Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedशंकराचार्य प.प. सदानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी सारसबाग श्री महालक्ष्मी देवीचे घेतले...

शंकराचार्य प.प. सदानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी सारसबाग श्री महालक्ष्मी देवीचे घेतले दर्शन

पुणे : सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिराला अनंतश्री विभूषित पश्चिमाम्नाय द्वारकासारदापीठाधीश्वर श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य प.प. सदानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व भक्तांना आशीर्वाद दिले.

 

यावेळी श्री महालक्ष्मी मंदिराच्या विश्वस्तांनी शंकराचार्य महाराजांचे स्वागत केले. यावेळी मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, रमेश पाटोदिया, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते.

 

या भेटीदरम्यान महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांची सविस्तर माहिती शंकराचार्य महाराजांना देण्यात आली. मंदिरामार्फत समाजहितासाठी सुरू असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक करून विश्वस्तांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments