Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिरीष प्रभाकर तांबे लिखित 'नेतृत्व' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

शिरीष प्रभाकर तांबे लिखित ‘नेतृत्व’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

पुणे,२५ डिसेंबर २०२५ : शिरीष प्रभाकर तांबे लिखित ‘नेतृत्व’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार,२७ डिसेंबर २०२५ रोजी टिळक रोडवरील मराठी साहित्य परिषदेच्या सभागृहात सायंकाळी 4.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, इतिहासकार, समीक्षक श्री सदानंद मोरे आणि दिलीपराज प्रकाशन व प्रकाशक संघाचे अध्यक्ष श्री राजीव बर्वे उपस्थित राहणार आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन इंदूर येथील श्री सर्वोत्तम प्रकाशन यांनी केले असून हा कार्यक्रम दोन भागात होणार आहे. पहिल्या भागात पुस्तकाचे प्रकाशन होणार असून सूत्रसंचालन श्रीमती नीरजा आपटे करणार आहेत. दुसर्‍या भागात सृजनस्नेही संस्थेचे श्री सुधीर मोघे व त्यांच्या सहकलाकार सौ मीनल गानू व आसावरी कुलकर्णी ह्यांचा “स्मरण राजकवींचे” हा राजकवी भा. रा. तांबे यांच्या निवडक काव्य-गीतांवर आधारित कार्यक्रम संपन्न होणार आहे. ‘स्मरण राजकवीचे’ ही संकल्पना श्री सुधीर मोघे यांची आहे.

 

‘नेतृत्व’ हे पुस्तक इतिहास घडवणार्‍या लोकांवर आहे. समाजातले नियम चांगल्यासाठी किंवा वाईटासाठी ज्यांनी वाकवले, त्यांच्याविषयी आहे.

 

प्रकाशन कार्यक्रमानंतर “नेतृत्व” हे पुस्तक उपस्थितांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध होईल.

 

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments