मुंबई, 9 जानेवारी 2026: कोटक ऑल्टरनेट अॅसेट मॅनेजर्स लिमिटेड (“कोटक ऑल्ट्स”)ने आज कोटक ऑल्टस कॅटलिस्ट अवॉर्ड्सची सुरुवात केल्याचे घोषित केले. हा या प्रकारचा पहिला प्लॅटफॉर्म आहे, जो 25 लाख रु. चे बक्षीस देऊन देशातील सर्वोत्तम व्होडकास्टचा सन्मान करेल. सर्वोत्तम व्होडकास्टला पुरस्कृत करण्यामागील उद्देश अस्सल फायनॅनष्यल कंटेंटसाठी एक मापदंड तयार करण्याचा तसेच लक्षावधी तरुण आणि नवशिक्या गुंतवणूकदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना सक्षम बनवणाऱ्या क्रिएटर्सचा सन्मान करण्याचा आहे.
महत्त्वाकांक्षी अर्जदार 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान प्रदर्शित झालेला आणि यूट्यूबवर सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेला आपला एखादा व्होडकास्ट 31 जानेवारी 2026 पर्यंत katalyst.kotakalternateasset.com मार्फत स्पर्धेसाठी सादर करू शकतात. अर्ज सादर झाल्यानंतरच्या टप्प्यात या क्षेत्रातील मान्यवर परीक्षकांची एक पॅनल कंटेंटची गुणवत्ता, अस्सलता आणि प्रेक्षकांचा सहभाग यांच्या आधारे सर्व प्राप्त एंट्रीजचे मूल्यमापन करेल.
कोटक ऑल्टसचे मॅनिजिंग डायरेक्टर श्रीनी श्रीनिवासन म्हणाले, “भारतात आत्ता आर्थिक सहभागाची सर्वात मोठी लाट बघायला मिळते आहे. तुकड्या-तुकड्यांत मिळणारा सल्ला आणि प्रचलित शॉर्टकट्सने गजबजलेल्या डिजिटल विश्वात लक्षावधी नवीन गुंतवणूकदार स्पष्ट माहितीच्या शोधात आहेत. अशावेळी, पॉडकास्ट आणि व्होडकास्ट आर्थिक साक्षरता प्रदान करण्याचे दमदार माध्यम म्हणून पुढे आले आहेत. परंतु, त्यांची गुणवत्ता आणि विश्वसनीयता कमी-जास्त असल्याचे दिसून येते. याचा विचार करून, कॅटलिस्ट अशा एका क्रिएटरवर प्रकाशझोत टाकणार आहे, जो गुंतागुंत सोपी करून सांगतो, विश्वास निर्माण करतो आणि आर्थिक शिक्षण आकर्षक आणि व्यवहार्य बनवतो.”
पात्रता आणि अर्ज दाखल करण्याबाबत मार्गदर्शक सूचना
· भारतात राहणारा भारतीय नागरिक, ज्याच्याकडे वैध ओळख पुरावा असेल
· 31 डिसेंबर 2025 रोजी कमीत कमी 50,000 यूट्यूब सबस्क्राईबर असतील
· आर्थिक साक्षरतेचे व्होडकास्ट निर्माण करण्याचा कमीत कमी एक वर्षाचा अनुभव आणि 31 डिसेंबर 2025 पर्यंत तीन अॅड्व्हाईझरी एपिसोड झाले असतील
· एक लक्षणीय व्होडकास्ट (1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान प्रदर्शित झालेला, कमीत कमी 5 मिनिटांचा) 31 जानेवारी 2026 पर्यंत katalyst.kotakalternateasset.com मार्फत सबमिट करा
· त्यातील कंटेंट तरुण आणि नवशिक्या गुंतवणूकदारांसाठी आर्थिक विषय सोपा करून सांगणारा हवा आणि तो इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही मोठ्या भारतीय भाषेत, इंग्रजी सब-टाइटल्स सह असावा
· एंट्रीजचे मूल्यमापन मान्यवर परीक्षकांच्या पॅनलद्वारे कंटेंटची गुणवत्ता, अस्सलता आणि प्रेक्षकांचा सहभाग यांच्या आधारे करण्यात येईल. ज्यूरी आणि मूल्यमापन प्रणालीची माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल.
कॅटालिस्ट अवॉर्ड अशा कंटेंट क्रिएटर्सचा सन्मान करण्यासाठी वाहिलेला आहे, जे भारतीयांच्या आर्थिक साक्षरतेला व्यावसायिक हिताच्या तुलनेत प्राधान्य देतात- ज्यांनी डिजिटल गजबजाटातून मार्ग काढून गुंतवणूक साक्षरतेबाबत स्पष्ट, विश्वासार्ह आणि प्रभावी कंटेंट दिला आहे त्यांचा गौरव करण्यासाठी. नफ्यापेक्षा दर्जेदार सामग्रीला प्राधान्य देणाऱ्या क्रिएटर्सना सन्मानित करून हा पुरस्कार केवळ आर्थिक कंटेंटच्या बाबतीत नवीन गुणवत्ता मापदंड स्थापित करत नाही, तर संपूर्ण भारतात माहितीपूर्ण गुंतवणुकीच्या संस्कृतीला प्रोत्साहन देतो. हा उपक्रम प्रेक्षकांना, खास करून तरुण आणि नवशिक्या गुंतवणूकदारांना आत्मविश्वासाने आर्थिक निर्णय घेण्यास प्रोत्साहन देतो तर दुसरीकडे, क्रिएटर्सना त्यांच्या कंटेंटमध्ये इनोव्हेशन आणून अस्सलता आणि शैक्षणिक मूल्याबाबत सर्वोत्तम मानके टिकवून ठेवण्यासाठी प्रोत्साहन देतो. तसे करताना, कॅटलिस्ट आर्थिक साक्षरतेच्या क्षेत्रात कायापालट करण्यास हातभार लावत आहे आणि लक्षावधी भारतीयांसाठी आर्थिक साक्षरता सहजप्राप्य, आकर्षक आणि अर्थपूर्ण बनवत आहे.


