Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedWOG Technologies Limited डीआरएचपी सेबीकडे सादर

WOG Technologies Limited डीआरएचपी सेबीकडे सादर

WOG Technologies Limited(“कंपनी”) त्यांचा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“DRHP”) बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (“SEBI”) दाखल केला आहे.

 

 

 

ही कंपनी एकात्मिक पर्यावरण अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान कंपनी आहे, जी जागतिक स्तरावर शाश्वत पायाभूत सुविधांची निर्मिती करते. आपले ग्राहक असलेल्या औद्योगिक आणि स्थानिक सरकारी संस्थांना जलशुद्धीकरण, तेल विलगीकरण, सांडपाणी पुनर्वापर आणि पूरक बायोगॅस निर्मितीमध्ये विशेष सेवा देते. (स्रोत: क्रिसिल अहवाल)

 

 

 

सुरुवातीच्या सार्वजनिक ऑफरिंगद्वारे इक्विटी शेअर्स (प्रत्येकी ₹10चे दर्शनी मूल्य) ऑफर करून निधी उभारण्याची कंपनीची योजना आहे. या ऑफरमध्ये ₹375 कोटी पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे नवीन इश्यू आणि विक्री करणाऱ्या शेअरहोल्डर्सकडून 4,328,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची विक्री करण्याच्या ऑफरचा समावेश आहे.

 

 

 

नवीन इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ रकमेचा वापर खालीलप्रमाणे करण्याचा WOG Technologies प्रस्ताव आहे: (i) कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, ज्यासाठी अंदाजित रक्कम ₹220 कोटी आहे, (ii) बेल कूलिंग टॉवर्स प्रायव्हेट लिमिटेडमधील अतिरिक्त 50% भागभांडवल संपादन करण्यासाठी, ज्यासाठी अंदाजित रक्कम ₹45 कोटी आहे, आणि (iii) उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी.

 

 

 

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे दिल्या जाणाऱ्या इक्विटी शेअर्सची बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर (“एनएसई”) सूचीबद्धता प्रस्तावित आहे.

 

 

 

युनिस्टोन कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments