भावनिक निरोगीपणा हा केवळ पूरक भाग नव्हे तर महत्त्वाचा निदान घटक समजला जात आहे.

या संदर्भात एएफएमसीचे माजी डीन आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसच्या माजी कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर म्हणाल्या, “वैद्यकीय शाखा ही केवळ रोगनिवारणापुरती नसते तर माणूस एकूणच कसा आहे हे जाणून घेण्यासाठी या शाखेचा उपयोग होतो. इमोस्केपमुळे विज्ञान व तंत्रज्ञानाच्या नजरेतून भावना समजून घेण्यास मदत होते. त्यामुळे, भावनिक आरोग्य हे शारीरिक आरोग्यापासून वेगळे करता येत नाही, याची आपल्याला जी जाणीव आहे, त्याचा पुरावा मिळतो. जहांगीर वेलनेस सेंटरमधील ही सुरुवात हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

“मन व शरीर यांच्यातील संबंध समजून घेणे यातच खऱ्या अर्थाने मानवाचे हित दडलेले आहे यावर जहांगीर वेलनेस सेंटरमध्ये आमचा विश्वास आहे. आमच्या सर्वांगीण आरोग्यसेवेमध्ये एआयवर आधारित भावनिक मूल्यमापनाचा समावेश करून प्रगत आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आमच्या केंद्राने आज अजून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.”, असे जहांगीर हॉस्पिटलचे ट्रस्टी कॉवस जहांगीर म्हणाले.

“तंत्रज्ञान मानवोपयोगी करणे, जेणेकरून इनोव्हेशनच्या माध्यमातून मानवी आयुष्याची सेवा करता येईल, हे निहिलेंटमध्ये आमचे मिशन आहे. यासाठीचा एक सर्वात अर्थपूर्ण मार्ग म्हणजे, आतापर्यंत अदृश्य असलेल्या आपल्या भावना दृश्य करून देत आरोग्यसेवेला मदत करणे. मन व शरीर हे एकाच यंत्रणेचा भाग आहेत आणि आजार बरा करण्यासाठी भावना समजून घेणे आवश्यक आहे, या धारणेच्या आधारे इमोस्केपचा जन्म झाला. आता हे तंत्रज्ञान आरोग्यसेवेचा भाग बनताना आणि डॉक्टर व रूग्णांना भावनिक पॅटर्न्सचा शारीरिक आरोग्याशी असलेला संबंध समजून घेण्यास मदत करताना पाहणे, ही अत्यंत समाधान देणारी गोष्ट आहे.”, असे निहिलेंटचे संस्थापक – कार्यकारी उपाध्यक्ष श्री. एल. सी. सिंग म्हणाले.

“इमोस्केप हे एकात्मिक आरोग्यसेवेतील पुढचे महत्त्वाचे पाऊल आहे. यात भावनिक जाणीव आणि वैद्यकीय माहिती यांची सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यप्रवासाचे अधिक संपूर्ण चित्र समोर येते. व्यक्तीच्या एकूण आरोग्याकडे लक्ष देण्याचा जहांगीर वेलनेस सेंटरमध्ये आमचा नेहमीच उद्देश राहिला आहे. निहिलेंटसोबतची ही भागीदारी अधिक परिपूर्ण आणि सहानुभूतीपूर्ण आरोग्यसेवेकडे जाणारे एक पाऊल आहे,” असे जहांगीर हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनोद सावंतवाडकर म्हणाले.

शरीर, मन व आत्म्यावर लक्ष केंद्री करत सर्वांगीण कल्याण साधणारे एकमेव केंद्र, अशी जहांगीर वेलनेस सेंटरची ओळख निर्माण झाली आहे. त्यांची सर्वसमावेशक हेल्थ पॅकेजेस, पूरक उपचार पद्धती आणि इमोस्केपसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रम या घटकांच्या एकत्रीकरणामुळे, हे केंद्र आरोग्याकडे पाहण्याचा संपूर्ण आणि एकात्मिक दृष्टिकोन स्पष्टपणे दाखवून देते.

जहांगीर वेलनेस सेंटरमध्ये इमोस्केपचा भावनिक मूल्यमापन डेटा वैद्यकीय रिपोर्ट्स आणि तपासण्यांसोबत वापरला जातो, ज्यामुळे रुग्णाचा एक सर्वांगीण दृष्टिकोन तयार होतो आणि त्यानुसार पुढील उपचार ठरवले जातात. जेडब्ल्यूसीमध्ये इमोस्केपचा वापर सुरू झाल्यापासून विविध वयोगटांत त्याविषयी उत्सुकता वाढताना दिसत आहे. बर्नआऊटचा सामना करणारे कार्यरत वर्किंग प्रोफेशनल असोत, व्यक्तिमत्त्व बदलाच्या टप्प्यातील तरुण असोत किंवा एकाकीपणातून जात असलेले ज्येष्ठ, तसेच भावनिक स्थैर्य वाढवू इच्छिणाऱ्या व्यक्ती असोत, सर्वांनाच वैद्यकीय संदर्भात भावनिक स्पष्टतेचे महत्त्व जाणवत आहे. हा प्लॅटफॉर्म जेडब्ल्यूसीच्या संपूर्ण आणि एकात्मिक आरोग्यदृष्टीला एक प्रभावी पूरक ठरत आहे. प्रत्येक स्कॅन गोपनीय ठेवला जातो आणि डेटा गोपनीयतेसाठी निर्धारित सर्वोच्च मापदंडांचे काटेकोर पालन करून प्रक्रिया केली जाते.

या लॉन्चमुळे आरोग्य क्षेत्रातील इमोस्केपच्या पहिल्या संस्थात्मक भागीदारीची नोंदही झाली आहे. आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि कॉर्पोरेट अशा विविध क्षेत्रांत कठोर चाचण्या झाल्यानंतर, जहांगीर वेलनेस सेंटरमधील इमोस्केपचे एकत्रीकरण हे रुग्णालये, दवाखाने आणि वैद्यकीय संस्थांमध्ये त्याच्या व्यापक स्वीकाराच्या दिशेने टाकलेले पाऊल मानले जात आहे. रुग्णांसाठी वेलनेस प्रोटोकॉलचा औपचारिक भाग म्हणून इमोस्केपची सुविधा देत, जहांगीर वेलनेस सेंटर अधिक सर्वांगीण आणि संवेदनशील आरोग्यसेवेच्या मॉडेलला गती देत आहे. उपचार प्रक्रियेत भावनांची भूमिका अधिक स्पष्ट आणि महत्त्वपूर्ण ठरावी आणि मन-शरीर संतुलन पुनर्स्थापित करण्यासाठी तंत्रज्ञानाने सहाय्य करावे, अशा नव्या आरोग्यदृष्टीचा संकेत या उपक्रमातून मिळतो.

निहिलेंट आणि जहांगीर वेलनेस सेंटर यांच्या सहयोगामुळे पुण्याला ग्लोबल इनोव्हेशनच्या नकाशावर ठळक स्थान प्राप्त झाले आहे. वैद्यकीय शाखेतील नवता ही केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञानातच नव्हे तर मानवतेच्या दृष्टीने आरोग्यसेवेकडे नव्या नजरेतून पाहण्याचे धाडस करणे ही आरोग्यसेवेची भविष्यातील वाटचाल असणार आहे, हे यातून

दिसून येते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments