Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedलवकर निदान, लवकर उपचार " उपक्रम पिंपरी -चिंचवड महापालिकेतर्फे होणार

लवकर निदान, लवकर उपचार ” उपक्रम पिंपरी -चिंचवड महापालिकेतर्फे होणार

पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभागाचे दिव्यांग कक्षामार्फत दि.२९/०२/२०२४ रोजी ० (शुन्य) ते ६ वयोगटातील मुलांचे लवकर निदान व लवकर उपचार या प्रकल्पाअंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील ४५० बालवाडी शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे करणेत आले होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील २१० बालवाड्यांमध्ये “लवकर निदान लवकर उपचार” हा प्रकल्प राबविणेत येणार असून बालवाडी ताई व आशा ताई यांच्या माध्यमातून हा प्रकल्प कार्यन्वित होणार आहे. आढळलेल्या दिव्यांग मुलांना मोफत कृत्रिम अवयव सायाभूत साधने, अडथळ विरहित मुक्त संचार बालवाडी ताई व सहाय्यक यांच्यासाठी विशेष प्रशिक्षणे दिव्यांग मुलांच्या पालकांसाठी विविध माध्यमातून प्रशिक्षण त्याचबरोबर दिव्यांग कायदा २०१६ नुसार समायोजनाकडे, मुख्य प्रवाहाकडे नेण्यासाठी, त्यांचे दिव्यांगत्वव कमी करणे, नियंत्रणात आणणे. बालवाडी स्तरावर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, साधने इ. सुविधा उपलब्ध करून देणे. विविध प्रकारच्या थेरपी माध्यमातून त्यांचे दिव्यांगत्व नियंत्रणात आणणे व अवयव चलनशिलतेला गती देणे यानुसार समायोजनाचे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून पिंपरी चिंचवड महानगरपालिका या उपक्रमाची पुढील ५ वर्षाचा नियोजन आराखडा तयार केला असून देशातील लवकर निदान लवकर उपचार याची समूह आधारित मोठा प्रकल्प सार्थ करण्याचे प्रयत्न करणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका ठरेल.
सदर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या बालवाडी शिक्षिकांना मा.भारत निवडणूक आयोगाकडील सूचनांनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे अनुषंगाने नागरीकांमध्ये मतदानाबद्दल अधिकाधिक जनजागृती करणेचे दृष्टीने कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये उपस्थितांना नवीन मतदारांची नाव नोंदणी करणे, नाव कमी करणे तसेच नाव, पत्ता यामध्ये दुरूस्ती अथवा बदल करणे इत्यादीबाबत माहिती देण्यात आली असून, सदर सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी मा.भारत निवडणूक आयोगाचे वेबसाईट व मोबाईल ऍप वापरात आणणेबाबत मार्गदर्शन करणेत आले. तसेच देशातील लोकशाही टिकवण्यासाठी मतदारांसाठींची राष्ट्रीय मतदार दिवसाचे अनुषंगाने घेण्यात येणारी प्रतिज्ञा सर्व उपस्थितांमार्फत घेणेत आली.
सदर कार्यक्रमास श्री.अजय चारठाणकर, उप आयुक्त, समाज विकास विभाग, श्री.श्रीनिवास दांगट, सहाय्यक आयुक्त, दिव्यांग कक्ष, समाज विकास विभाग, श्री.ओमप्रकाश देशमुख, मॅनेजिंग डायरेक्टर, दिव्यांग भवन, श्री.नंदकुमार फुले, निवृत्त महाव्यवस्थापक, अपंग वित्त विकास महामंडळ, डॉ.कल्याणी मांडके, ऑडीयोलॉजिस्ट, श्रीम.फरीदा लांबे, श्री.विजय कान्हेकर, प्रकल्प संचालक,जिल्हा दिव्यांग पुर्नवसन केंद्र, पुणे, श्री.दत्ता भोसले, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड प्रहार अपंग क्रांती संघटना, पुणे, श्री.हरीदास शिंदे, संयुक्त दिव्यांग हक्क सुरक्षा समिती, श्री.अशोक सोळंके, जिल्हा समन्वयक, जिल्हा दिव्यांग पुर्नवसन केंद्र इ.मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments