Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedपहिल्या थर्ड आय 16 वर्षाखालील क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत टेंभेकर फार्म्स संघाचा सहारा...

पहिल्या थर्ड आय 16 वर्षाखालील क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत टेंभेकर फार्म्स संघाचा सहारा क्रिकेट अकादमीवर सनसनाटी विजय आयुश शर्मा(110धावा)ची शतकी खेळी

पुणे, 28 फेब्रुवारी 2024: थर्ड आय स्पोर्टस अँड इव्हेंटस एलएलपी यांच्या वतीने आयोजित पहिल्या थर्ड आय 16 वर्षाखालील क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत आयुश शर्मा(110धावा) याने केलेल्या शतकी खेळीसह चैतन्य गायधनी(4-34)याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर टेंभेकर फार्म्स संघाने सहारा क्रिकेट अकादमी संघावर 1 धावेने थरारक विजय मिळवला.

सनराईज क्रिकेट स्कुल येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत टेंभेकर फार्म्स संघाने 43.4षटकात सर्वबाद 251धावा केल्या. यात आयुश शर्माने 114चेंडूत 12चौकार व 5 षटकाराच्या मदतीने 110 धावांची शतकी खेळी केली. त्याला अंश चरवडने 68चेंडूत 10चौकारासह नाबाद 60 धावा काढून साथ दिली.सहारा क्रिकेट अकादमीकडून सार्थक निकम(4-40), वरद प्रधान(3-34) यांनी सुरेख गोलंदाजी केली. याच्या उत्तरात सहारा क्रिकेट अकादमी संघ 40.5षटकात सर्वबाद 250धावावर संपुष्टात आला. यात साई दहिवाल 72, विहान केंजळे 63, आयुश चंगले 25 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. टेंभेकर फार्म्सकडून चैतन्य गायधनी( 4-34), शुभम पिंपळकर(2-26) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला 1धावेने विजय मिळवून दिला.

निकाल: साखळी फेरी:
टेंभेकर फार्म्स: 43.4षटकात सर्वबाद 251धावा(आयुश शर्मा 110(114,12×4,5×6), अंश चरवड नाबाद 60(68,10×4), शुभम पिंपळकर 15, सार्थक निकम 4-40, वरद प्रधान 3-34) वि.वि.सहारा क्रिकेट अकादमी: 40.5षटकात सर्वबाद 250धावा(साई दहिवाल 72(58,10×4,2×6), विहान केंजळे 63(38,13×4,1×6), आयुश चंगले 25, चैतन्य गायधनी 4-34, शुभम पिंपळकर 2-26); सामनावीर – आयुश शर्मा; टेंभेकर फार्म्स संघ 1धावेने विजयी;

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments