Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedयुबीएस अॅथलेटिक्स कीड्स चषक स्पर्धेचा अंतिम टप्पा उत्साहात संपन्न

युबीएस अॅथलेटिक्स कीड्स चषक स्पर्धेचा अंतिम टप्पा उत्साहात संपन्न

पुणे 9 जानेवारी 2026 – डीएस पॉवरपार्टस यांच्या वतीने आयोजित व किंडर स्पोर्टस एलएलपी संचलित युबीएस अॅथलेटिक्स कीड्स चषक स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातील अंतिम टप्पा उत्साहात पार पडला. यामध्ये रिद्धी देशमुख, निहार काळभोर, देवांशी हंगर्गे, मल्हार खिरे, मौर्या जरांडे, शिवेंद्र जाधव, श्रेया बनकर, आरव जगदाळे, हिशा चौधर, अरुण गोंड, स्वरूप भुजबळ,प्रचिती चव्हाण, अर्णव शिवगण, प्रज्ञा कांबळे, लोकेंद्र कामी यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडांगणावर पार पडलेल्या या स्पर्धेत ६० मीटर धावणे, लांब उडी, चेंडू फेक अशा प्रकारात भाग घेतला होता. यापूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या प्रादेशिक अंतिम स्पर्धेला जिल्ह्यातील शाळांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. बाबूराव सणस मैदान आणि संत ज्ञानेश्वर स्टेडियम, पिंपरी येथे झालेल्या स्पर्धेतून अंतिम फेरीसाठी ५०० खेळाडूंची निवड करण्यात आली.

 

7 वर्षाखालील मुलींच्या गटात आर्यन्स वर्ल्ड स्कूलच्या रिद्धी देशमुख हिने तर, मुलांच्या गटात एमआयटी विश्वशांती गुरुकुल वर्ल्ड स्कूलच्या निहार काळभोरने विजेतेपद पटकावले. 8 वर्षाखालील मुलींच्या गटात आर्यन्स वर्ल्ड स्कूलच्या श्रेया बनकरने तर, मुलांच्या गटात सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलच्या आरव जगदाळे याने विजेतेपदाचा मान पटकावला.

 

9 वर्षाखालील मुलीच्या गटात सरहद्द स्कूलच्या देवांशी हंगर्गे हिने पहिला क्रमांक पटकावला. याच मुलांच्या गटात सिटी प्राइड स्कूलच्या मल्हार खिरेने प्रथम स्थान मिळवले. 10 वर्षाखालील मुलींच्या गटात नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मौर्या जरांडेने तर, मुलांच्या गटात सिटी प्राइड स्कूलच्या शिवेंद्र जाधवने विजेतेपदाला गवसणी घातली.

 

स्पर्धेतील विजेत्यांना पदके, प्रमाणपत्रे आणि आकर्षक अशी पारितोषिक देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रो. डॉ. पराग काळकर, राज देशमुख, ट्रूस्पेसचे संस्थापक अश्विन त्रिमल, ग्रँड मास्टर अभिजीत कुंटे आणि युबीएस कंपनीच्या ग्रुप ऑपरेशनचे कंट्री हेड मथायस सॅनके, डीएस पॉवरपार्टसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल केंकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निखिल लड्डा, अनन्या नायडू, अवंतिका घोष आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

निकाल: प्रथम, द्वितीय व तृतीय यानुसार:

7 वर्षाखालील मुली: 1. रिद्धी देशमुख(आर्यन्स वर्ल्ड स्कूल), 2. सई इंगळे(आर्यन्स वर्ल्ड स्कूल), 3. ज्ञानेश्वरी अलकुंठे(आदर्श विद्या मंदिर);

7 वर्षाखालील मुले: 1. निहार काळभोर(एमआयटी विश्वशांती गुरुकुल वर्ल्ड स्कूल), 2. शंभू शिंदे(ॲसेंट इंटरनॅशनल स्कूल), 3. सुशांत जरपुला(पीएमसी पंडित दिनदयाळ उपाध्याय इंग्लिश मिडीयम स्कूल);

 

