गुनीत मोंगा कपूर यांच्या सिख्या एंटरटेन्मेंटची निर्मिती असलेला, गिरीश जोतवानी यांनी साकारलेला आणि लिहिलेला तसेच, साकिब पांडोर यांनी निर्देशन केलेला सीओ-इडी ॲमेझॉन एमएक्स प्लेअरवर दिनांक 20 नोव्हेंबर रोजी विशेष स्वरुपात प्रिमियर होत आहे, तो ही अगदी मोफत~
शालेय जीवनातील गोंधळ, क्रश आणि संभ्रम पुन्हा अनुभवण्यासाठी आता सज्ज व्हा. ॲमेझॉनची मोफत व्हिडिओ स्ट्रिमिंग सेवा-ॲमेझॉन एमएक्स प्लेयरने को-एड या आपल्या न्यू कमिंग-ऑफ-एज ड्रामाचे ट्रेलर नुकतेच अनावरीत केले, नंतर बालदिनाला टीजर रिलिज करण्यात आले. फक्त मुले व फक्त मुलींच्या शाळेच्या पार्श्वभूमीवरुन सुरुवात होऊन, पुढे अनेक वर्षांनी त्या वातावरणात गुंगायला होते, नंतर किशोरवयीन जगासोबत सामना झाल्यावर चुकांची मिश्किल कॉमेडी, वादविवाद, उत्सुकता आणि पहिल्या-वहिल्या प्रेमाची अनुभूती मिळते. गुटर गू सारख्या अतिशय लोकप्रिय सिरीजमागची जोडी, सिख्या एंटरटेन्मेंट आणि निर्देशक साकिब पांडोर आणखी एक वास्तववादी कथा घेऊन आले आहेत ज्यात विनोद, भावनिकता आणि आठवणींचा समावेश होतो. वेदांत सिन्हा, अद्रिजा सिन्हा, वरुण बडोला आणि राजेश्वरी सचदेव यांच्या प्रमुख भूमिका असलेला, सीओ-इडी आपल्या कौटुंबिक कथानकामार्फत तुम्हाला एका दृदयस्पर्शीरोलर कोस्टर सफरीवर घेऊन जाणार आहे.
ट्रेलरमध्ये दोन विरुध्द वृत्ती अचाकन समोरासमोर आल्यावर मजेशीरपणे घडणारे प्रसंग दिसतात. शिखा आण निखील पारवानी याहून वेगळे असूच शकत नाहीत. शिखा बेधडक, स्पष्ट बोलणारी आणि बॅक बेंचर आहे, तर याउलट निखील भित्रा, लाजाळू आणि क्लास टॉपर आहे. अनपेक्षितपणे मुलांची आणि मुलींची शाळा एकत्र करण्यात आल्यावर ते गोंधळतात. हास्य, संभ्रम आणि भावनीक क्षणांसोबत व्यक्तीमत्वांमध्ये खटके उडतात आणि मजेशीर चढाओढी होतात. विनोद, नॉस्टाल्जिया आणि भावनांचा सुंदर मिलाफ असलेला को-एड वाढत्या वयातल्या गुंत्याला, जादू आणि वेडेपणाला चपखलपणे आपल्या समोर आणतो.
सिरीजबद्दल बोलताना ॲमेझॉन एमएस प्लेअरचे डायरेक्टर आणि हेड ऑफ कंटेंट, अमोघ दुसाद म्हणाले, “दैनंदिन जीवनातल्या बारकाव्यांना दाखवत सर्व वयोगटांमधल्या प्रेक्षकांची नेहमी करमणूक करणे हा ॲमेझॉन एमएक्स प्लेअरचा उद्देश आहे. को-एड वाढत्या वयातल्या मुलांची उत्सुकता, संभ्रम आणि धैर्य दाखवणारे हृदयस्पर्शी कथानक आहे-हा जीवनातला असा टप्पा असतो, जिथे खेळकरपणा आणि महत्वाच्या शिकवणी एकत्रितपणे अगदी सहज अनुभवता येतात. सिख्या एंटरटेन्मेंटसोबतच्या आमच्या सहयोगाला पुढे नेण्यासाठी आम्ही अतिशय उत्सुक आहोत, ज्यायोगे भारतीय प्रेक्षक वर्गाला आणखीन एक आपलीशी वाटणारी, नॉस्टॅल्जिक गोष्ट पाहता येईल.”
गुनीत मोंगा कपूर, सिख्या एंटरटेन्मेंट, म्हणाल्या, “गुटर गू सिरीजच्या 3 सिजन्सनंतर नवीन आणि तरुणाईसोबत साधर्म्य साधणारी गोष्ट सादर करण्यासाठी को-एडमध्ये, गिरीश जोतवानी आणि दिग्दर्शक साकिब एकत्र आले आहेत. निर्भिड आणि उत्साही अद्रिजा सिन्हा आणि वेदांत सिन्हा यांनी पारवानी ट्विन्स म्हणूनसर्व विपरीत घडू लागल्यावर एकत्र जगणे म्हणजे काय असते हे ख-या अर्थाने समजून घेतले आहे! साकिब आणि गिरीश यांच्या जोडीने भावंडांचे प्रेम, सहका-यांचा दबाव, मित्रत्व आणि नवीन आयामांचा सामना करणारे मजेदार कुटुंब असणारे सुंदर जग निर्माण करण्यासाठी अपार श्रम घेतले आहेत. वरुण बडोला आणि राजेश्वरी सचदेव यांच्या सारख्या दिग्गज अभिनेत्यांनी अतिशय मायेने आणि खरेपणाने पालकांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. को-एड मनाला भिडतो, करमणूकपर आणि वास्तवादी आहे, प्रेक्षकांना ही अनुभूती लवकरात लवकर मिळेल.”
सिरीजबद्दल बोलताना, अनुभवी अभिनेता वरुण बडोला म्हणाले, “सीओ-इडी तरुणाईच्या उंबरठ्यावरच्या मुलामुलींच्या आयुष्यातला गोंधळ प्रस्तुत करतो, दोन शाळा एकत्र आल्यावर आणि सर्वांना ते जबरदस्तीने बाणवून घ्यावे लागल्यावर तो आखणीन गडद होतो. यातला पालकांचा समांतर प्रवास आम्हाला अतिशय आवडला. कथेमधला पालक म्हणून मुलांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना वाढवणे आम्ही नक्कीच समजू शकतो. भावना, अपेक्षा आणि सामाजिक समजूती टकरावणा-या एखाद्या मध्यम वर्गीय कुटुंबाप्रमाणेच हे ट्विन्स वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होतात. मोठे होणे ही केवळ वाढत्या मुलांची गोष्ट नाही, तर पालकांना देखील त्याचा अनुभव येतो याची आठवण को-एड करुन देतो.”
आपली मते मांडताना राजेश्वरी सचदेव म्हणाल्या, “को-एड वाढत्या वयाच्या गुंतागुंतीच्या, मजेशीर आणि भावनीक टप्प्याला अचूकपणे मांडतो. अगदी मुलांचा नाही तर पालकांचा देखील दृष्टिकोन दाखवतो. गोष्टीमधली आई म्हणून मी मुलांना जपण्यात आणि त्यांना स्वत:चा मार्ग स्वत: शोधू देण्यातली ओढाताण समजू शकते. मोठे होणे म्हणजे मुले आणि पालक यांनी जोडीने केलेला प्रवास असतो याची आपल्याला इथे आठवण करुन दिण्यात आलेली आहे.”
कथानकाचे उत्पत्तीकर्ता गिरीश जोतवानी आणि दिग्दर्शक साकिब पांडोर म्हणाले, “को-एड मध्यम वर्गीय कुटुंबाचे कथानक आहे, ज्यामध्ये गोंधळ, मिश्किलपणा आणि भावनांचा आमनासामना होतो. पारवानी ट्विन्सच्या मार्फत आपण आपल्या शाळेच्या आठवणींना उजाळा देतो, पालक आणि त्यांच्या वाढत्या मुलांमधल्या बदलत्या नात्याला आठवतो. एकत्र येऊन अशा जगाची जडणघडण करण्यात वेगळाच आनंद आहे, आमच्या कलाकारांनी देखील त्याला सजीव करण्यासाठी, खासकरुन उदयपूरच्या प्रचंड उन्हाळ्यामध्ये शुटिंगच्यावेळी निकराचे प्रयत्न केले आहेत. आम्हाला अशी अपेक्षा आहे की प्रेक्षकांना को-एडमध्ये त्यांच्या स्वत:च्या कुटुंबाची झलक पहायला मिळेल. या आमच्या आवडत्या दुनियेचा तुम्ही देखील आनंद घ्या.”
को-एड ॲमेझॉन एमएक्स प्लेयरवर विशेष स्वरुपात 20 नोव्हेंबरला प्रीमियर होणार आहे, एमएक्स प्लेयर ॲप, ॲमेझॉन शॉपिंग ॲप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही आणि एयरटेल एक्स्ट्रिमवर आपल्याला अगदी मोफत मिळणार आहे.


