Monday, October 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedएअरबीएनबी इनसाइट्समधून संगीतावर आधारित अनुभव भारताच्या जनरेशन झीच्या प्रवासाला आकार देत असल्याची...

एअरबीएनबी इनसाइट्समधून संगीतावर आधारित अनुभव भारताच्या जनरेशन झीच्या प्रवासाला आकार देत असल्याची माहिती

 

 

● भारतातील ६२% जेन झीच्या २०२६ मध्ये संगीत मैफिली आणि संगीत महोत्सवांसाठी प्रवासाच्या योजना – प्रवासाबाबत वाढता सांस्कृतिक ट्रेंड

● संगीतामुळे पर्यटन स्थळ शोधण्यास चालना मिळत आहे कारण भारतातील ७६% जेन झी प्रथमच संगीत मैफिली किंवा महोत्सवासाठी एखाद्या शहराला भेट देत आहेत

● संगीत मैफिलींसाठी प्रवासामुळे आर्थिक परिणाम होत आहे कारण ५३% लोक संगीत मैफिलीच्या तारखांसोबत पुढच्या ट्रिपचेही आयोजन करतात.

 

भारत, ०६ जानेवारी २०२६: तरुण भारतीयांमध्ये प्रवासाच्या निवडींना आकार देणारी संगीत ही सर्वात शक्तिशाली शक्ती बनली आहे. एअरबीएनबीच्या एअरबीएनबी एक्स्पिरियन्स लेड ट्रॅव्हल इनसाइट्स १ मधून असे दिसून आले आहे की जेन झी लाइव्ह कॉन्सर्ट आणि उत्सवांभोवती सहलींचे नियोजन करत आहे. त्यामुळे नवीन शहरे शोधण्यासाठी, मुक्काम वाढवण्यासाठी आणि मुख्य कार्यक्रमासोबतच स्थानिक परिसराचा अनुभव घेण्यासाठी संगीत महोत्सव एक महत्त्वाचे केंद्र ठरले आहेत.

या पिढीकडून प्रवासाचे निर्णय कॅलेंडरद्वारे कमी आणि संस्कृतीच्या माध्यमातून जास्त घेतले जात आहेत. लाइव्ह इव्हेंट्स आणि आयआरएल अनुभव ते कुठे जातात, कोणासोबत प्रवास करतात आणि पर्यटनस्थळाशी किती उत्तमरित्या जोडले जातात यावर प्रभाव पाडतात.

तरूण भारतीयांच्या प्रवासावर आणि अनुभवावर संगीताचा मोठा प्रभाव आहे

संगीत २०२६ मध्ये प्रवासाच्या वर्तनाला आकार देण्यात आणखी मोठी भूमिका बजावणार आहे. सुमारे ६२% जेन झी मैफिली आणि संगीत महोत्सवांभोवती सहलींचे नियोजन करत आहेत. हा हेतू त्यांच्या सध्याच्या वर्तनातही दिसून येतो: तीनपैकी एकापेक्षा जास्त तरूण (३६%) एखाद्या कार्यक्रमाबद्दल ऐकताच सहलीचे नियोजन करण्यास सुरुवात करतात.

ऋतू, सुट्ट्या किंवा लाँग वीकेंडवर आधारित प्रवासाच्या तुलनेत तरुण प्रवासी अनुभवांना प्राधान्य देत आहेत. त्यांच्या प्रमुख प्रेरणांमध्ये नवीन पर्यटनस्थळाचा अनुभव घेण्याची संधी आणि आयुष्यात एकदाच येणाऱ्या सांस्कृतिक क्षणाचा भाग होण्याचा उत्साह यांचा समावेश आहे.

तरुण भारतीयांसाठी प्रवास करण्यासाठी संगीत किती महत्त्वाचे आहे याचे स्पष्ट संकेत दिसून आले: ते आपल्या आवडत्या कलाकारांचे थेट सादरीकरण पाहण्यासाठी कितीही लांबचा प्रवास करण्यास तयार आहेत. सुमारे ४०% पेक्षा जास्त तरूण एखाद्या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करण्यास तयार आहेत. त्यात संपूर्ण अमेरिका (४८%), युरोप (४५%) आणि उर्वरित आशिया (४६%) मधील ठिकाणे त्यांच्या विचारात समान आहेत.

कॉन्सर्टवर आधारित पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्था आणि पर्यटनाचा विस्तार होतो

संगीत कार्यक्रम आणि उत्सव हे महत्त्वाचे घटक असले तरी त्यांचा प्रभाव आयोजनाच्या ठिकाणापुरता मर्यादित राहत नाही. जेन झीमधील ६५% प्रवासी कार्यक्रमांच्या ठिकाणांजवळ राहणे पसंत करतात. त्यामुळे त्यांना स्थानिक परिसर नीट अनुभवता येतो.

त्यापैकी अर्ध्याहून अधिक (५३%) लोक स्थानिक कॅफे, नाईटलाइफ, सांस्कृतिक स्थळे, कार्यक्रम आणि परिसरांमध्ये आपल्या प्रवास वेळ – आणि पैसा खर्च करतात व स्थानिक व्यवसाय आणि समुदायांना पाठिंबा देतात. सामूहिक प्रवासामुळे हा परिणाम वाढतो कारण ७०% लोक मित्रांसह किंवा गटांसह संगीत कार्यक्रमांना उपस्थित राहतात.

त्यांच्या खर्च करण्याच्या पद्धतीदेखील या अनुभवांचे महत्त्व प्रतिबिंबित करतात. दहापैकी सहा तरुण प्रवासी आपल्या मासिक उत्पन्नाच्या २१-४०% संगीत-महोत्सवांसाठीचा प्रवास आणि अनुभवांसाठी देण्यास तयार असतात तर दहापैकी एक त्यांच्या मासिक उत्पन्नाच्या निम्म्यापर्यंत खर्च करण्यास तयार असतो. साधारणतः प्रतिसादकांनी त्यांच्या सर्वात अलीकडील कार्यक्रमावर आधारित सहलीवर ५१,००० रूपये खर्च केले.

पर्यटनाचा प्रसार करण्यासाठी कॉन्सर्ट पर्यटन हादेखील एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्यातील ७६% प्रतिसादकांनी सांगितले की ते कॉन्सर्ट किंवा संगीत महोत्सवाच्या निमित्ताने पहिल्यांदाच शहराला भेट देत आहेत. लाइव्ह इव्हेंट्स तरुण भारतीयांना नवीन शहरे, परिसर आणि सांस्कृतिक केंद्रांशी ओळख करून देतात.

एअरबीएनबीचे भारत आणि आग्नेय आशियासाठीचे राष्ट्रीय प्रमुख अमनप्रीत सिंग बजाज म्हणाले, “संगीत मैफिली आणि महोत्सवांमध्ये वाढत्या स्वारस्यामुळे एका नवीन प्रकारच्या प्रवासासाठी मार्ग मोकळा झाला आहे – जो संगीताला नवीन स्थळे शोधण्याचे प्रवेशद्वार म्हणून पाहतो. एअरबीएनबीमध्ये संगीत पर्यटन संपूर्ण परिसर आणि समुदाय तरुण प्रवाशांसाठी खुले करत आहे आणि त्यामुळे होणारा अर्थपूर्ण परिणाम आम्हाला दिसतो. पर्यटनाचा हा नवीन प्रकार प्रवाशांच्या वर्तनाला आकार देत आहे. त्यामुळे समूहांना एकत्र वेळ घालवता येतो. ते सहजपणे एकत्र येतात आणि संस्मरणीय अनुभव निर्माण होतात. ते एअरबीएनबीकडून देण्यात येत असलेल्या अनुभवांशी पूर्णपणे सुसंगत आहेत.

 

जाणीवपूर्वक जीवनशैली निवड असलेले संगीत पर्यटन

एकेकाळी अधूनमधून घेता येणारा संगीताचा आनंद आता तरुण भारताच्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग ठरला आहे. संगीतकेंद्री सहलींचे नियोजन केले जात आहे. त्याचे बजेट तयार केले जात आहे आणि अनुभव आणि आनंद दोन्ही जास्तीत जास्त मिळवण्यासाठी सहलींची तयारी केली जात आहे.

लोलापालूझा इंडियासारखे मोठ्या स्वरूपाचे उत्सव हे बदल दर्शवितात. मागील कार्यक्रमांसाठी हजारो चाहते मुंबईत प्रवास करून आले. त्यातील ६२% उपस्थितांचे म्हणणे आहे की महोत्सवातील वातावरण त्यांना परत येण्यास भाग पाडते आणि ९८% लोक परत येण्याचा इरादा व्यक्त करतात. त्यातून संगीतकेंद्री प्रवास कसा झपाट्याने मुख्य प्रवाहातील सांस्कृतिक वर्तन बनत आहे हे दिसून येते.

या गतीला पुढे नेत एअरबीएनबीने आपल्या पहिल्या जागतिक लाईव्ह म्युझिक भागीदारीचा भाग म्हणून लोलापालूझा इंडियासोबत भागीदारी केली आहे. त्यात चाहत्यांना अनोखे अनुभव आणि मुक्काम मिळतील. त्यामुळे त्यांना २४-२५ जानेवारी रोजी मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या २०२६ च्या आवृत्तीत त्यांच्या आवडत्या संगीताशी जोडले जाता येईल.

तरुण भारतीयांच्या शहरांतील प्रवासावर हे संगीतमय लाईव्ह क्षण प्रकाश टाकत असताना, एअरबीएनबीचे अनुभवकेंद्री प्रवास माहिती अशा भविष्याकडे निर्देश करते जिथे संस्कृती, समुदाय आणि प्रेम प्रवासाचे नियोजन आणि अनुभव यासाठी केंद्रस्थानी असतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments