Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड महापालिका मतदार यादीबाबत

पिंपरी -चिंचवड महापालिका मतदार यादीबाबत

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीचे अनुषंगाने मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्र. रानिआ/मनपा-२०२५/प्र.क्र.४१/का-५, दिनांक १३/११/२०२५ अन्वये प्रारुप मतदार यादी दि. २०/११/२०२५ रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथील मतदार यादी कक्ष व मनपाच्या आठही क्षेत्रीय कार्यालय तसेच मनपाचे www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करणेत आलेली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व मतदारांना मतदार यादीतील त्यांचे नांव कोणत्या प्रभागात आहे तसेच विधानसभेचा नंबर, भाग यादी क्रमांक व अनुक्रमांक हे शोधण्यासाठी मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी दिलेली लिंक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देणेत येत आहे. सदर संकेत स्थळावरुन मतदारांना मतदार यादीतील नांवावरुन व मतदार ओळखपत्रावरील इपिक नंबरचा वापर करुन त्यांचे नांव कोणत्या प्रभागात आहे हे शोधणे अधिक सुलभ, सोपे आहे. यासाठी सर्व मतदारांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वरील संकेत स्थळाचा मतदार यादीतील नांव शोधणेकरीता वापर करणेकामी आवाहन करणेत येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments