रस्क मीडिया आणि रिकर क्लब निर्मित आणि स्टॉकग्रो आणि लेगसी कलेक्टिव्हचे सह-समर्थन लाभलेली भारत के सुपर फाउंडर्स लवकरच ॲमेझॉन एमएक्स प्लेअरवर प्रेक्षकांसाठी विनामूल्य उपलब्ध होणार आहे ~
मुंबई, भारत – 21 नोव्हेंबर 2025 : ॲमेझॉन एमएक्स प्लेअर या ॲमेझॉनच्या विनामूल्य व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिसतर्फे भारत के सुपर फाउंडर्स या भारताच्या स्टार्टअप मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या हाय-स्टेक्स असलेल्या उद्योजकीय रिअॅलिटी सीरिजचे अनावरण करण्यात आले आहे. ही सीरिज भारतातील स्टार्टअप एंटरटेनमेट क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा आहे. सुनील शेट्टी या शोचे सूत्रसंचालक व मार्गदर्शक असून या शोच्या निमित्ताने देशातील काही उदयोन्मुख फाउंडर्स एकत्र येणार आहेत आणि प्रख्यात बिझनेस टाकून्ससमोर ते आपल्या कल्पना मांडतील. या बिझनेस टायकून्सनी रिकर क्लबसोबत संयुक्तपणे भारताच्या स्टार्टअपच्या स्वप्नाला निधी पुरविण्यासाठी ₹100 कोटींची तरतूद केली आहे. यामुळे, भारतीय मनोरंजन प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकत्रित गुंतवणुकीची रक्कम ठरते.
अस्सलपणा, पारदर्शकता आणि उद्योजकतेच्या प्रवासाबद्दल असलेला आत्यंतिक आदर असलेल्या या फॉरमॅटमध्ये भारत के सुपर फाउंडर्समध्ये प्रत्येक बिझनेस पिच हे व्हेरिफाय केलेली माहिती, विश्वसनीय डेटा आणि बिझनेस चालविण्यासाठी आवश्यक असलेली खरी, मूलभूत तत्वे यांचा आधार असेल याची खातरजमा करण्यात येते. या शोमध्ये करण्यात येणारे करार खऱ्या गुंतवणुकीच्या उद्देशावर आधारित आहेत. त्यामुळे निर्णयप्रक्रिया स्पष्ट, पारदर्शक व जबाबदारीपूर्ण असते. या वैशिष्ट्यांमुळेच भारत के सुपर फाउंडर्स हा शो इतर कोणत्याही उद्योजकीय रिॲलिटी शोपेक्षा अनोखा ठरतो. या शोच्या नावाप्रमाणेच यात वैविध्य, आव्हानांवर मात करून पुन्हा भरारी घेण्याची क्षमता आणि देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील उद्योजकाची महत्त्वाकांक्षा यांचे कौशल्य साजरे करण्यात आले आहे आणि या ठिकाणी सुपरफाउंडर्स सर्वात महत्त्वाचे असतात. ज्या व्यक्तींच्या कल्पना, धारणा आणि चिकाटीमध्ये अर्थपूर्ण बदल घडविण्याची क्षमता आहे, अशा व्यक्तींची दखल घेण्यात येते.
या ध्येयाला बळ देणारी देशातील काही सर्वात प्रभावशाली उद्योगपतींची बलाढ्य टीमही शोमध्ये सहभागी आहे. यात डॉ. ए. वेलुमणी (क्रिएटर, थायरोकॅर), नितीश मिटरसेन (जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ, नझारा टेक्नॉलॉजीज), डॉ. आरती गुप्ता (मॅनेजिंग पार्टनर, ॲनिकार्थ व्हेंचर्स), शांती मोहन (संस्थापक आणि सीईओ, एलव्हीएक्स), आदित्य सिंह (सह-संस्थापक, ऑल इन कॅपिटल) आणि अंकुर मित्तल (सह-संस्थापक / पार्टनर, फिसिस कॅपिटल आणि इंफ्लेक्शन पॉईंट व्हेंचर्स) यांचा समावेश आहे. संपूर्ण सीझनमध्ये या सोबत वेगवेगळे नामांकित बिझनेस लीडर्स पॅनेलमध्ये सहभागी होतात. त्यांच्या उपस्थितीमुळे गुंतवणुकीकडे विविध दृष्टीकोनातून पाहण्याची, वेगवेगळ्या क्षेत्रांची सखोल समज आणि वेगवेगळ्या गुंतवणूक तत्त्वज्ञानांची भर पडते. त्यांच्यासोबतच ₹100 कोटींच्या आश्वासक तरतूदीसह मुख्य योगदानकर्ते म्हणून रिकर क्लबचे एकलव्य गुप्ता सहभागी होतात आणि त्यांच्या समावेशाने भारत के सुपर फाउंडर्स प्लॅटफॉर्मला रिकरचे एआय नेटिव्ह डेट इन्फ्रास्ट्रक्चर लाभते. या संयुक्त दृष्टीकोनातून दिशा ठरवण्यासाठी इक्विटीचा वापर आणि व्यवसायाचा विस्तार वेगाने साधण्यासाठी डेटचा आधार घेऊन आजच्या काळात भारतातील बळकट कंपन्यांची उभारणी कशी होते हे प्रतिबिंबित होते.
