नवी दिल्ली, २३ डिसेंबर २०२५: कोका-कोला कंपनीने भारतातील फूटबॉलप्रेमींना फिफा वर्ल्ड कप २०२६ पूर्वी जगातील सर्वात प्रतिष्ठित ट्रॉफी पाहण्याासाठी आमंत्रित केले आहे. कोका-कोलाची फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी टूर १० जानेवारी ते १३ जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्ली व गुवाहाटीमध्ये येत आहे, ज्यामुळे भारतातील फूटबॉलप्रेमींना फूटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठित बक्षीस ओरिजिनल फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी पाहण्याची संधी मिळणार आहे.
”आम्ही कोका-कोलाच्या फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी टूरच्या माध्यमातून फूटबॉलप्रेमींना आगामी विश्वचषकाचा अनुभव देण्यास उत्सुक आहोत. यंदाची टूर फूटबॉलप्रेमींना फूटबॉलचा रोमांच अनुभवण्याची अविश्वसनीय संधी देते,” असे कोका-कोला कंपनीच्या ग्लोबल अॅसेट्स, इन्फ्लूएन्सर्स व पार्टनरशीप्सचे उपाध्यक्ष मायकेल विनेट म्हणाले. ”आम्ही फूटबॉलप्रेमींना फूटबॉल सामना पाहताना मिळणाऱ्या अनुभवाला साजरे करण्यासाठी आमंत्रित करत आहोत, जेथे भारतात ओरिजिनल फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी आणण्यासह विश्वचषकाप्रती उत्साह व अपेक्षा वाढण्यास सुरूवात झाली आहे.”
भारत व नैऋत्य आशियामधील कोका-कोला कॅटेगरी मार्केटिंगचे वरिष्ठ संचालक कार्तिक सुब्रमण्यम म्हणाले, ”कोका-कोलाने सांस्कृतिक क्षणांना आकार देण्यामध्ये नेहमी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि त्यामध्ये फूटबॉलला प्रबळ सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे. फिफासोबत आमचा सहयोग यावर आधारित आहे आणि कोका-कोलाची फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी टूर आम्हाला फूटबॉल जगतात संस्मरणीय क्षण निर्माण करण्यास सक्षम करते. आम्ही या स्थानिक क्षणांना जागतिक स्तरवर घेऊन जात आहोत, जेथे फूटबॉलप्रेमी थंडगार कोका-कोलाचा आस्वाद घेत फूटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठित ट्रॉफीला पाहू शकतात.”
फिफा वर्ल्ड कप २०२६ तीन यजमानी देश कॅनडा, मेक्सिको व युनायटेड स्टेट्ससह अधिक मोठा असणार आहे, जेथे अधिक टीम्स, अधिक सामने आणि अधिक सेलिब्रेशन्सचा आनंद मिळेल. या जागतिक प्रवासादरम्यान कोका-कोलाची फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी टूर ७५ थांबे व १५० हून अधिक टूर दिवसांमध्ये ३० फिफा मेम्बर असोसिएशन्सना भेट देईल, ज्यामुळे फूटबॉलप्रेमींना प्रत्यक्ष ओरिजिनल फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी पाहण्याची जीवनातील अमूल्य संधी मिळेल.
”फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी जगभरात क्रीडामधील सर्वात मोठे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे आणि कोका-कोला जगातील सर्वात मान्यताकृत ब्रँड आहे,” असे फिफाचे चीफ बिझनेस ऑफिसर रोमी गाय म्हणाले. ”दोन दशकांपासून कोका-कोलासोबत आमच्या सहयोगाने फूटबॉलप्रेमींना एकत्र आणले आहे आणि कोका-कोलाच्या फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी टूरच्या माध्यमातून फिफा वर्ल्ड कपचा आनंद दिला आहे. पाच एडिशन्सदरम्यान या आयकॉनिक ट्रॉफीने आमच्या २११ पैकी १८२ मेम्बर असोसिएशन्सना भेट दिली आहे आणि यंदाची टूर अत्यंत खास असणार आहे, जेथे आम्ही कोका-कोलाच्या फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी टूरच्या २० वर्धापन दिनाला साजरे करत आहोत, तसेच फूटबॉल इतिहासामधील सर्वात मोठ्या फिफा वर्ल्ड कपसाठी तयारी देखील करत आहोत, ज्याचे यजमानी तीन देश आहेत: कॅनडा, मेक्सिको आणि युनायटेड स्टेट्स.”
