Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedपेट फेड पुणे 2025 चा उत्साहपूर्ण प्रारंभ!

पेट फेड पुणे 2025 चा उत्साहपूर्ण प्रारंभ!

 

 

पुणे, २२ नोव्हेंबर २०२५: पेट फेड – भारतातील सर्वात मोठा पाळीव प्राणी महोत्सव आणि लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड धारक ‘बिगेस्ट डॉग कार्निव्हल’ – याच्या ११व्या संस्करणाची रंगतदार सुरुवात आज पुण्यातील डेक्कन कॉलेज ग्राउंड येथे झाली. Royal Canin यांच्या प्रस्तुतत्वाखाली, Drools, Bowlers आणि Zepto यांच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात ११०० हून अधिक पाळीव प्राणी आणि अंदाजे ६५०० पाळीव प्राण्यांचे पालक व प्राणीप्रेमी सहभागी झाले, ज्यामुळे पहिला दिवस उत्साह, आनंद आणि समुदायभावनेने भरून गेला. सकाळपासूनच मास्टरक्लास अरेना, प्ले झोन, अ‍ॅजिलिटी रिंग, किटी प्ले पेन, कॅटॅपलूजा, दत्तक शिबिरे आणि १०० पेक्षा अधिक भारतीय व आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या स्टॉल्सला मोठी गर्दी झाली. Walk & Wags, Fetch & Fumble, Trick Trail, Bug Buster, Wheel of Woofs आणि Temptation Alley यांसारख्या स्पर्धांना विशेष प्रतिसाद मिळाला.

 

दिवसातील सर्वात आकर्षक क्षणांपैकी एक म्हणजे Snout Scout च्या प्रियांका पाटकी यांच्या सहकार्याने आयोजित ‘Security & Obedience Dog Show’. यात व्यावसायिक वर्किंग डॉग्सची उन्नत ट्रेनिंग तंत्रे, टॅक्टिकल मूव्ज आणि सर्च डेमो पाहून पुणेकर मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमातील विविध प्ले झोन्समध्ये डॉग आणि कॅटसाठी वेगवेगळे अ‍ॅजिलिटी स्ट्रक्चर्स, बॉल पूल्स, स्लाइड्स आणि इंटरअॅक्टिव्ह अ‍ॅक्टिव्हिटीज ठेवण्यात आल्या होत्या. पाळीव प्राण्यांच्या पालकांसाठी आरोग्य, ग्रूमिंग, पोषण, वर्तन, फोटोग्राफी आणि जबाबदार पाळीव प्राणीपालन यावरील मास्टरक्लासेस आयोजित करण्यात आले, ज्यामुळे हा महोत्सव केवळ मनोरंजन नव्हे तर ज्ञानवर्धनाचेही केंद्र ठरला.

 

कॅट विभागात कॅटॅपलूजाला प्रचंड उत्साह मिळाला. मजेदार खेळ, कम्युनिटी अ‍ॅक्टिव्हिटीज आणि मांजरांसाठी मोफत मायक्रोचिपिंग यामुळे अनेक कॅट पॅरेन्ट्सनी सक्रिय सहभाग घेतला. शेजारील इंटरनॅशनल कॅट शोमध्ये न्यायाधीश सुधाकर कटीकिणी आणि अ‍ॅन कॅरोल यांनी जागतिक ब्रीड स्टँडर्डनुसार मांजरांचे मूल्यांकन केले, ज्यामुळे अनेक प्रथमच आलेल्या अभ्यागतांनाही आकर्षित केले. SAW, UNICEF आणि Cheetos Foundation यांच्या दत्तक शिबिरांमध्ये दिवसभर मोठी गर्दी होती आणि प्राणी दत्तक घेण्यासाठी अनेकांनी रस दाखवला.

 

भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पाळीव प्राणी ब्रँड्सच्या रंगतदार स्टॉल्ससह पेट कॅरिकेचर, टॅरो रीडिंग, फेस पेंटिंग आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांनी महोत्सवाला अधिकच रंगत आणली. पेट फेडचे संस्थापक अक्षय गुप्ता म्हणाले, “पुणे नेहमीच आमच्यासाठी सर्वात प्रेमळ आणि उत्साही शहर राहिले आहे. पाळीव प्राणी आणि त्यांच्या पालकांचा इतका उत्स्फूर्त सहभाग पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. दिवस २ आणखी मोठा आणि रोमांचकारी असेल.” Royal Canin चे प्रतिनिधी सतिंदर सिंह यांनी सांगितले, “पेट फेड हे पाळीव प्राणीप्रेमी समुदाय, तज्ज्ञ आणि पालकांना एकत्र आणणारे अद्वितीय व्यासपीठ आहे. जबाबदार प्राणीपालन आणि मानव–पाळीव प्राणी नात्याचा उत्सव साजरा करणाऱ्या या उपक्रमाचा भाग होऊन आम्हाला अभिमान वाटतो.”

 

पेट फेड पुणे २०२५ चा दुसरा दिवस, २३ नोव्हेंबर रोजी, अधिक अ‍ॅक्टिव्हिटीज, मास्टरक्लासेस, शॉपिंग आणि मनोरंजनासह सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत डेक्कन कॉलेज ग्राउंड येथे सर्वांसाठी खुला राहील. तिकिटे www.petfed.org आणि BookMyShow वर उपलब्ध आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments