Monday, October 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे महापालिकेत भाजपच्या विजयाची नांदी- ना. चंद्रकांतदादा पाटील*

पुणे महापालिकेत भाजपच्या विजयाची नांदी- ना. चंद्रकांतदादा पाटील*

*प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मध्ये शिवसेना उबाठा गटाला धक्का*

 

*उबाठा गटाच्या अधिकृत उमेदवारांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवे

 

पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मध्ये शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला असून, शिवसेना उबाठा गटाच्या बंडखोर उमेदवारासह, अधिकृत उमेदवारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन भाजपच्या अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचे स्वागत करुन अभिनंदन केले. तसेच पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

पुणे महापालिका निवडणुकीत कोथरुड मतदार संघातील प्रभाग क्रमांक ९ आणि प्रभाग क्रमांक ११ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ९ (ड) आणि (क)मधील शिवसेना उबाठा गटाचे बंडखोर उमेदवार महेश सुतार(ड), पूजा सुतार (क), नियोजन समितीचे सदस्य सुखदेव तापकीर आणि प्रभाग क्रमांक ११ (अ) गटाचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब धनवडे आणि विद्यार्थी सेनेचे अमर गायकवाड, माजी नगरसेवक पैलवान दिलीपदादा गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन भाजपा उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

 

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड मधील निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला. या सर्वांचे ना. पाटील यांनी पक्षात स्वागत करुन; त्यांचे अभिनंदन केले. तसेच, पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

“भारतीय जनता पक्षासाठी हे सर्व पक्षप्रवेश अतिशय आनंद देणारे असून, यापूर्वी पक्षाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर आज प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मधील उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची ताकद वाढली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपच्या विजयाची ही नांदी आहे,” असा विश्वास ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

 

या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे प्रभाग क्रमांक ९ मधील भाजपचे उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, प्रभाग क्रमांक ११ मधील भाजप उमेदवार अजय मारणे, अभिजीत राऊत, भाजपचे नेते डॉ. संदीप बुटाला, प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, शिवम बालवडकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments