?
नवी दिल्ली| ०७/०१/२०२५: अविवा इंडिया या आघाडीच्या खासगी जीवनविमा कंपनीने क्रिटिकल आजारांवर सर्वांगीण संरक्षण देणाऱ्या अविवा स्मार्ट व्हायटल प्लॅन या इंडिव्हिज्युअल नॉन लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग, प्युअर रिस्क हेल्थ इन्शुरन्स फिक्स्ड बेनिफिट प्लॅनची घोषणा केली आहे. यातील पायाभूत विम्याची रक्कम १० लाख रूपये असून पॉलिसीधारकांना वेलनेस लिंक्ड स्टेप बेस्ड रिवॉर्ड्सच्या माध्यमातून विम्याच्या रकमेच्या दुप्पट व्याप्ती मिळू शकेल. ग्राहकांना त्यांच्या सरासरी रोजच्या टप्प्यांनुसार तिमाही स्वरूपात २.५%, ५% किंवा ७.५% वेलनेस रिवॉर्ड मिळू शकतात.
स्मार्ट व्हायटल प्लॅन कोणत्याही ४९ व्याप्त असलेल्या क्रिटिकल आजार आणि प्रक्रियांच्या पहिल्या निदानावर एकरकमी लाभ देतो. यात कर्करोग, मूत्रपिंड निकामी होणे, हृदयविकार, मेंदूची शस्त्रक्रिया, स्ट्रोक आणि इतर अनेक आजारांचा समावेश आहे. वेलनेस बेनिफिट्स अविवाच्या वेलनेस३६० अॅपच्या माध्यमातून तपासले जातात. तसेच पॉलिसीधारकांना आपल्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय स्मार्ट ट्रॅकिंग डिव्हाइस ९लूप बाय केअरप्लिक्स X स्मार्ट रिंग) मिळू शकेल (हे फक्त अशा पॉलिसीधारकांसाठी लागू आहे ज्यांनी १५ लाख किंवा २० लाख रूपये विमा रकमेचा पर्याय निवडला आहे.) पारंपरिक मेडिक्लेम प्लॅन्स फक्त रूग्णालयात दाखल होण्याच्या खर्चाचा परतावा देतात. परंतु स्मार्ट व्हायटल उपचार, बरे होणे किंवा इतर आर्थिक गरजांसाठी मुक्तपणे वापरता येतील असे स्थिर लाभ देते.
याची रचना एक होलिस्टिक आरोग्य आणि आर्थिक रक्षक म्हणून झाली असून ते पॉलिसीधारकांना वैद्यकीय खर्चांचे प्रदान, उत्पन्नाऐवजी रक्कम किंवा इतर आर्थिक गरजांसाठी वापरण्याची लवचिकता देतात. त्यामुळे कुटुंबाच्या विविध गरजांची पूर्तता होते.
अविवा स्मार्ट व्हायटलची प्रमुख वैशिष्टे (पॉलिसीच्या अटी आणि शर्तींच्या सापेक्ष):
• क्रिटिकल आजार आणि कव्हरेज सुरक्षा: ४९ क्रिटिकल आजारांपैकी कोणत्याही एका आजारावर १०/१५/२० लाख रूपये एकरकमी रक्कम, दाव्याची प्रामाणिकता निश्चित करण्यासाठी ९० दिवसांचा प्रतीक्षा कालावधी आणि १५ दिवसांचा हयातीचा कालावधी.
• वेलनेस रिवॉर्ड्स आणि सातत्यपूर्ण लाभ: दैनंदिन टप्प्यांवर आधारित तिमाही वेलनेस रिवॉर्ड्स. त्यामुळे पॉलिसीधारकांना मूळ विमा रकमेच्या दुपटीपर्यंत कव्हर वाढवता येते.
• निधीचा लवचिक वापर: वैद्यकीय खर्च, उत्पन्नाऐवजी रक्कम, परतावा किंवा कुटुंबाच्या इतर गरजांसाठी निश्चित लाभ देय रक्कम वापरली जाऊ शकते.
• पात्रता निकष: विमा घेण्यासाठी किमान वय २०-५० वर्षे; मॅच्युरिटी वय ३०-६० वर्षे; विम्याच्या अटी १०/१५/२० वर्षे; पॉलिसी मुदतीच्या समान नियमित वेतन.
• एकसमान प्रीमियम: आर्थिक अंदाजासाठी पॉलिसी मुदतीमध्ये निश्चित प्रीमियम.
• मूल्यवर्धित फायदे: अविवाचा वेलनेस३६० अॅप मोफत उपलब्ध.
• कर लाभ: प्रचलित कायद्यांनुसार करबचतीसाठी पात्र प्रीमियम.
या अनावरणाबाबत बोलताना, अविवा इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. असित रथ म्हणाले, “विमा आता फक्त संरक्षणापुरता मर्यादित राहिलेला नाही; त्याने लोकांना निरोगी जीवन जगण्यासाठी सक्षम बनवले पाहिजे. जीवनशैलीशी संबंधित आजार वाढत असताना सक्रिय वेलफेअरसोबत आर्थिक तयारीची आवश्यकता आता प्रचंड जाणवते. अविवा स्मार्ट व्हायटल हा एक अग्रगण्य उपाय आहे जो या बदलाला संबोधित करतो. त्यात सकारात्मक जीवनशैली निवडींना प्रोत्साहन देणाऱ्या व्यापक क्रिटिकल आजार कव्हरसह वेलनेस रिवॉर्ड्स दिले जातात. हे भारतातील कुटुंबांसाठी नावीन्यपूर्णता, ग्राहक केंद्रीभूतता आणि आर्थिक लवचिकता निर्माण करण्यासाठी आमची वचनबद्धता प्रतिबिंबित करते.”
अविवा इंडियाचे नियुक्त अॅक्च्युअरी आणि उत्पादन प्रमुख श्री. अजय कुमार त्रिपाठी म्हणाले, “आमची उत्पादन डिझाइन प्रक्रिया नेहमीच ग्राहकांच्या बदलत्या गरजांच्या सखोल आकलनाने सुरू होते. अविवा स्मार्ट व्हायटल हा या दृष्टिकोनाचा परिणाम आहे – व्यापक क्रिटिकल आजार संरक्षण आणि निरोगीपणाशी संबंधित रिवॉर्ड्स एकत्र आणून आमच्या ग्राहकांना अधिक अर्थपूर्ण मूल्य देण्यासाठी आर्थिक सुरक्षा आणि सक्रिय आरोग्य व्यवस्थापन एकत्र आणते.”
या अनावरणाबाबत बोलताना केअरप्लिक्सचे संस्थापक शुभब्रत पॉल पुढे म्हणाले, “अविवासोबतचा आमचा सहयोग हा ग्राहकांसाठी प्रिव्हेंटिव्ह आरोग्य सुलभ करण्यासाठी टाकलेले एक परिवर्तनकारी पाऊल आहे. केअरप्लिक्स रिंगसोबत वापरकर्त्यांना आता सतत वैद्यकीयदृष्ट्या संबंधित वेलनेस इनसाइट्स मिळतात जे त्यांना लवकर धोके ओळखण्यास, निरोगी सवयी विकसित करण्यास आणि त्यांच्या दीर्घकालीन आरोग्याची जबाबदारी घेण्यास मदत करतात. रिअल-टाइम हेल्थ इंटेलिजन्सला एका मजबूत संरक्षण फ्रेमवर्कसह जोडून अविवा स्मार्ट व्हायटल भारतीयांसाठी विम्याची नव्याने व्याख्या करते. विमा फक्त एक उत्पादन राहत नाही तर त्यांच्या आरोग्य प्रवासात सक्रिय भागीदार ठरतो. लाखो कुटुंबांना सक्षम करण्यासाठी वेल्फेअर आणि प्रोटेक्शन एकत्र येऊन भविष्य घडवण्यासाठी आम्हाला अविवासोबत काम करताना अभिमान वाटतो.”
अविवा स्मार्ट व्हायटल ग्राहककेंद्री नवसंशोधन, प्रतिबंधात्मक आरोग्य एकत्रीकरण आणि कुटुंबांसाठी दीर्घकालीन लवचिकता निर्माण करण्यासाठी अविवा इंडियाची कटिबद्धता अधोरेखित करते. ते आयआरडीएआयच्या ‘२०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा’ या दृष्टिकोनाशीही सुसंगत आहे.