8 वर्षाखालील मुली: 1. श्रेया बनकर(आर्यन्स वर्ल्ड स्कूल), 2. गीतांजली कांबळे(सारथी प्राथमिक विद्यालय), 3. अलीना पठाण(नेहरू नगर गर्ल्स स्कूल);

8 वर्षाखालील मुले: 1. आरव जगदाळे(सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल) ,2. अर्जुन शुक्ला(द कल्याणी स्कूल), 3. अर्णव मारणे(आर्यन्स वर्ल्ड स्कूल);

 

9 वर्षाखालील मुली: 1. देवांशी हंगर्गे(सरहद्द स्कूल), 2. सेजल मिश्रा(एस. एस. सी शारदा विद्यालय), 3. कनिका मेहेत्रे(सिटी प्राइड स्कूल);

9 वर्षाखालील मुले: 1. मल्हार खिरे(सिटी प्राइड स्कूल), 2. भार्गव दिवेकर(आर्यन्स वर्ल्ड स्कूल), 3. आरव शहा(सिटी प्राइड स्कूल);

 

10 वर्षाखालील मुली: 1. मौर्या जरांडे(नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूल), 2. आयरा सुस्तरवार(,सिटी प्राइड स्कूल), 3. निहारिका वाटकर (छत्रपती शाहू इंग्लिश मिडीयम स्कूल);

10 वर्षाखालील मुले: 1. शिवेंद्र जाधव(सिटी प्राइड स्कूल निगडी), 2. वरद चौधरी(ट्री हाऊस हायस्कूल), 3. रियांश सातपुते(विद्या व्हॅली स्कूल);

 

11 वर्षाखालील मुली: 1. हिशा चौधर(सिटी प्राइड स्कूल), 2. अक्षरा पांगर(सरहद्द स्कूल), 3. नंदनी तांबूरे(,यशस्वी प्राथमिक विद्यालय);

11 वर्षाखालील मुले: 1. अरुण गोंड(यशस्वी इंग्लिश मिडीयम स्कूल), 2. रुद्र राऊत(सिटी प्राइड स्कूल), 3. सम्राट कदम(सरहद्द स्कूल);

 

12 वर्षाखालील मुले: 1. स्वरूप भुजबळ(सिटी प्राइड स्कूल), 2. द्विज राजहंस(सिटी प्राइड स्कूल), 3. गुरफान अहमद(पीसीएमसी उर्दू प्रायमरी स्कूल);

 

 

13 वर्षाखालील मुली: 1. प्रचिती चव्हाण(हिंदुस्तान अँटिबायोटिक्स स्कूल), 2. आर्या फरांदे(सिटी प्राइड स्कूल), 3. ए. कळमकर(सिटी प्राइड स्कूल);

13 वर्षाखालील मुले: 1. आरूष दुग्गल(सिटी प्राइड स्कूल), 2. प्रिन्स गोंड(यशस्वी प्राथमिक विद्यालय), 3. समीर रेहमानी (पीसीएमसी उर्दू प्रायमरी स्कूल);

 

14 वर्षाखालील मुली: 1. कावेरी बारणे(भैरवनाथ विद्यालय हायस्कूल), 2. अक्षवी बिर्जे(सिटी प्राइड स्कूल), 3. अनुष्का शिंदे(भैरवनाथ विद्यालय हायस्कूल);

14 वर्षाखालील मुले: 1. अर्णव शिवगण(सिटी प्राइड स्कूल), 2. अमित सनगारे(हिंदुस्तान अँटिबायोटिक्स स्कूल), 3. समर्थ तारु;

 

15 वर्षाखालील मुली: 1. प्रज्ञा कांबळे(कस्तुरबा गांधी इंग्लिश मिडीयम स्कूल), 2. सौंदर्या शेलार(श्री स्वामी समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल), 3. सुनीता खोडकर(विद्यानंद भवन हायस्कूल);

15 वर्षाखालील मुले: 1. लोकेंद्र कामी(यशस्वी माध्यमिक विद्यालय), 2. सोनू पंडित(आर अँड डीइ इंग्लिश

मिडीयम स्कूल), 3. जगन्नाथ राठोड.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments