Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedबजाज पुणे ग्रँड टूरला विक्रमी प्रतिसाद - आंतरराष्ट्रीयस्तरावरूनही भक्कम पाठिंबा यूसीआय २.२...

बजाज पुणे ग्रँड टूरला विक्रमी प्रतिसाद – आंतरराष्ट्रीयस्तरावरूनही भक्कम पाठिंबा यूसीआय २.२ शर्यतीसाठी आतापर्यंतचे सर्वांत मोठे खेळाडूंचेपथक भारतात दाखल होणार

पाच खंडांतील २९ आंतरराष्ट्रीय संघ आणि ३५ देशांचे सायकलपटूपुण्यात येणार;

जगातील १७१ खेळाडूंची विक्रमी नोंद

 

पुणे, ६ जानेवारी २०२६: पहिली ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ ही पुरुषांचीआंतरराष्ट्रीय सायकलिंग शर्यत नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झालीआहे. युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनलच्या (यूसीआय २.२ श्रेणी) मान्यतेखाली होणाऱ्या या शर्यतीत पाच खंडांतील ३५ देशांचे प्रतिनिधित्वकरणारे २९ संघ आणि १७१ एलिट सायकलपटू सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय सायकलिंग विश्वाकडून मिळालेला हा अभूतपूर्व प्रतिसादपुण्याला जागतिक स्तरावर एक प्रमुख ‘प्रोफेशनल सायकलिंग सर्किट’म्हणून स्थापित करत आहे. ही शर्यत १९ ते २३ जानेवारीदरम्यान होणार आहे.

 

पुणे जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र सरकारच्या भक्कमपाठिंब्याने आयोजित ही पाच दिवसांची, ४३७ किलोमीटरची शर्यत असून, यात एक ‘प्रोलॉग’ (सुरुवातीचा आठ किलोमीटरचा छोटा टप्पा) आणि चारप्रमुख टप्प्यांचा समावेश आहे. या शर्यतीदरम्यान सायकलपटू पुण्याच्याऐतिहासिक स्थळांपासून ते दख्खनच्या पठारावरील आव्हानात्मक घाटांपर्यंतविविध भूप्रदेशांतून वाटचाल करतील.

 

या शर्यतीत फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, बेल्जियम, जर्मनी, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, चीन आणि थायलंडसारख्या दिग्गज सायकलिंग राष्ट्रांचे संघ सहभागीहोणार आहेत. खंडांनुसार पाहता, आशियातून सर्वाधिक ७८ खेळाडू, युरोपमधून ६९, ओशनियामधून १२, अमेरिकेतून ६ आणि आफ्रिकेतून ६खेळाडू पुण्यात दाखल होणार आहेत.

 

 

 

नवे मापदंड प्रस्थापित

 

सामान्यतः यूसीआय २.२ श्रेणीतील शर्यतींमध्ये जास्तीत जास्त १२५सायकलपटू सहभागी असतात. मात्र, बजाज पुणे ग्रँड टूरने १७१ स्पर्धकांसहनवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. यामध्ये ओडिशामध्ये झालेल्याराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतून निवडलेल्या सहा भारतीय सायकलपटूंच्यासंघाचाही समावेश आहे.

 

 

 

अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

 

पुणे जिल्हाधिकारी आणि या दौऱ्याचे प्रभारी अधिकारी श्री. जितेंद्र दुडीम्हणाले, “पुणे आणि भारतासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. आम्हीजागतिक दर्जाची शर्यत आयोजित करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत. हीकेवळ एक स्पर्धा नसून, या निमित्ताने व्यावसायिक सायकलिंगच्या जगातभारताचा उदय होणार आहे. पुण्याला एकेकाळी सायकलिंगचे शहर म्हणूनओळखले जात होते. ही जुनी ओळख पुन्हा मिळवून देताना आम्हालाअभिमान वाटतो. १२० वर्षांचा वारसा असलेल्या ‘टूर डी फ्रान्स’ याशर्यतीकडून आम्ही प्रेरणा घेतली आहे.”

 

शर्यतीचे तांत्रिक संचालक श्री. पिनाकी बसाक म्हणाले, “यूसीआय २.२श्रेणीत १७१ खेळाडूंचा सहभाग असणे हे अभूतपूर्व आहे. पहिल्याच वर्षीभारताने हे साध्य करणे ही जागतिक सायकलिंगसाठी मोठी घटना आहे. पुण्याचा आव्हानात्मक भूप्रदेश आणि जिल्हा प्रशासनाने विक्रमी वेळेतउभारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधांमुळे हे शक्य झाले आहे.”

 

 

 

चार टप्पे, एक मोठे आव्हान

 

४३७ किलोमीटरची ही शर्यत पुण्याच्या शहरी भागातून तसेच सह्याद्रीच्यापायथ्यापर्यंत नेण्यात आली आहे. यात गुडलक चौक ते डेक्कन बसस्टॉपदरम्यानचा आठ किलोमीटरचा प्रोलॉग असेल.

 

• टप्पा १ : मुळशी–मावळ माइल्स (९१.८ किमी)

हिंजवडी आयटी हबमधून जाणारा हा टप्पा वेग आणि शहरी वळणांचीकसोटी पाहणारा असेल.

• टप्पा २ : मराठा हेरिटेज सर्किट (१०९.१५ किमी)

पुरंदर किल्ला, सिंहगड आणि खडकवासला परिसरातील कठीण घाटव चढण्या खेळाडूंच्या सहनशक्तीची परीक्षा घेतील.

• टप्पा ३ : पश्चिम घाट गेटवे (१३७.०७ किमी)

सासवड ते बारामतीदरम्यानचा हा टप्पा सपाट भूप्रदेश आणि वेगवानसायकलिंगसाठी ओळखला जाईल.

• टप्पा ४ : पुणे प्राइड लूप (९९.१५ किमी)

अंतिम टप्पा पुणे शहराच्या मध्यभागातून, शनिवारवाड्यासारख्याऐतिहासिक स्थळांजवळून जात, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी संपन्नहोईल.

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ हा भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी एक निर्णायक क्षणठरणार असून, या शर्य

तीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments