Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रतिटाकी १५ किलोमीटरपर्यंत अतिरिक्त मायलेज देणारी शेलची नवीन आणि सुधारित इंधने बाजारात

प्रतिटाकी १५ किलोमीटरपर्यंत अतिरिक्त मायलेज देणारी शेलची नवीन आणि सुधारित इंधने बाजारात

राष्ट्रीय, मार्च ०१, २०२४: शेलने दोनचाकी व चारचाकी वाहनांच्या इंधनांची नवीन व सुधारित श्रेणी भारतीय बाजारपेठेत आणली आहे. साचून राहिलेले घटक नाहीसे करणारे (डिपॉझिट टार्गेटिंग) अत्याधुनिक तंत्रज्ञान इंधनाच्या नवीन मिश्रणामध्ये वापरण्यात आले आहे. त्यामुळे साचलेले हानीकारक घटक काढून टाकले जातात, इंजिनाची स्थिती चांगली राखली जाते आणि दुचाकी व चारचाकी अशा दोन्ही प्रकारच्या वाहनांमध्ये इंधन प्रतिटाकी १५ किलोमीटरपर्यंत अतिरिक्त मायलेज देते.

पाच वर्षांच्या विस्तृत संशोधनानंतर आणि १५० शास्त्रज्ञांच्या जागतिक पथकाने ३० लाख किलोमीटर्सहून अधिक अंतर कापून चाचणी घेतल्यानंतर ही नवीन इंधनश्रेणी विकसित करण्यात आली आहे. ह्यात अत्याधुनिक डिपॉझिट टार्गेटिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. इंटेक व्हॉल्व्ह्ज आणि फ्युएल इंजेक्टर्ससारख्या इंजिनाच्या महत्त्वाच्या भागांत साचलेले हानीकारक घटक ह्या तंत्रज्ञानाद्वारे काढून टाकले जातात. त्यामुळे इंजिनाचे काम अधिक सुरळीत व कार्यक्षम होते आणि अधिक मायलेज मिळते.

शेल मोबिलिटी इंडियाचे संचालक संजय वर्की ह्या नवीन श्रेणीबद्दल म्हणाले, “जेव्हा ग्राहक अधिक श्रेष्ठ दर्जाच्या इंजिनांनी युक्त वाहने वापरू लागतात, तेव्हा त्यांना ती चालवण्याचा अधिक चांगला अनुभव देणारी उत्पादने उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. आमच्या नवीन व सुधारित इंधनांमध्ये अत्याधुनिक (नेक्स्ट जनरेशन) डिपॉझिट टार्गेटिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हानीकारक घटक काढले जातात आणि इंजिनची स्थिती चांगली राहते. त्याचप्रमाणे हे इंधन प्रतिटाकी १५ किलोमीटरपर्यंत अधिक चालते. आमच्या ग्राहकांच्या आयुष्याचा प्रवास अधिक चांगला करण्याच्या दृष्टीने सातत्याने नवनवीन कल्पना आणण्याप्रती तसेच वाहनांशी निगडित अधिक चांगली उत्पादने विकसित करण्याप्रती आमची बांधिलकी ह्यातून दिसून येते.”

इंधनांची नवीन व अधिक चांगली श्रेणी बाजारात आणण्यासाठी आम्ही ‘एक्स्पेक्ट मोअर फ्रॉम शेल फ्युएल’ हे नवीन अभियानही राबवत आहोत. ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देणारी तसेच मूल्यवर्धन करणारी सुधारित इंधने विकसित करण्याप्रती शेलचे समर्पण ह्या अभियानाद्वारे दाखवण्यात आले होते.

मोबिलिटी इंडियाच्या मार्केटिंग व्यवस्थापक कार्तिकी कारिहालू ह्या अभियानाचा परिचय करून देताना म्हणाल्या, “आमच्या मौल्यवान ग्राहकांचा वाहनाबद्दलचा अनुभव अधिकाधिक सुधारण्यासाठी आम्ही नेहमीच बांधील राहिलो आहोत. आयुष्यातील वैविध्यपूर्ण अनुभव नेहमीच अपेक्षेहून अधिक चांगले ठरतील असे नाही पण शेल इंधनांकडून ग्राहक नेहमीच अपवादात्मक मूल्य व दर्जाची अपेक्षा ठेवू शकतात हेच आम्हाला ‘एक्स्पेक्ट मोअर फ्रॉम शेल फ्युएल्स’ ह्या आमच्या नवीन अभियानाच्या माध्यमातून अधोरेखित करायचे आहे. ‘मोअर दॅन जस्ट अ फ्युएल स्टेशन’ ह्या आमच्या मागील अभियानाचाच हा पुढील टप्पा आहे. आमच्या ग्राहकांचा सर्वांगीण अनुभव सुधारण्याच्या प्रवासात टाकलेले हे आणखी एक पाऊल आहे.”

शेल फ्युएल्सची पहिली जाहिरात ओओएच, ओटीटी, यूट्यूब, रेडिओ आणि डिजिटल टीव्ही ह्यांच्या माध्यमातून चार भाषांमध्ये प्रसारित केली जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments