Monday, October 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रवादी काँग्रेसच शहराचा नियोजनबद्ध विकास करू शकते, सोसायटी धारकांचा विश्वास राष्ट्रवादीच्या...

राष्ट्रवादी काँग्रेसच शहराचा नियोजनबद्ध विकास करू शकते, सोसायटी धारकांचा विश्वास राष्ट्रवादीच्या प्रभाग क्रमांक १९ मधील उमेदवारांनी साधला सोसायटी धारकांशी संवाद

पिंपरी, पुणे (दि. ०६ जानेवारी २०२६) पिंपरी चिंचवड शहराचा नियोजनबद्ध विकास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेच करू शकतात. पुणे मुंबई महामार्ग, नाशिक फाटा ते मोशी नाशिक महामार्ग, महामार्ग – रेल्वे लाईन आणि नदी नदीवरून जाणारा सेंट मदर टेरेसा उड्डाणपूल, सायन्स पार्क, ऑटो क्लस्टर हे भव्य विकास प्रकल्प अजित दादा पवार यांच्या दूरदृष्टीतून विकसित केले आहेत. शहराचा विकासाचा वेग मागील ९ वर्ष ठप्प झाला होता. विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आणि प्रगतीचे ध्येय गाठण्यासाठी पुन्हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्ता येणे आवश्यक असल्याचे मत एम्पायर इस्टेट, सागर सोसायटी या उच्चवर्गीय सोसायटी मधील नागरिकांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक १९ मधील अधिकृत उमेदवार रीना लहू तोरणे (अ), दीपक हिरालाल मेवानी (ब), सविता धनराज आसवानी (क), काळूराम मारुती पवार (ड) यांनी महिला युवती, भगिनींसह एम्पायर इस्टेट, सागर सोसायटी मधील नागरिकांशी संपर्क साधला. नागरिकांनी राष्ट्रवादीच्या या उमेदवारांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करून १५ जानेवारी रोजी होणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचार पत्रक वाटप केले. यावेळी माजी नगरसेवक धनराज आसवानी, कोमल दीपक मेवाणी, लहू तोरणे, जय आसवानी, रेश्मा खरात, मनीष सिद्धानी, सुनील साठे, दिनेश मेवाणी, सोनू म्हात्रे, छाया भडकुंबे, मंगल पवार, राजाराम जाधव, शिवा पिल्ले, रणजीत सिंग, राजकिरण दाभाडे, रंगनाथ साळवे, सलोनी सूर्यवंशी, साखरबाई बोरुडे, कोमल तडसरे, केसरबाई तडसरे, रणजीत कांबळे, आकाश सिंग, मंगल जाधव, अविष्कार बनसोडे, स्वाती सूर्यवंशी, केसरबाई तुरुकमारे, पुनम रोकडे, श्रद्धा रोकडे आदींनी प्रचारात सहभाग घेतला.

प्रभाग क्रमांक १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना घड्याळ चिन्ह पुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन धनराज आसवानी आणि कोमल दीपक मेवाणी यांनी केले.


—-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments