पुणे, 21 नोव्हेंबर २०२५ : इंडसर्चच्या प्रोफेसर प्रमोद पारखी सेंटर फॉर बँकिंग, फायनान्स अँड इन्श्युरन्स तर्फे बारावी आंतरमहाविद्यालयीन संशोधन प्रबंध स्पर्धा (इंटर कॉलेजिएट रिसर्च पेपर कॉम्पिटिशन) आयोजित करण्यात आली होती. टेरिफ वर्सेस फ्री ट्रेड : विच विल स्ट्रेंथन द ग्लोबल इकॉनॉमी ? ही या स्पर्धेची संकल्पना होती. ही स्पर्धा इंडसर्चच्या बावधनच्या कॅम्पसमध्ये पार पडली. या स्पर्धेचे उदघाटन विलो इंडियाचे चीफ सेल्स ऑफिसर (मुख्य विक्री अधिकारी) डॉ. रवींद्र उटगीकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी इंडसर्चचे सरसंचालक डॉ.अशोक जोशी, संचालिका डॉ.अपर्णा टेंबुलकर, युजी प्रोग्रॅमच्या डीन व इंटरनॅशनल रिलेशन्सच्या प्रमुख डॉ.सुनिता जोशी,आयोजन समितीच्या अध्यक्ष प्रा.डॉ. रुपाली गुप्ते आणि मंदार पारखी आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत महाराष्ट्रासह इतर राज्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत 8 महाविद्यालयांतील 26 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून एकूण 11 संशोधन प्रबंध सादर करण्यात आले. डॉ. रुपाली गुप्ते यांनी स्पर्धेच्या संकल्पनेबाबत थोडक्यात माहिती दिली.
या स्पर्धेत आयबीएस पुणे चे कीर्ती मोटवानी व हितेश मोटवानी हे प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले. नाशिक येथील जे.डी.सी. बिटको इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चच्या स्वानंद पारखी व योगेश अहिरे यांनी दुसरे पारितोषिक तर तृतीय पारितोषिक इंडसर्च पुणेच्या अभिषक शेठ व पार्थ गुप्ता यांना मिळाले.
प्रा. तुषार हळबे आणि डॉ. विकास पेशवे यांनी या स्पर्धेत परीक्षकांची भूमिका बजावली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एमबीएच्या द्वितीय वर्षातील रश्मिन वीरकर आणि सायली मगदूम यांनी केले
.


