पुणे,7 जानेवारी 2026 : वर्ल्ड ऑफ परफॉर्मिंग आर्टस (डब्ल्यूओपीए) फाऊंडेशन तर्फे डब्ल्यूओपीए विंटर फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.हे या विंटर फेस्टीव्हलचे दुसरे सत्र असून गेल्या वर्षी या उपक्रमाच्या पहिल्या सत्राला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावर्षी या महोत्सवाची सुरूवात लिलेट दुबे दिग्दर्शित ऑटोबायोग्राफी या नाटकाने होणार असून 11 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6.30 वाजता क्रिएटिसिटी ॲम्फी थिएटर येथे होणार आहे. या नाटकामध्ये लिलेट दुबे,डेंझील स्मिथ, सुचित्रा पिल्लई आणि सारा हाश्मी यासारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.हे नाटक आपल्या प्रामाणिक कथाकथन आणि भावनिक खोलीने प्रेक्षकांना भावूक करेल.