शो फॉरमॅटविषयी माहिती देताना ॲमेझॉन एमएक्स प्लेअरचे संचालक व हेड ऑफ कंटेन्ट अमोघ दुसाद म्हणाले, “भारत के सुपर फाउंडर्ससह उद्योजकता रिॲलिटीच्या क्षेत्रात अस्सलतेसाठी नवा मापदंड निश्चत करणारा फॉरमॅट सादर करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. खरी गुंतवणूक आणि व्हेरिफाइड पिच दाखवून आम्ही भारतभरातील फाउंडर्ससाठी संधींचे लोकशाहीकरण करत आहोत आणि ज्या कल्पनांची व्यापक प्रमाणावर अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे अशा कल्पना प्रकाशात आणत आहोत. या शोच्या निमित्ताने आमची भारतीय इनोव्हेटर्सना सक्षम करणारा, प्रेरणा देणारा आणि त्यांच्या गुणवत्तेची दखल घेणारा कंटेन्ट तयार करण्याची आमची बांधिलकी दिसून येते.”
ॲमेझॉन एमएक्स प्लेअरच्या संचालक अरुणा दर्यानानी म्हणाल्या, “भारताच्या महत्त्वाकांक्षेचे व वैविध्यतेचे प्रतिनिधीत्व करणारे चॅम्पिनय फाउंडर्स दाखविणे हे या शोमागचे आमचे व्हिजन आहे. आमच्या आदरणीय टायकून्सनी ₹100 कोटींची तरतूद केली असून जे व्यवसाय पुढील उडी घेण्याच्या तयारीत आहेत, त्यांच्यासाठी हा शो एक उत्प्रेरक ठरणार आहे. या फाउंडर्सचे पॅशन आणि उद्दिष्ट गाठण्याची तळमळ पाहून आमचे भारतभरातील प्रेक्षक प्रेरित होतील, अशी आमची खात्री आहे.”
या शोमध्ये सहभागी होता आल्याबद्दल सूत्रसंचालक व मार्गदर्शक सुनील शेट्टी म्हणाले, “उद्योजकता ही नव्या भारताच्या हृदयातील धडधड आहे. भारत के सुपर फाउंडर्स हा उद्याचे भविष्य घडविणाऱ्या बदलकर्त्यांची दखल घेणारा शो आहे. या मंचावर येणाऱ्या प्रत्येक फाउंडरकडे सांगण्यासाठी एक सुरस कथा असेल आणि या प्रवासा पुढे जाण्यास त्यांना मार्गदर्शन करता येणे हा मी माझा बहुमान समजतो.”
या शोमधील एक टायकून एव्हीएमलॅब्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि थायरोकेअरचे क्रिएटर व गुंतवणूकदार डॉ. ए. वेलूमणी म्हणाले, “भारतात ध्येयकेंद्री, दूरदर्शी आणि चिकाटी असलेले फाउंडर्स मोठ्या संख्येने आहेत. त्यांना केवळ चांगल्या मार्गदर्शनाची व खऱ्या संधीची आवश्यकता आहे. या शोच्या निमित्ताने त्यांना अखेर एक असा प्लॅटफॉर्म मिळणार आहे, जिथे त्यांच्याकडे लक्ष वेधले जाईल आणि त्यांना एक ओळख प्राप्त होईल. येथे आम्ही त्यांच्यात गुंतवणूक करण्यासोबतच त्यांना जबाबदारी व उत्तरदायित्वासह अंमलबजावणी करण्यास व व्याप्ती वाढविण्यास मार्गदर्शन करणार आहोत. भारताला 1.5 अब्ज लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी 15 लाख यशस्वी उद्योजक हवे आहेत. या मंचावर स्टार्टअपमध्ये नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास दिला जाणार आहे आणि देशभरात लक्ष्यकेंद्री, सक्षम, शिस्तबद्ध आणि परिणामकारक उद्योजकतेची लाट आणली जाईल.”
वैविध्यपूर्ण प्रस्ताव, पॉवरहाऊस पॅनल आणि खरी गुंतवणूक करणारा चाकोरीबाहेरचा फॉरमॅट असलेला भारत के सुपर फाउंडर्स हा लवकरच ॲमेझॉन एमएक्स प्लेअरवर मोफत पाहता येणार आहे. एमएक्स प्लेअर ॲप, ॲमेझॉन शॉपिंग ॲप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही आणि एअरटेल एक्स्ट्रीमवर ॲमेझॉन एमएक्स
प्लेअर उपलब्ध आहे.


