पुणे, 7 जानेवारी 2026:पुण्यातील आंबेगाव येथील आयएसएमएस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या संस्थेच्या वतीने
युनायटेड किंगडम मधील लीड्स बेकेट विद्यापीठाच्या कार्नेगी स्कूल ऑफ स्पोर्टस मधील सुमारे 20 पदवी पूर्व विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
उभय देशांमधील क्रिडा संस्कृती आणि क्रिडा सुविधांचा विकास यासाठी विद्यार्थ्यांचे आदान प्रदान करण्याकरिता आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असून त्यांचा हा दौरा 7 दिवस चालणार आहे.
गेल्या वर्षीच्या उपक्रमाच्या यशामुळे यंदाही दौऱ्याचा कार्यक्रम भरगच्च असून त्यामध्ये मँगो ट्री या ठिकाणी क्रिकेट व फुटबॉलच्या मैत्रीपूर्ण लढती, पीडीएमबीए संकुलाला भेट, सिंहगड येथे ट्रेकिंग व सहल, अहमदनगर स्नेहालय संस्थेला विशेष भेट, पुणे शहर दर्शन आणि या दौऱ्याच्या स्मृती जागृत ठेवण्याकरिता संस्मरणीय असा निरोप समारंभ अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.
आयएसएमएस इन्स्टिट्यूटच्या संस्थापिका आणि कार्यकारी संचालिका शालिनी बॅनर्जी यांनी सांगितले की, याच संस्थेच्या गतवर्षी झालेल्या दौऱ्याच्या भव्य यशाला उजाळा दिला. त्याच पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी ही या विद्यार्थ्यांनी भारताला दिलेल्या भेटीमुळे आयएसएमएसचे विद्यार्थी आणि लीड्स बेकेट विद्यापीठाच्या कार्नेगी स्कूल ऑफ स्पोर्टस मधील विद्यार्थी या दोघांनाही भरघोस फायदा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या विद्यार्थ्यांनाही विविध देशांमधील क्रीडा क्षेत्र व सांस्कृतिक परंपरांमधून खूप काही शिकता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान आयएसएमएस इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनाही लीड्स बेकेट विद्यापीठाच्या विद्यार्थ्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार असून त्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रातील आपले भवितव्य आणि कौशल्य यासंबंधी अधिक अनुभवांचे आदान प्रदान करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, क्रीडा संस्कृतीमुळे विविध देशात मधील नागरिक एकमेकांशी जोडले जातात. सध्याच्या स्पर्धात्मक जगामध्ये आपली कामगिरी सुधारण्यासाठी नेतृत्व विकास, सांघिक कामगिरी, सामाजिक विकास तसेच स्पर्धात्मक व संवादातील विकास कौशल्य या गुणांची त्यामुळे वाढ होते व परिणामी सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास साधला जाऊन त्यांना आपले लक्ष्य साध्य करण्यास बहुमोल म
दत होते.