नवी दिल्लीमध्ये १० जानेवारी रोजी ट्रॉफीच्या आगमनासह भव्य फिफा चार्टर लँडिंगला साजरे केले जाईल, जे राष्ट्रीय अभिमान व साजरीकरणाचे प्रतीक असेल. ही ट्रॉफी ११ जानेवारी रोजी एनएसआयसी ग्राऊंड्स, ओखला येथे नेण्यात येईल, जेथे निवडक फूटबॉलप्रेमींना ट्रॉफी पाहण्याची संधी मिळेल. हा उत्साह गुवाहाटीमध्ये सुरू राहिल, जेथे फूटबॉलप्रेमींना फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी एक्झिबिशनमध्ये ट्रॉफी पाहण्याची जीवनातील अमूल्य संधी मिळेल.
फूटबॉलप्रेमींना फूटबॉल-थीम एंगेजमेंट झोन्स, समर्पित फ्रीस्टाइल झोन्सचा अनुभव देखील मिळेल, ज्यामध्ये फ्रीस्टाइलर्स व पाककला फेस्टिवल्सचा समावेश आहे, जेथे फूटबॉलचा आनंद घेण्यासोबत भारतातील विविध प्रादेशिक पाककला पाहायला मिळतील. प्रांतामधील उत्साहवर्धक माघ बिघू महोत्सवासह या टूरच्या फिनालेची सांगता होईल, जेथे क्रीडा, संगीत व फ्लेवरच्या माध्यमातून भारतीयांच्या फूटबॉलप्रमी प्रेमाला साजरे केले जाईल.
कोका-कोलाची फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी टूर प्लॅटफॉर्म देखील आहे, जो स्थानिक समुदायांमध्ये सकारात्मक प्रभाव घडवून आणतो. भारतात कोका-कोला इंडियाचा प्रमुख उपक्रम #MaidaanSaa सह या टूरच्या उत्साहामध्ये अधिक भर करण्यात येईल. हा उपक्रम फूटबॉल सामन्यांदरम्यान होणारा कचरा गोळा करण्याचा, कचरा वेगळा करण्यावर व रिसायकलिंग करण्यावर लक्ष केंद्रित करतो. या उपक्रमाचा भाग म्हणून कोका-कोला इंडिया नवी दिल्ली व गुवाहाटी येथे कचरा व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करेल, ज्यामध्ये कर्मचारी असलेले रिसायकलिंग स्टेशन्स, तात्पुरते मटेरिअल रिकव्हरी हब्स, प्रशिक्षित स्वयंसेवक आणि प्रत्येक मार्गदर्शनाचा समावेश आहे, ज्यामुळे फूटबॉलप्रेमींना जबाबदारपणे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास मदत होईल. यामागे कचराकुंड्यांमध्ये टाकला जाणारा कचरा कमी करण्याचा आणि मोठ्या सामुदायिक इव्हेण्टचे अधिक जबाबदारीसह व्यवस्थापन करता येऊ शकते, हे दाखवून देण्याचा मनसुबा आहे. एकत्रित, हे हस्तक्षेप कचरा कमी करण्याप्रती, सहयोगाने कचरा गोळा करण्याप्रती आणि सामुदायिक कचरा व्यवस्थापनाला प्रगत करण्याप्रती कोका-कोलाच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना अधिक दृढ करतात.
दीर्घकाळापासून फिफाची सहयोगी असलेल्या कोका-कोलाकडे कोका-कोलाच्या फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी टूरचे विशेष अधिकार आहेत, जेथे फिफा वर्ल्ड कप २०२६ सुरू होण्यापूर्वी जगभरातील हजारो फूटबॉलप्रेमींना जगातील सर्वात प्रतिष्ठित ट्रॉफी पाहण्याची संधी मिळेल. कोका-कोला कंपनी १९७६ पासून फिफाशी संलग्न आहे आणि १९७८ पासून फिफा वर्ल्ड कपची ऑफिशियल स्पॉन्सर (अधिकृत प्रायोजक) आहे.
अधिक माहितीसाठी, भेट द्या: cokeur
l.com/trophy-tour.


