Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्व २०२४च्या अनुषंगाने...

महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्व २०२४च्या अनुषंगाने सूचना पाठविणेबाबत…

पिंपरी, दि.२६ फेब्रुवारी २०२४ :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन केले जाते. यावर्षीही दिनांक ११ एप्रिल२०२४ ते दिनांक १५ एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये विचार प्रबोधन पर्वामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांसाठी नागरिक आणि विविध संघटनांनी कार्यक्रम आयोजनासंदर्भातील सूचना लेखी स्वरुपात दिनांक ५ मार्च सायं ५.०० वाजेपर्यंत पिंपरी येथील महापालिका मुख्यालयातील माहिती व जनसंपर्क विभागात प्रत्यक्ष सादर कराव्यात अथवा pro@pcmcindia.gov.in या मेलवर पाठवाव्यात असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments