Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedनीना राजाराणी यांच्या नेतृत्वांतर्गत यूकेमधील संस्‍था सृष्‍टी डान्सक्रिएशन्स या डिसेंबरमध्ये भारताचा दौरा

नीना राजाराणी यांच्या नेतृत्वांतर्गत यूकेमधील संस्‍था सृष्‍टी डान्सक्रिएशन्स या डिसेंबरमध्ये भारताचा दौरा

नीना राजाराणी यांच्या नेतृत्वांतर्गत यूकेमधील संस्‍था सृष्‍टी डान्सक्रिएशन्स या डिसेंबरमध्ये भारताचा दौरा करत आहे, ज्‍यादरम्‍यान लाइव्‍ह म्‍युझिकसह तीन भारतीय शास्‍त्रीय नृत्‍यांचे संयोजन ‘प्‍ले बॉल’ सादर करत आहे. यूके व जगभरात सुरू झाल्‍यापासून अनेक प्रशंसा व सन्‍मान मिळवलेले हे संकल्‍पनेवर आधारित सादरीकरण नाट्याच्‍या माध्‍यमातून समाजात, विशेषत: प्रेम, क्रीडा व कॉर्पोरेट विश्वामध्‍ये महिलांच्‍या सर्वसमावेशक भूमिकेला अचूकपणे सादर करण्‍याप्रती त्‍वरित गरजेला निदर्शनास आणते.

 

प्‍ले बॉलमध्‍ये तीन विभाग आहेत. पहिला विभाग आहे ‘कडला… इज इट लव्‍ह?’. विशेषत: आज समाजात निष्‍ठा व प्रामाणिकपणाप्रती भावना कमी होत असताना हा विभाग आनंदी व यशस्‍वी नात्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या बाबींना प्रकाशझोतात आणतो.

 

दुसरा विभाग आहे ‘बेण्‍ड इट… लेट्स प्‍ले बॉल!’. हे उत्‍साही व धमालसामूहिक सादरीकरण आहे, ज्‍यामध्‍ये ताल व स्‍पर्धेसोबत नृत्‍यादरम्‍यान पायांची गुंतागूंतीची हालचाल आणि उत्‍साही ऊर्जा पाहायला मिळते.

 

तिसरा व शेवटचा विभाग आहे ‘क्विक!’, हा विभाग झपाट्याने विकसित होत असलेले कॉर्पोरेट विश्व आणि त्‍यामधील स्‍पर्धेला सादर करतो.

 

द बॉक्‍स हब पुणे येथे १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता आयोजन करण्‍यात आले आहे.

 

सृष्‍टी डान्‍स क्रिएशन्‍स बाबत

 

सृष्‍टी – नीना राजाराणी डान्स क्रिएशन्स लंडनमधील भारतीय नृत्यव संगीत संस्था आहे. भरतनाट्यम कलाकार नीना राजाराणी एमबीईयांनी १९९१ मध्‍ये या संस्‍थेची स्‍थापना केली. ही संस्था टूरिंग कंपनीआणि प्रशिक्षण केंद्र अशा दोन्ही प्रकारे काम करते, तसेच हॅरोआर्टस् सेंटरमध्ये कार्यरत आहे आणि यूकेमध्ये दक्षिण आशियाईनृत्य व संगीताला अधिक निपुण करण्‍यावर लक्ष केंद्रित करते.

 

सृष्‍टी यांच्‍या प्रोडक्‍शन्‍समध्‍ये शास्त्रीय भारतीय नृत्याचा, विशेषतःभरतनाट्यमचा तांत्रिक आणि सौंदर्यात्मक वारसा कायम राखलाजातो, तसेच या नृत्‍यप्रकाराला नाविन्यपूर्ण, समकालीन स्‍वरूपातसादर केले जाते. कंपनी प्रत्‍यक्ष संगीत व नृत्‍याच्‍या दृढ एकीकरणासाठी प्रसिद्ध आहे. तसेच संगीतकारांना मंचावर नर्तकांसोबत कोरिओग्राफ केलेल्‍या नृत्‍यांना दाखवते.

 

कंपनी यूकेमध्‍ये व आंतरराष्‍ट्रीय स्तरावर लहान आणि मध्यमकलाकृतींचे आयोजन करते, ज्‍यामध्‍ये ट्रिपल-बॉल ‘सेव्‍हन्‍स’ अशा नुकत्याच प्रोडक्‍शन्‍सचा समावेश आहे, ज्‍याचे भारतातील विविध शहरांमध्‍ये आयोजन करण्‍यात आले आहे. सादरीकरणासोत सृष्‍टी नृत्‍य व संगीत स्‍कूल आणि युवा शाखा (सृष्‍टी युवा कल्‍चर) देखील चालवतात, जेथे प्रशिक्षित परफॉर्मर व शिक्षकांचा समूह तयार केला जात आहे आणि ब्रिटनमधील दक्षिण आशियाई कला परिसंस्‍थेत मोठे योगदान दिले जाते.

 

नीना राजाराणी एमबीई यांच्‍याबाबत

 

नीना राजाराणी एमबीई लंडनमध्‍ये स्थित भरनाट्यम नर्तिका, कोरिओग्राफर आहेत, तसेच १९९१ मध्‍ये त्‍यांनी स्‍थापना केलेली स्‍वतंत्र भारतीय नृत्‍य व संगीत संस्‍था ‘सृष्‍टी – नीना राजाराणी डान्‍स क्रिएशन्‍स’च्‍या कलात्‍मक संचालिका आहेत.

 

त्‍यांनी लंडनमधील भारतीय विद्या भवन येथे भरतनाट्यममध्‍ये प्रशिक्षण घेतले, १९८० च्‍या मध्‍य काळात डिप्‍लोमा शिक्षण पूर्ण केले, ज्‍यानंतर यूके, युरोप, आशिया आणि ऑस्‍ट्रेलियामध्‍ये परफॉर्मिंग व अध्‍यापन करिअर सुरू केले. सृष्‍टीसोबत काम करताना त्‍यांनी भारतीय शास्‍त्रीय नृत्‍याची निष्‍ठा कायम ठेवण्‍यावर, तसेच नृत्‍यप्रकाराला समकालीन, विभिन्‍न संस्‍कृतीमध्‍ये सादर करण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे आणि लाइव्‍ह म्‍युझिकवर मुख्‍यत्‍वे भर दिला आहे.

 

राजाराणी यांच्‍या ‘क्विक!’ विभागासाठी कोरिओग्राफीला २००६ मध्‍ये द प्‍लेस प्राइजसह सन्‍मानित करण्‍यात आले, त्‍यावेळी ही युरोपमधील सर्वात मोठी नृत्‍यदिग्‍दर्शन स्‍पर्धा होती, ज्‍यासह यूके समकालीन मंचावर दक्षिण आशियाई नृत्‍याला मान्‍यता मिळाली. २००९ मध्‍ये त्‍यांना दक्षिण आशियाई नृत्‍याप्रती सेवेसाठी क्‍वीनच्‍या वाढदिवसाच्‍या सन्‍मानार्थ मेम्‍बर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्‍पायर (एमबीई) म्‍हणून

नियुक्‍त करण्‍यात आले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments